वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९६ पृ. ३
  • तयारी—यशाची गुरुकिल्ली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तयारी—यशाची गुरुकिल्ली
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • चांगली तयारी करून—वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करा
    आमची राज्य सेवा—२००६
  • पूर्वतयारी केल्याने आनंद मिळतो
    आमची राज्य सेवा—१९९९
  • “प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध” असा
    आमची राज्य सेवा—२००८
  • परिणामकारक असल्यास तिचा उपयोग करा!
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ३/९६ पृ. ३

तयारी—यशाची गुरुकिल्ली

१ सेवेची पूर्वतयारी केल्याने, क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यामध्ये करत असलेल्या कोणत्याही कुचराईवर मात करण्यास एखाद्याला मदत मिळेल. तुम्ही दरवाजाजवळ जात असताना, घरमालकांना काय म्हणायचे ते तुम्हाला उमगेल. ज्या अडचणींना तोंड द्यावे लागेल त्याची भीती तुम्हाला बाळगण्याची गरज नाही. सेवेतून घरी परतल्यावर, तुम्हाला उत्तेजन मिळाल्याचे जाणवेल व सेवेत तुम्ही खूप प्रयास केला याची जाणीव तुम्हाला होईल. होय, संपूर्ण तयारी ही प्रचार आणि शिकवण्याच्या कौशल्यांना तेज करण्याची गुरुकिल्ली आहे.

२ पौलाने आपल्याला “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी” चढवण्यास आर्जवून तयारी करण्यावर जोर दिला. (इफिस. ६:१५) यामध्ये आपल्या मनाची आणि अंतःकरणाची तयारी करणे तसेच सकारात्मक दृष्टिकोन आणि ऐच्छिक मनोवृत्ती धारण करणे यांचा समावेश होतो. इतरांसोबत सत्याची सहभागिता करण्यास आपण तयार असतो, तेव्हा राज्याच्या फळांद्वारे आपल्या श्रमाला प्रतिफळ मिळेल व यामुळे आपल्याला आनंद मिळेल.—प्रे. कृत्ये २०:३५.

३ प्रचार कार्यासाठी तयारी कशी करावी: कदाचित युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकात सुचवलेल्या किंवा आमची राज्य सेवा हिच्या शेवटल्या पानावर आढळणाऱ्‍या प्रस्तावनांपैकी आपल्याला सहजसोपी वाटणारी एखादी निवडावी. तुम्हाला जे शास्त्रवचन वापरायचे आहे त्याचा काळजीपूर्वक विचार करा, आणि तुमचा मुख्य मुद्दा ठळक मांडण्यासाठी तुम्ही कोणत्या शब्दांवर किंवा वाक्यांशावर जोर देणार ते ठरवा. सादरता पाठ करण्याची काही गरज नाही; त्याऐवजी, तुमच्या मनात ती कल्पना ठेवणे, तिला तुमच्या स्वतःच्या शब्दांत मांडणे आणि तुमच्या मते तुमचे ऐकणाऱ्‍याला अपीलकारक वाटेल अशा पद्धतीने ते व्यक्‍त करणे अधिक उत्तम असेल.

४ तुम्ही जे प्रकाशन सादर करू इच्छिता त्याचे परीक्षण करा, आणि त्यातील बोलण्याजोगे काही मनोवेधक मुद्दे निवडा. तुमच्या मते, तुमच्या क्षेत्रातील लोकांना आस्थेचे वाटेल असे काही निवडा. वेगवेगळ्या घरमालकांकरता—पुरुष, स्त्री, एखादी वृद्ध व्यक्‍ती किंवा युवक—यांच्याशी तुम्ही तुमची सादरता कशी जुळवून घेणार याचा विचार करा.

५ सराव सत्रे घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? कोणत्या सादरता प्रभावकारी असतील याची चर्चा करण्याकरता कौटुंबिक सदस्यांसोबत किंवा इतर प्रचारकांसोबत एकत्र या आणि मग मोठ्या आवाजात त्यांचा सराव करा जेणेकरून सर्वांना ती नीट लक्षात ठेवता येतील. क्षेत्रात कदाचित आढळतील अशा प्रत्यक्ष स्थितींचा आणि आक्षेपांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. अशा सरावामुळे तुमचा बोलण्यातील अस्खलितपणा सुधारेल, प्रचारातील तुमचा प्रभावकारीपणा वाढेल आणि तुमचा आत्मविश्‍वास बळकट होईल.

६ तुमच्या सादरतेची तयारी आणि सराव करण्याव्यतिरिक्‍त, तुम्ही स्वतःला असे देखील विचारले पाहिजे, की ‘मी जे कपडे घालण्याचा विचार करतो ती सेवेकरता उपयुक्‍त आहेत का? माझ्या बॅगेत आवश्‍यक असलेले सर्वकाही तसेच मी उपयोगात आणण्याचा विचार करत असलेले साहित्य देखील आहे का? ते सुस्थितीत आहे का? माझ्याजवळ माझे युक्‍तिवाद पुस्तक, पत्रिका, घरोघरच्या कार्याची नोंदपत्रके आणि पेन आहे का?’ आधीच केलेली विचारपूर्वक योजना सेवेतील अधिक फलदायी दिवसाला हातभार लावील.

७ स्वतःला तयार करण्याकरता आपण होईल तितके केल्यास, आपल्याला यशस्वी होण्यास मदत करण्याकरता यहोवाच्या पवित्र आत्म्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. (१ योहा. ५:१४, १५) तयारीकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याने, आपल्याला ‘सोपविलेली सेवा पूर्ण करत’ असताना आपल्या कार्यात अधिक आनंद मिळेल.—२ तीम. ४:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा