तुमची एक स्थायी मागणी आहे का?
१ तुम्ही क्षेत्र सेवेच्या सभांना गेला आणि तुमच्या सेवेच्या बॅगेत नियतकालिकेच नाहीत, असे कधी तुमच्या बाबतीत घडले का? असल्यास, जानेवारी १९९६ च्या आमची राज्य सेवा अंकातील पुरवणीची आठवण करा ज्याचे शीर्षक होते: “आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा.” सदर पुरवणीत आपल्याला असे सांगण्यात आले होते की, “एक ठराविक नियतकालिक मागणी असू द्या,” आणि पुढे असे म्हटले होते की, “नियतकालिकांची हाताळणी करणाऱ्या बांधवाकडे प्रत्येक अंकाच्या ठराविक प्रतींसाठी एक व्यावहारिक मागणी करा. अशाप्रकारे तुमच्याजवळ व तुमच्या कुटुंबाजवळ नियतकालिकांचा एक नियमित व पुरेसा साठा असेल.” तुम्ही हे केले आहे का?
२ नसल्यास, तुम्ही आता नियतकालिकांची एक स्थायी मागणी करू शकता. त्यामुळे दर आठवडी तुम्ही अधिक जबाबदारीने या नियतकालिकांचे वितरण कराल आणि असे करण्यात तुम्हाला अधिक आनंदही मिळेल. नियतकालिकांची एक स्थायी मागणी तुम्ही आधीच केलेली असल्यास सेवेत दर महिना सरासरी जितकी नियतकालिके लागतात तितकी नियतकालिके तुम्ही मागितलेली आहेत का याचे पुन्हा एकदा परीक्षण करून पाहा. अर्थात, दर आठवडी अगदी कर्तव्यनिष्ठेने आपण नियतकालिक विभागाकडून आपापली नियतकालिके प्रामाणिकपणे घेण्यास हवीत. तुम्ही अधिक काळ मंडळीत गैरहजर होणार असल्यास तुम्ही येईपर्यंत तुमची नियतकालिके दुसऱ्यांना द्यावीत की कसे याबद्दल नियतकालिक सेवकाला सांगावे.
३ वर उल्लेखिलेल्या पुरवणीत असेही सांगण्यात आले होते, की “नियमित नियतकालिक दिवसाची योजना करा.” मग तुम्ही साप्ताहिक नियतकालिक दिवसात सहभाग घेऊ शकता का? यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९९ च्या दिनदर्शिकेत (इंग्रजी) दर शनिवार हा नियतकालिक दिवस म्हणून दाखवलेला आहे! टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांचे वितरण करण्याच्या महत्त्वाला कमी लेखू नका. आपण नियतकालिक कार्यात पूर्णार्थाने सहभाग घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरे तर आपण आपल्या शेजाऱ्यांना ‘शुभवृत्त विदित करत असतो.’—यश. ५२:७.