डिसेंबर दरम्यान पवित्र शास्त्राभ्यास सुरू करणे
१ येशूने त्याच्या शिष्यांना सुवार्तेचे शिक्षक होण्यास आज्ञापिले. (मत्त. २८:१९, २०) पवित्र शास्त्राभ्यास चालवणे हे, इतरांना शिकवण्याचे आमचे प्रमुख माध्यम आहे. या कार्यात तुम्ही सहभाग घेत आहात का? असे नसेल तर, इतरांना शिकवण्यात तुम्हालाही अधिक सहभागितेचा आनंद मिळण्याकरता तुम्ही एखादा अभ्यास कसा सुरू करू शकता?
२ कदाचित, आम्ही घरमालकास वील धीस वर्ल्ड सर्व्हाइव्ह या पत्रिकेची एक प्रत दिली असेल आणि त्यामधील विषयांवर चर्चा करण्यास पुन्हा येऊ असे अभिवचन दिले असेल.
“वील धीस वर्ल्ड सर्व्हाइव्ह,” ही पत्रिका ज्या घरमालकास दिली त्यास पुन्हा भेटतो, तेव्हा आम्ही असे म्हणू शकतो:
▪“काही दिवसांआधी मी येथे आलो होतो तेव्हा, आमच्या दिवसांच्या निकडीबद्दल आणि आमच्या दिवसात हयात असलेल्या परिस्थितींविषयी येशूने केलेल्या अचूक वर्णनाबद्दल आपण चर्चा केली होती. तुम्हाला दिलेल्या पत्रिकेतून थोड्या मिनिटांसाठी संक्षिप्तपणे काही माहितीचा विचार करण्यास मला आवडेल. ‘द साईन’ या उपशिर्षकाखाली काय म्हटले आहे त्याकडे जरा लक्ष द्या.” पत्रिकेच्या पान ३ वरील त्या शिर्षकाखालील, पहिल्या दोन किंवा तीन परिच्छेदांची चर्चा करा आणि वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे त्यात उल्लेखिलेली शास्त्रवचने वाचा. येशूचा भविष्यवाद आज कशाप्रकारे पूर्ण होत आहे त्याबद्दल ठळकपणे सांगा. पुनर्भेटीची व त्या शिर्षकाखालील इतर परिच्छेदांवर चर्चा करण्यासाठी योजना करा. पुनर्भेटीआधी ते साहित्य वाचून ठेवण्यास घरमालकास उत्तेजन द्या.
३ किंवा तुम्ही असे काही म्हणू शकता:
▪“मागच्या वेळी आपण बोललो तेव्हा, मी तुम्हाला वील धीस वर्ल्ड सर्व्हाइव्ह अशा नावाची पत्रिका दिली होती. त्यावेळी, जगाच्या कारभारात येशूच्या भूमिकेविषयी आपण बोललो होतो. पवित्र शास्त्रात योहान १७:३ मध्ये दिलेले त्याचे शब्द आपण वाचले होते. [वाचा.] आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास, देव आणि येशू यांच्याविषयी शिकून घेणे आवश्यक असल्यामुळे, असे ज्ञान घेण्याकरता आपण होईल तितका प्रयत्न करणे योग्यतेचेच आहे. येशू पृथ्वीवर असताना, त्याने देवाच्या अनेक आश्चर्यकारक गुणांना प्रतिबिंबित केले. येशू आणि त्याच्या सेवाकार्याबद्दल जितके अधिक ज्ञान आम्हाला मिळेल, तितकेच अधिक आम्ही त्याच्या पित्याबद्दल जाणू शकतो, यावर विश्वास ठेवणे योग्य नाही का? [उत्तरासाठी वाव द्या.] सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, हे पुस्तक काय म्हणते ते पाहा.” अध्याय ११६ च्या दहाव्या पानावरील पहिला आणि दुसरा परिच्छेद वाचा. या पुस्तकात, येशूबद्दलच्या चारही शुभवर्तमानांच्या अहवालातील माहिती आहे तसेच, ज्या क्रमाने घटना घडल्या त्याचप्रमाणे ते साहित्य सादर करते, यावर जोर द्या. विशिष्ट अध्यायांचे शीर्षक, दाखले आणि पुस्तकाच्या सुरवातीला असणारा नकाशा दाखवा. घरमालक स्वतःसाठी ते पुस्तक ४०.०० रुपयांना मिळवू शकेल ते सांगा आणि त्यास पुस्तक सादर करा.
४ “सर्वश्रेष्ठ मनुष्य” पुस्तक स्वीकारलेल्या घरमालकाला अभिवादन करून, आम्ही असे म्हणू शकतो:
▪“पहिल्या भेटीत मी सांगितल्याप्रमाणे, सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक, पवित्र शास्त्राभ्यासाठी बनवले आहे. त्याचा अधिक प्रभावीपणे वापर कसा केला जाऊ शकतो त्याबद्दल मला थोडक्यात दाखवण्यास आवडेल.” पुस्तकातील “स्वर्गाकडून संदेश” हा पहिला अध्याय उघडा. छापील प्रश्नांकडे घरमालकाचे लक्ष वेधवा. पहिला प्रश्न वाचल्यावर, सुरवातीच्या परिच्छेदांना विचारात घ्या. दुसऱ्या पानावरील दाखल्याचा त्याजशी संबंध जोडा. उर्वरित प्रश्नांची चर्चा करा व वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे उत्तरे ठळकपणे सांगा. भेट समाप्त करण्याआधी, पुन्हा येण्याची व संभाषण चालू ठेवण्याची योजना करा.
५ सकारात्मक मनोवृत्ती ठेवल्याने, चांगली तयारी केल्याने आणि प्रत्येक संधीचा फायदा घेतल्याने, डिसेंबर दरम्यान एखादा पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्यास आपण सुसज्ज होऊ.