जीवनाप्रत नेणारे ज्ञान प्राप्त करण्यास इतरांना मदत करा
१ प्रेषित पौलाने असे स्पष्टीकरण दिले की, ‘देवाची इच्छा अशी आहे की, सर्व माणसांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.’ (१ तीम. २:४) ते ज्ञान घेण्यास आपण इतरांना कशी मदत करू शकतो? सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाद्वारे ज्या व्यक्तींमध्ये आस्था उत्पन्न झाली आहे अशांना पुनर्भेटी देणे हा एक मार्ग आहे. हे प्रकाशन बायबल सत्याला स्पष्ट, सरळ, निवडक शब्दांत सादर करते. त्याचा अभ्यास केल्याने, सर्व प्रकारचे लोक जीवनाप्रत नेले जाऊ शकतात. त्याचा अभ्यास आपल्यासोबत करण्यासाठी इतरांना उत्तेजन मिळेल असे आपण काय म्हणू शकतो?
२ ज्यांना तुम्ही बायबल व्यावहारिक मार्गदर्शक असल्याचे सांगितले आहे, त्यांना कदाचित असे म्हणून अभ्यास सादर करण्यास परत जाऊ शकता:
▪ “मी येथे यापूर्वी आलो होतो तेव्हा, मार्गदर्शनाचा व्यावहारिक उगम म्हणून आपण बायबलवर भरवसा का ठेवू शकतो याची चर्चा केली होती. बायबल स्वतः देवाकडून प्रेरित असल्याचा दावा करते, आणि त्याच्या एका लेखकाने सांगितल्याप्रमाणे ते सांत्वन आणि आशेचा निश्चित स्रोत आहे. [रोमकर १५:४ वाचा.] आपल्या मागील संभाषणाच्या समाप्तीस, आपण बायबलमधील ज्ञानापासून लाभ कसा प्राप्त करू शकतो, हा प्रश्न मी उपस्थित केला होता.” ज्ञान पुस्तकातील पृष्ठ ११ वरील परिच्छेद १८ वाचा. यहोवाचे साक्षीदार सबंध जगभरात सुमारे पाच लाख बायबल अभ्यास चालवत आहेत, सर्वत्र लोकांना सार्वकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान घेण्यास मदत करत आहेत हे दाखवा. अध्याय १ मधील पहिल्या पाच परिच्छेदांचा उपयोग करून अभ्यास कसा चालवला जातो याचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
३ तुम्ही एखाद्यासोबत प्रथम प्रार्थनेविषयी चर्चा केली असल्यास, अभ्यास सुरू करण्याच्या प्रयासात तुम्ही हा प्रस्ताव उपयोगात आणू शकता:
▪ “सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून आपण प्रार्थनेविषयी ज्या माहितीची चर्चा केली ती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो. मी पुन्हा येऊन, देवाला प्रार्थना करणारे त्याचे कसे ऐकू शकतात याची चर्चा तुम्हासोबत करीन असे सांगितले होते. पृष्ठ १५८ वर काय म्हटले आहे ते पाहा. [परिच्छेद १८ वाचा.] अशाप्रकारे, देवाला आपल्याला काय सांगायचे आहे ते आपण बायबलचा व्यक्तिगत अभ्यास करण्याद्वारे ऐकत आहोत. तसे केल्याने आपण देवाच्या समीप येतो आणि आपण ज्याविषयी प्रार्थना करतो त्या दैनिक समस्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत मिळते. तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यास मला आवडेल.” त्या व्यक्तीची इच्छा असल्यास, ज्ञान पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाने अभ्यास सुरू करा.
४ अभ्यास सुरू करण्यास तुम्ही थेट प्रस्ताव वापरला असल्यास, प्रारंभिक चर्चेचा मागोवा घेण्यास तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “तुम्हाला आमच्या मोफत बायबल अभ्यासाच्या कार्यक्रमाविषयी अधिक सांगावेसे वाटल्यामुळे मी पुन्हा एकदा भेट देण्याचा खास प्रयत्न केला. मी तुम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाची प्रत दिली होती आणि हेच अभ्यासाचे साधन आम्ही वापरतो. देवाच्या वचनाचा विचार करण्यास ते आपल्याला कसे उत्तेजन देते ते पाहा. [पृष्ठ २२ वरील परिच्छेद २३ वाचा.] तुम्ही कृपया तुमच्या पुस्तकाची प्रत आणल्यास, कदाचित मागे आपण जेथे थांबलो तेथून पुढे आपण सुरवात करू शकतो.” प्रथम भेटीत अभ्यास सुरू केला नसल्यास, तुम्ही असे म्हणू शकता: “आम्ही बायबलचा अभ्यास कसा करतो हे मी तुम्हाला दाखवण्याची कदाचित उचित वेळ असेल.” काही परिच्छेदांवर विचार केल्यावर, पुढील अभ्यासासाठी परतण्याची निश्चित वेळ ठरवा.
५ प्रभावीपणे ज्ञान पुस्तकाचा उपयोग केल्याने, इतरांना आशीर्वाद प्राप्त व्हावयास अचूक ज्ञानाचा प्रसार करण्यात आपल्याला मदत मिळेल. (नीति. १५:७) अशा ज्ञानामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आनंद मिळेल, आणि त्यांनी यहोवाच्या नीतिमत्त्वाच्या सुसंगतेत राहावे म्हणून त्यांच्याकरता ते शक्तिशाली प्रेरणा ठरेल व शेवटी त्यांना सार्वकालिक जीवनाप्रत नेईल.