तरुणांना ‘आता, त्यांच्या महान निर्माणकर्त्याला स्मरण्यास मदत करणे’
बायबलमध्ये दिलेला सल्ला केवळ ‘ऐकणे’ इतकेच पुरेसे नाही. पूर्ण लाभ प्राप्त होण्यासाठी एखाद्याने त्यामध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी ‘पाळल्या’ पाहिजेत. (प्राकटी. १:३) साहित्य देणे ही शिष्य बनवण्याची केवळ पहिली पायरी होय. ऐकू इच्छिणारे आस्थेवाईक जण आपल्याला भेटल्यावर, त्यांनी आणखी शिकून घेण्यास त्यांना मदत करण्यासाठी आपण लगेचच त्यांच्याकडे पुन्हा गेले पाहिजे. आपण तरुण लोकांना आणि इतरांना, ‘आता त्यांच्या महान निर्माणकर्त्याला स्मरण्यास’ मदत करणे आवश्यक आहे जेणेकरून ते सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात. (उप. १२:१) आपल्या पुनर्भेटीत आपण कोणत्या विषयावर बोलू शकतो?
२ सुरवातीच्या भेटीत तरुण लोक सामना करत असलेल्या समस्यांबद्दल तुम्ही बोलला असाल तर आता अशी सुरवात करू शकता:
▪ “आजच्या जगामध्ये तरुणांना सामना कराव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल आपण पूर्वी बोललो होतो. यहोवा सर्वांमध्ये, त्याचप्रामाणे तरुणांमध्येही आस्था राखून असल्यामुळे त्याने त्याचे वचन बायबल यात मार्गदर्शन पुरवले आहे. ते त्यांना, आज पुष्कळ तरुण लोक ज्या जाळ्यात फसतात ते जाळे टाळून जीवनाचा आनंद लुटण्यास मदत करू शकते.” यंग पीपल आस्क पुस्तकाची सूची उघडा आणि घरमालकास कोणता विषय जास्त आवडतो ते विचारा. उदाहरणार्थ, जर त्याने मादक पदार्थांबद्दलचा विषय निवडला तर, पृष्ठ २७२ वरील अध्याय ३४ काढा. त्याचे लक्ष काही पोटमथळ्यांकडे आकर्षित करा: “ड्रग्स हिंडर ग्रोथ,” “कॅन ड्रग्स रुईन माय हेल्थ?” “ड्रग्स—द बायबल्स् व्ह्यू,” आणि “यू कॅन से नो!” या उपशिर्षकांखालील व्यावहारिक सल्ला दाखवा. अध्यायाच्या शेवटी असलेल्या “क्वेशन्स फॉर डिस्कशन” वाचकाला साहित्याचे पुनरावलोकन करण्यास आणि मुख्य मुद्ये समजण्यास कशी मदत करतात ते दाखवा. नियमित भेट देण्याबद्दल विचारपूस करा व त्याच्याबरोबर याचप्राकारे संपूर्ण पुस्तकाची चर्चा करा.
३ पहिल्या भेटीत तुम्ही चांगल्या सल्ल्याचा स्रोत याची चर्चा केली असल्यास, हा प्राश्न विचारून ती चर्चा चालू ठेवण्याचे तुम्ही ठरवाल:
▪ “विद्यालयीन विषयांमध्ये युवकांनी शिक्षण प्राप्त करावे इतकेच पुरेसे आहे असे तुम्हाला वाटते का? [प्रातिसादासाठी वाव द्या. यिर्मया १०:२३ वाचा.] तुम्ही पाहिल्यानुसार, एका उच्च उगमाकडून प्राशिक्षणाची आवश्यकता आहे. देवाच्या साहाय्याविना जगण्याचे प्रायत्न, आमच्या बहुतेक समस्यांचे कारण आहे. केवळ देवाचे वचन यशस्वी जीवन जगण्यासाठी विश्वासनीय आणि अनेक काळापासून शाबीत झालेला प्राभावी सल्ला आहे.” पृष्ठे ३१६ व ३१७ वरील चौकोनाकडे निर्देशित करा आणि दाखवा की बायबलच्या तत्त्वांचा आदर करणाऱ्या व्यक्तींसोबत सहवास राखणे व अभ्यास करणे, जीवनाचा आनंद लुटण्याचा व समस्यांपासून दूर राहण्याची पावले आहेत. शिवाय या अंतसमयी सभा देखील बायबल आधारित सल्ल्यांचा स्थिर उगम आहेत.
४ शास्त्रवचनीय चर्चा चालू करण्यासाठी तुम्हाला कदाचित असे करणे आवडेल:
▪ यंग पीपल आस्क पुस्तकाच्या पृष्ठ ३१८ वरील उदाहरणे दाखवा आणि असे समजावून सांगा: “आपल्या निर्माणकर्त्यासोबत जवळचा नातेसंबंध ठेवल्याने आपल्याला अनंतकाळचे फायदे प्राप्त होतील हे निश्चित आहे. परंतु असा जवळचा नातेसंबंध प्रास्थापित करण्यासाठी एखाद्याला काय करणे आवश्यक आहे? देवाच्या प्रोरित वचनाचा नियमित अभ्यास हे एक पाऊल आहे.” पृष्ठ ३०८ वरील उपशिर्षकांची चर्चा करा व घरमालकाला आणखी शिकून घेण्यासाठी बायबल अभ्यासाच्या आपल्या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आमंत्रण द्या.
५ बायबल अभ्यास चालू करण्याचा आपला उद्देश असल्यामुळे, आपण परिणामकारी पुनर्भेटी करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी वेळेची योजना आणि तयारी करा. अशाप्राकारे आपण खरोखर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करू शकतो.—प्राकटी. २२:६, ७.