इतरांना देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्यास मदत करा
१ वर्षाच्या इतर कोणत्याही वेळापेक्षा, डिसेंबर महिन्यातच, तथाकथित ख्रिश्चन किंवा इतर, येशूबद्दल अधिक विचार करतात. या कारणास्तव, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करण्याचा तो उत्तम महिना आहे. हे मूल्यवान प्रकाशन असल्यामुळे, योग्य असेल तेथे, सेवेत ते सादर करण्यास आणि घरमालक त्याच्यापासून लाभ मिळवू शकतील म्हणून प्रस्तुत करण्यास आम्ही सर्व प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही ते कसे करू शकतो?
२ येशूवर लक्ष केंद्रीत करणाऱ्या पवित्र शास्त्रावर आधारित संभाषणाची थेटपणे सुरवात करण्याचा प्रयत्न करा.
घरमालकाला अभिवादन केल्यावर, तुम्ही असे काही म्हणू शकता:
▪“आमच्या शेजाऱ्यांनी, त्यांच्या पवित्र शास्त्रातून अनंतकाळ जगण्याविषयी वाचल्यावर त्यांना काय वाटते, याबद्दल आज आम्ही विचारत आहोत. [उत्तरासाठी वाव द्या.] ते खास आस्थेचे आहे, कारण पवित्र शास्त्र त्या शक्यतेबद्दल जवळजवळ ४० वेळा सांगते. अशा जीवनाचा आम्हाकरता काय अर्थ होईल? प्रकटीकरण २१:४ काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. [वाचा.] कशाचे अभिवचन केले आहे त्याकडे तुम्ही लक्ष दिले का? [उत्तरासाठी वाव द्या.] आम्ही सार्वकालिक जीवन कसे मिळवू शकतो?” योहान १७:३ वाचा, आणि देव व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याविषयीचे ज्ञान घेण्याच्या आवश्यकतेवर जोर द्या. मग, घरमालकाची आस्था पुढे वाढवण्यासाठी प्रस्तावनेतील उपशिर्षकांचा उपयोग करून, त्याला सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक दाखवून ४०.०० रुपयांना ते सादर करा.
३ एखाद्या विशिष्ट घरमालकासाठी हा प्रस्ताव आणि हे प्रकाशन योग्य नाही असे तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही द वॉचटावर व अवेक! यांचे चालू अंक सादर करू शकता किंवा वील धीस वर्ल्ड सर्व्हाइव्ह? ही पत्रिका देऊ शकता. सादर केलेल्या प्रकाशनातून एक किंवा दोन विशिष्ट मुद्यांकडे लक्ष आकर्षित करा. त्या विषयावर चर्चा पुढे चालू ठेवण्याकरता एखाद्या सोयीस्कर वेळी पुन्हा येण्याबद्दल विचारा.
४ घरमालक कामात असल्यास, वरील सादरता थोडक्यात सांगणे सुज्ञतेचे ठरेल. नवीन प्रचारकांना देखील खालील सादरतेचा उपयोग करावयास सोपे वाटेल.
स्वतःचा परिचय करून दिल्यावर, आम्ही असे म्हणू शकतो:
▪“आमच्या शेजाऱ्यांनी, त्यांच्या पवित्र शास्त्रातून सार्वकालिक जीवन मिळवण्याविषयी वाचल्यावर त्यांना काय वाटते, याबद्दल आज आम्ही विचारत आहोत. उदाहरणार्थ, योहान १७:३ मध्ये येशूने काय म्हटले ते पाहा. [वाचा.] येशू ख्रिस्त व त्याने जे शिकवले त्याबद्दल लोकांना अधिक शिकण्यास मदत करण्यासाठी हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.” सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक उघडून त्यातील काही सुंदर दाखले दाखवा. प्रस्तावनेकडे वळा, व “त्याच्याबद्दल माहिती शिकून घेऊन लाभ मिळवून घ्या” या उपशिर्षकाखालील दुसरा परिच्छेद वाचा. मग त्यास प्रकाशन सादर करा.
५ तुम्ही पुस्तक दिले असल्यास, त्याचवेळी किंवा काही दिवसांनंतर पुनर्भेटीच्या वेळी, “स्वर्गाकडून संदेश” या पहिल्या अध्यायाची चर्चा करण्यास विचार मांडून, पवित्र शास्त्राभ्यासासाठी पाया घाला. पुढील भेटीच्या वेळी एक विशिष्ट वेळ घालवला पाहिजे, असे घरमालकास सांगण्याऐवजी, काही मिनिटांमध्येच तो देवाचे वचन, पवित्र शास्त्रातून येशू ख्रिस्ताविषयी अधिक आस्थेची माहिती शिकू शकेल ते सांगा.
६ आपण सर्वजण, देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताविषयीच्या सत्यावर इतरांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी या जगिक सुटीच्या हंगामाचा उपयोग करू या, जेणेकरून, सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर येण्यास त्यांची मदत करता येईल.—मत्त. ७:१४.