खऱ्या देवाचे ज्ञान जीवनाप्रत नेते
१ येशूने प्रार्थनेत त्याच्या पित्याला असे म्हटले, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, . . . त्यांनी ओळखावे.” (योहा. १७:३) तो किती उदार मोबदला आहे! सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या प्रकाशनाचा उपयोग करून इतरांनी सर्वकाळासाठी जगण्यास काय केले पाहिजे हे शिकवण्यास आपण त्यांची मदत करू शकतो. त्यांची आस्था जागृत करण्यास आणि ज्ञान पुस्तक वाचण्याची इच्छा त्यांच्यात प्रवृत्त करण्यास आपण काय म्हणू शकतो?
२ तुम्ही असे म्हणून बायबल मार्गदर्शनाचा व्यावहारिक उगम असल्याचे व्यवहारचातुर्याने दर्शवू शकता:
▪ “जीवनाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शनाचा व्यावहारिक उगम कोठे शोधावा याबद्दल आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी चर्चा करत आहोत. लोक बायबलसहित विविध धार्मिक पुस्तकांमधूनही सल्ला प्राप्त करतात. परंतु लोकांची मनोवृत्ती बदलत आहे; काहीजण त्यांच्या धार्मिक पुस्तकांबद्दल ती केवळ मनुष्यांनी लिहिलेली आहेत असा विचार करून संशय बाळगतात. तुमचे मत काय आहे? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल आपल्या दिवसाकरता व्यावहारिक असल्याचे का म्हटले जाऊ शकते याचे एक अतिशय चांगले कारण आहे. [२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.] देवाने बायबल लिहून ठेवण्यास प्रेरणा दिली त्यावेळी बायबल तत्त्वे जितकी लागू होत होती तितकीच आजही लागू होतात.” ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १६ काढा, आणि येशूच्या डोंगरावरील प्रवचनात आढळलेल्या व्यावहारिक मार्गदर्शनावर संक्षिप्त रूपात विवेचन मांडा. परिच्छेद ११ किंवा परिच्छेद १३ मधील अवतरण वाचा. ते पुस्तक सादर करा, आणि बायबलमधील ज्ञानापासून आपण व्यक्तिगतरित्या फायदा कसा प्राप्त करू शकतो, या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुन्हा येण्याची योजना करा.
३ प्रार्थना अनेक लोकांकरता मनोवेधक विषय असल्यामुळे, असे विचारून त्यावर चर्चा करण्यास तुम्हाला आवडेल:
▪ “आधुनिक दिवसाच्या जीवनात सर्व आव्हानांचा सामना करावा लागत असताना प्रार्थना खरोखरच मदतदायी असू शकेल असे आपल्याला वाटते का? [प्रतिसादासाठी थांबा.] देवाला प्रार्थना करण्याद्वारे अनेकजण त्याच्या समीप आले आहेत असे त्यांना वाटते आणि असे केल्याने त्यांना मनोबल प्राप्त झाले आहे व बायबल याचेच अभिवचन देते. [ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १५६ काढा, आणि फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा.] असे असतानाही, एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात नाही असे तिला कदाचित वाटेल. हा अध्याय ‘तुम्ही देवाच्या समीप कसे येऊ शकता’ याची चर्चा करतो. [पुस्तक सादर करा] देवासोबतचे दळणवळण एकतरफी नसल्यामुळे आपण देवाचे म्हणणे कसे ऐकू शकतो याचेही हे पुस्तक स्पष्टीकरण देते. मी पुढील वेळी येईन तेव्हा आपण याची चर्चा करू शकतो.”
४ बायबलचा आदर करणाऱ्या व्यक्तींशी बोलत असताना, तुम्ही अभ्यास सुरू करण्याचा थेट प्रस्ताव सादर करून पाहू शकता. येथे उपयुक्त ठरणारा एक प्रस्ताव आहे:
▪ “आम्ही मोफत गृह बायबल अभ्यासाचा कोर्स सादर करीत आहोत. तुम्ही यापूर्वी कधी बायबलचा कोर्स घेतला आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आम्ही वापरत असलेले अभ्यासाचे साधन मी तुम्हाला दाखवतो.” ज्ञान पुस्तक दाखवा, घरमालकाला विषयसूची पाहता यावी म्हणून पृष्ठ ३ काढा, आणि विचारा, “या विषयांबद्दल बायबलला काय म्हणायचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?” ज्याविषयी सर्वाधिक आस्था दाखवली जाते तो अध्याय काढा, आणि उपशिर्षके वाचा. आपण आपल्या अभ्यासाच्या कोर्समध्ये या माहितीचा कसा विचार करतो याचे संक्षिप्त प्रदर्शन दाखवण्यास तुम्हाला आवडेल हे सांगा. अभ्यास सुरू केला किंवा नाही केला, तरी पुस्तक सादर करा आणि घरमालकाला ते वाचण्यास उत्तेजन द्या.
५ आज खऱ्या देवाच्या अचूक ज्ञानाला पुष्कळ लोक प्रतिसाद देत आहेत. (यश. २:२-४) होईल तितक्या जनांना यहोवाविषयी शिकण्यास आणि जीवनाप्रत नेण्यास मदत करण्याचा विशेषाधिकार आपल्याला आहे.—१ तीम. २:४.