तुम्ही फेरबदल करण्यास तयार आहात का?
१. जगाची बदलणारी परिस्थिती लक्षात घेता आपल्याला कोणते फेरबदल करण्याची गरज आहे?
१ पहिले करिंथकर ७:३१ मध्ये जगाची तुलना रंगमंचाशी करण्यात आली आहे ज्यातील दृश्य आणि कलाकार नेहमी बदलत असतात. जगामध्ये होत असलेल्या बदलांमुळे आपल्याला वेळोवेळी आपल्या प्रचार करण्याच्या पद्धतींमध्ये, दिनक्रमात आणि प्रस्तावनेत फेरबदल करण्याची गरज आहे. तुम्ही असे फेरबदल करण्यास तयार आहात का?
२. आपण संघटनेच्या गतीने फेरबदल का केले पाहिजेत?
२ तुमची प्रचार करण्याची पद्धत: सुरुवातीपासूनच ख्रिस्ती मंडळ्या नेहमी फेरबदल करत आल्या आहेत. जेव्हा येशूने सुरुवातीला प्रचार कार्यासाठी त्याच्या शिष्यांना पाठवले तेव्हा त्यांनी सोबत वाटेसाठी झोळणा किंवा पैशाची पिशवी घेऊ नये असे सांगितले. (मत्त. १०:९, १०) पण, त्याच्या शिष्यांचा भविष्यामध्ये छळ केला जाईल आणि प्रचाराचे क्षेत्र विस्तारले जाईल म्हणून नंतर त्याने सूचनांत काही फेरबदल केले. (लूक २२:३६) मागील शतकात यहोवाच्या संघटनेने वेळेची गरज ओळखून प्रचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा जसे की, बायबलचा संदेश असलेले कार्ड्स, रेडिओवरील भाषणे आणि साऊंड कार यांचा उपयोग केला आहे. आज बऱ्याच क्षेत्रात फार कमी लोक घरी भेटतात त्यामुळे घरोघरच्या साक्षकार्यासोबतच औपचारिक आणि अनौपचारिक साक्षकार्य करण्याचे प्रोत्साहन आपल्याला देण्यात आले आहे. तसेच, जर लोक दिवसा कामावर असतील तर संध्याकाळी घरोघरचे साक्षकार्य करण्याचे प्रोत्साहनसुद्धा देण्यात आले आहे. तर मग यहोवाचा स्वर्गीय रथ ज्या गतीने फेरबदल करत आहे त्याच गतीने आपणदेखील फेरबदल करत आहोत का?—यहे. १:२०, २१.
३. सादरीकरणात फेरबदल केल्यामुळे आपले सेवाकार्य आणखी प्रभावकारी कसे होऊ शकते?
३ तुमचे सादरीकरण: सध्या तुमच्या क्षेत्रातील लोक कोणत्या गोष्टीने चिंतित आहेत? पैशांची तंगी? कौटुंबिक समस्या? गुन्हेगारी? आपल्या क्षेत्रात नेहमी घडत असलेल्या घडामोडी आणि समस्या यांविषयी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे; यांनुसार आपण क्षेत्रात लागू होणारे सादरीकरण तयार करू शकतो. (१ करिंथ. ९:२०-२३) जेव्हा घरमालक त्याचे मत मांडतो तेव्हा त्याच्यावर आपली नेहमीची प्रतिक्रिया देऊन आपण तयार केलेले सादरीकरण पुढे बोलत राहण्याऐवजी, घरमालकाची परिस्थिती लक्षात घेऊन सादरीकरणात फेरबदल करणे फायद्याचे ठरेल.
४. आपण वेळ न घालवता फेरबदल का केले पाहिजेत?
४ लवकरच या जगाचे “बाह्य स्वरूप” संपुष्टात येईल आणि मोठ्या संकटास सुरुवात होईल. बायबल म्हणते, “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथ. ७:२९) तर मग, वेळ न घालवता फेरबदल करणे किती महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण उरलेल्या वेळेत खूप काही साध्य करू शकू!