“सार्वकालिक जीवन हेच आहे”
१ येशूचे, योहान १७:३ येथील शब्द गांभिर्याने घेण्यास हवेत. तो जे काही बोलला त्यात तत्त्वार्थ होता—देव आणि ख्रिस्त यांचे ज्ञान घेणे हेच सार्वकालिक जीवन! परंतु, केवळ यहोवा आणि येशू यांचे ज्ञान संपादित केल्यानेच आपल्याला अनंत जीवनाचे बक्षीस दिले जाईल का? नाही. यहोवा हा त्यांचा देव असल्याचे इस्राएलांना ठाऊक होते तरी त्यांच्या जीवनक्रमात हा विश्वास प्रवर्तित झाला नाही. परिणामस्वरुपी, ते त्याचे अनुमोदन गमावून बसले. (होशे. ४:१, २, ६) आज लाखो लोकांना “देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोम. १०:२) त्यांनी यहोवाला अर्थात ‘एकाच खऱ्या देवाला’ ओळखण्याची गरज आहे व उचितपणे त्याची सेवा कशी करावी हे शिकून घेण्यास हवे. त्याअर्थी, नोव्हेंबर महिन्यात आपण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करणार आहोत. ज्ञान पुस्तक प्रस्तुत करण्याकरता तुम्ही कोणता प्रस्ताव उपयोगात आणाल? तुम्हाला मदतदायी ठरू शकतील अशा काही सूचना येथे पुरवल्या आहेत.
२ तुमच्या क्षेत्रातील अनेक लोकांबरोबर बोलत असता तुम्हाला कदाचित वापरण्यास आवडेल अशी एक प्रस्तुती येथे दिली आहे:
◼ “जगात इतके नानाविध धर्म का आहेत याविषयी आम्ही आमच्या शेजाऱ्यांबरोबर बोलत आहोत. केवळ या देशातच निरनिराळे असे अनेक धार्मिक मार्ग आहेत आणि जगभरात १०,००० हून अधिक धार्मिक पंथ आहेत. तुमच्या मते हे विविध धर्म का अस्तित्वात आहेत बरे? [प्रतिसादास वाव द्या. ज्ञान पुस्तकातील अध्याय ५ उघडा आणि पहिला परिच्छेद वाचा.] हा अध्याय वाचल्याने तुम्हाला त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील. तुम्ही काळजीपूर्वक याचे परीक्षण करू इच्छित असल्यास हे पुस्तक तुम्हाला देण्यास मला आवडेल.” ते स्वीकारल्यास, पुनर्भेटीची निश्चित व्यवस्था करा आणि म्हणा: “मी पुन्हा येईल तेव्हा, सर्व धर्म एकाच ठिकाणी नेणारे केवळ विविध मार्ग आहेत का यावर आपण कदाचित चर्चा करू शकू.”
३ इतके सगळे धर्म अस्तित्वात का आहेत यावरील चर्चा चालू ठेवण्यास तुम्ही परतता तेव्हा असे म्हणू शकता:
◼ “मी मागच्या वेळी तुमच्याशी बोललो तेव्हा, सर्व धर्म एकाच ठिकाणी नेणारे केवळ विविध मार्ग आहेत का असा एक प्रश्न मी विचारला होता. याविषयी तुमचा काय विचार आहे? [प्रतिसादास वाव द्या.] याविषयी येशूने काय म्हटले ते, मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकातून दाखवू इच्छितो. [ज्ञान पुस्तकातील अध्याय ५ उघडा आणि परिच्छेद ६-७ वाचा; त्याबरोबरच मत्तय ७:२१-२३ देखील वाचा.] तुम्ही कदाचित विचारात पडाल, की देवाची इच्छा नेमकी काय आहे हे जाणून घेणे इतके महत्त्वपूर्ण का आहे. पुढील परिच्छेद अधिक माहितीयुक्त असल्याचे तुम्हाला आढळून येतील. कृपया या अध्यायाचा उर्वरित भाग वाचून काढा. पुढच्या वेळी मी पुन्हा येईन तेव्हा, उपासनेसंबंधी असणाऱ्या बाबींचे अचूक ज्ञान असण्याचे मोल काय आहे ते तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल.”
४ पृथ्वीवर सार्वकालिक जीवन जगण्याची कल्पना ही स्वतःस ख्रिस्ती म्हणवणाऱ्या लोकांकरता देखील नवखी असल्यामुळे ही प्रस्तावना कदाचित त्यांची आस्था वेधू शकेल:
◼ “आम्ही आमच्या शेजाऱ्यांना एक प्रश्न विचारत आहोत. तुम्हाला अशा एका जगात राहण्याचे आमंत्रण दिल्यास तुम्ही त्या आमंत्रणाचा स्वीकार कराल का? [ज्ञान पुस्तकातील ४-५ पृष्ठांवरील चित्र दाखवा. प्रतिसादास वाव द्या.] हा खरोखर तुमच्या जीवनातील सुखद अनुभव होऊ शकतो. पण, तुमच्या मते याची वास्तविकता पाहण्यासाठी तुम्ही स्वतः काय करण्यास हवं असं तुम्हाला वाटतं? [प्रतिसादास वाव द्या.] योहान १७:३ नुसार कोणत्या कार्यहालचालीची अपेक्षा केली जाते याकडे लक्ष द्या. [वाचा.] हे खास प्रकारचे ज्ञान संपादित करण्याकरता हे पुस्तक बहुविध लोकांकरता मदतदायी ठरत आहे. वाचण्याकरता तुम्हाला याची एक व्यक्तिगत प्रत ठेवण्यास आवडेल का? [प्रतिसादास वाव द्या.] याच पृथ्वीवर आपण सार्वकालिक जीवनाची प्राप्ती करू शकतो असा विश्वास बाळगणे इतके तर्कशुद्ध का आहे याची चर्चा आपण माझ्या पुढच्या भेटीत करू या.”
