या महिन्याच्या सादरतेस प्रस्तुत करणे
१ पवित्र शास्त्र हे दंतकथा असून ते नैतिक सल्ल्याच्या बाबतीत जुने, टाकाऊ झालेले आहे अशी पुष्कळांची आज समज आहे. अशाप्रकारे लोकांमध्ये देववचनाबद्दल आदर उभारणे हे आव्हानकारक असू शकते. पण आपल्यापाशी द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? हे पुस्तक आहे व ते लोकांना पवित्र शास्त्र हे खरेच देवाकडील प्रेरित पुस्तक आहे असे दाखवण्यात बहुमोल मदत असे ठरले आहे.
२ या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी घरमालकाची आस्था वाढविण्याच्या दृष्टीने तुम्ही काय म्हणू शकाल? ख्रिस्ती आहोत असा दावा करणाऱ्यांना, ख्रिस्तेत्तर विश्वासाच्या लोकांना, ज्यांना विश्वासच नाही अशांना अपीलकारक ठरणारे असे कोणते मुद्दे किंवा ठळक गोष्टी तुम्ही सादर करू शकाल? पुढे देण्यात आलेले प्रस्ताव हे आमच्या शेजाऱ्यांना हे पाहण्याची मदत देण्यात आम्हाला मदत करू शकतील की, “प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण याकरिता उपयोगी आहे; त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो.” (२ तीम. ३:१६, १७) हे प्रस्ताव स्थानिक परिस्थितींना अनुलक्षून जुळवून घेतले जाऊ शकतात.
२ आपल्याला जे म्हणायचे आहे त्याबद्दल संशोधन का करावे? बहुतेक लोकांना पवित्र शास्त्राबद्दल अमुक एक विश्वास वाटत असल्यामुळे तसेच त्यांची या विषयाबद्दल पडताळा करून पाहण्याची इतकी आस्था नसल्यामुळे आपल्याला आपली सादरता अशा पद्धतीने जोडली पाहिजे की, घरमालकाला, आपण जे काही म्हणतो त्याबद्दल खुल्या मनाने परिक्षण करण्याची मदत मिळाली पाहिजे.
४ योग्य अभिवादनानंतर तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “आपल्या शेजाऱ्यांसोबत बोलताना आम्हाला असे आढळले आहे की, पवित्र शास्त्र आज आम्हासाठी कोणतेही व्यावहारिक मूल्य राखून नाही असे त्यांना वाटते. पण पवित्र शास्त्रात जे काही खरेच आहे ते बघण्यासाठी लोकांनी थोडा वेळ दिला तर तुम्हाला वाटते का की, पवित्र शास्त्र खरेपणाने जे काही म्हणते ते त्यांना चांगलेपणाने समजू शकेल? [घरमालकाला प्रतिसाद देऊ द्या.] पवित्र शास्त्र आपल्याला कसे उपयुक्त आहे याबद्दल तेच जे काही म्हणते ते येथे पहा.” २ तीमथ्यी ३:१६, १७ चे वाचन केल्यावर द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स् या पुस्तकाच्या १२ व्या अध्यायाकडे घरमालकाचे लक्ष न्या व तेथे ११, १५ व १६ परिच्छेदामधून आज आम्हास व्यावहारिक ठरणाऱ्या, पण पवित्र शास्त्रात आधीच नमूद करून ठेवण्यात आलेल्या विशिष्ठ सूज्ञ मार्गदर्शकांकडे निर्देश करा. ते स्तोत्रसंहिता ११९:१५९, १६० मधील स्तोत्रकर्त्याच्या शब्दांची सत्यता वदविते.
५ पुष्कळांना असे आढळले आहे की, घरमालकाच्या विशिष्ट आस्थेच्या विषयाची चर्चा पुस्तकात जेथे दिली आहे तेथे वळावे. हे कसे करता येते ते पहा.
६ आपली ओळख करून दिल्यावर तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “आज लोक पुष्कळशा धार्मिक पुस्तकांना ‘पवित्र’ मानत असल्यामुळे यापैकीचे कोणते खरेच देवाकडून प्रेरित आहे हे आपल्याला कसे ठरवता येईल?” घरमालकाच्या अभिप्रायानंतर त्याचे लक्ष द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? पुस्तकाच्या ३ ऱ्या पानावरील अनुक्रमणिकेकडे वळवा. त्याने जर विज्ञानाच्या बाबतीत आपली आस्था व्यक्त केली तर ८ वा अध्याय काढून त्याच्या पहिल्याच परिच्छेदाकडे त्याला निरवा, जेथे म्हटले आहे की, पवित्र शास्त्र वैज्ञानिक पुस्तक असल्याचा दावा करीत नसले तरी जेथे जेथे वैज्ञानिक गोष्टीची चर्चा त्यात आढळते, तेथे ते पूर्णपणे अचूक असल्याचे दिसते. वेळ आहे तर परिच्छेद २ मधील देण्यात आलेली शास्त्रवचने काढून बघा व त्याला दाखवा की, पवित्र शास्त्राने शतकांआधी कशी अचूक वैज्ञानिक विधाने केली होती व त्याद्वारे ते पुस्तक श्रेष्ठ उगमाकडून प्रेरित असल्याचे सिद्ध होते.
७ इतर साहाय्यक वैशिष्ट्ये: पुस्तकाच्या मागे अध्यायानुरुप देण्यात आलेले विस्तारीत संदर्भ, हे पुस्तक केवढ्या उत्तम प्रकाराने संशोधित करण्यात आले आहे हे दाखवण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही विज्ञानाबाबत ८ व्या अध्यायात चर्चा करीत असताना मागील बाजूस विविध एन्सायक्लोपिडिया तसेच नामांकित विज्ञानशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचे जे संदर्भ दिले आहे ते त्याला दाखवू शकता. ज्यांना देवाबद्दल किंवा धर्माबद्दल इतकी आस्था नाही, अशांना विज्ञान व विज्ञानशास्त्रज्ञांनी दाखवून दिलेला पुरावा पवित्र शास्त्र हे प्रेरित असल्याचे कसे दाखवतो ते पाहण्यात रस वाटेल. पवित्र शास्त्राने खरे बोलण्याबद्दल जो सल्ला दिलेला आहे तो केवढा उचित आहे व तो अनुसरल्याने आम्हासाठी कसा सर्वाधिक लाभ मिळू शकतो याच्या पुष्ट्यर्थ पृष्ठ १६७ वरील १४व्या परिच्छेदात स्तंभलेखकाचा तसेच मानसरोगावरील एका मासिकचा संदर्भ देण्यात आला आहे.
८ प्रभावी प्रगमनाचा वापर करून द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? पुस्तकाची ओळख करून देण्यामुळे आम्ही ज्या लोकांशी बोलतो त्यांच्यामध्ये पवित्र शास्त्राबद्दलचा आदर वाढविण्यात मदत देऊ शकू. यामुळे ते देखील त्याला देवाचे वचन असल्याचे मानू लागतील.—१ थेस्स. २:१३.