५ तुम्ही ज्यांच्याबरोबर योहान १७:३ ची चर्चा केली त्यांना परत भेट देत असता तुम्ही अशाप्रकारे चर्चा चालू ठेवू शकता:
◼ “माझ्या मागील भेटीदरम्यान मी योहान १७:३ मधील येशूचे मनोवेधक शब्द तुम्हास वाचून दाखवले; तेथे तो आपल्याला याची खात्री पुरवतो, की त्याचे तसेच देवाचे ज्ञान संपादणे याचाच अर्थ सार्वकालिक जीवन असा होतो. परंतु, उत्तम जीवन केवळ स्वर्गातच प्राप्त केले जाऊ शकते अशी बहुसंख्य लोकांची विचारधारणा आहे. याबाबत तुमचे काय मत आहे? [प्रतिसादास वाव द्या.] मी तुम्हाला दिलेले पुस्तक हाताशी असल्यास, पृथ्वीवर परादीसची पुनःस्थापना होणार हे शाबीत करणारी काही बायबलची वचने तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल. [ज्ञान पुस्तकातील पृष्ठे ९-१० यातील ११-१६ परिच्छेदांची चर्चा करा.] तुम्ही बायबलमध्ये आढळणाऱ्या ह्या अभिवचनांवर भरवसा का ठेवू शकता हे माझ्या पुढच्या भेटीत तुम्हाला दाखवण्यास मला आवडेल. दरम्यान, तुम्ही कदाचित ह्या पुस्तकाच्या तुमच्या व्यक्तिगत प्रतीमधून दुसऱ्या अध्यायाचे वाचन करू शकता.”
६ ज्यांचा बायबलवर थोडाफार विश्वास आहे अशांबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्यास एक थेट प्रस्ताव सहसा यशस्वी ठरू शकतो. येथे एक सुचविलेली प्रस्तावना आहे जी “युक्तिवाद” पुस्तकात पृष्ठ १२ वर आढळते:
◼ “मी तुम्हाला एक मोफत गृह बायबल अभ्यासक्रम सादर करण्याकरता तुमची भेट घेत आहे. तुमची अनुमती असल्यास, जवळजवळ २०० राष्ट्रांमधील लोक घरीच कौटुंबिक गट या नात्याने बायबलची चर्चा कशाप्रकारे करतात हे काही मिनिटांत प्रात्यक्षिकपणे तुम्हाला दाखवावयास मला आवडेल. यांपैकी कुठलाही विषय संभाषणाकरता आपण उपयोगात आणू. [ज्ञान पुस्तकाची अनुक्रमणिका दाखवा.] यातील कोणत्या विषयात तुम्हाला खास आस्था आहे?” निवड करण्याकरता त्या व्यक्तीला समय द्या. निवडलेल्या अध्यायाकडे वळा आणि पहिल्या परिच्छेदावरून अभ्यास सुरू करा.
७ बायबलशी परिचित नसलेल्या लोकांबरोबर अभ्यास सुरू करण्याकरता तुम्ही उपयोगात आणू शकता असा यशस्वी ठरलेला एक थेट प्रस्ताव येथे पुरवला आहे:
◼ “बहुसंख्य लोक असा विश्वास बाळगतात की बायबल, बुद्धीने ओतप्रोत भरलेला एक पवित्र ग्रंथ आहे; असे असले तरी त्यांना त्यातून काही शिकून घेण्याची संधी अद्याप लाभलेली नाही. मी मोफत बायबल अभ्यास चालवतो आणि जादा विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करण्याकरता माझ्याजवळ वेळ आहे. याकरता आम्ही या बायबल अभ्यासाच्या साधनाचा उपयोग करतो. [ज्ञान पुस्तक दाखवा.] हा अभ्यासक्रम केवळ काही महिन्यांचाच आहे आणि पुढील प्रश्नांची उत्तरे बायबल कसे देते हे ते दाखवून देते, जसे की: देव दुःखाला अनुमती का देतो? आपण वृद्ध होतो व मरतो ते का? आपल्या मृत प्रियजनांचे काय होते? अभ्यासाचे एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवू शकतो का?” अभ्यासाची प्रस्तुती नाकारल्यास, ज्ञान पुस्तक सादर करा व त्या व्यक्तीला स्वतः त्याचे वाचन करण्याचे उत्तेजन द्या.
८ देवाचे आणि ख्रिस्ताचे ज्ञान आपल्यापाशी बाळगणाऱ्या प्रत्येकाकरता हा केवढा मोठा खजिना आहे! ते संपादित करणे याचा खरोखर अर्थ म्हणजे परिपूर्ण परिस्थितींत सार्वकालिक जीवन होय. तर मग, नोव्हेंबर महिन्यादरम्यान आपण इतरांबरोबर सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ज्ञानाची सहभागिता करण्याकरता हरएक संधीचा फायदा घेऊ या.