वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९४ पृ. १
  • आपला राज्य प्रचार सुधारण्याचे मार्ग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला राज्य प्रचार सुधारण्याचे मार्ग
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • चांगली तयारी करून—वैयक्‍तिक आस्था व्यक्‍त करा
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिक सादर करण्याची तयारी कशी कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • प्रचार करण्यासाठी नवीन लोकांना प्रशिक्षित कसे करावे?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ११/९४ पृ. १

आपला राज्य प्रचार सुधारण्याचे मार्ग

१ आपल्या प्रचाराचे कार्य पूर्वीपेक्षा आता अधिक निकडीचे आहे. लोक जिवंत राहतील किंवा मरतील हे सुवार्तेला ते कशी प्रतिक्रिया दाखवतात यावर अवलंबून आहे. (१ पेत्र ४:५, ६, १७; प्रकटी. १४:६, ७) या कारणास्तव आपला राज्य प्रचार सुधारण्याचे मार्ग आपण नेहमी शोधत राहिले पाहिजेत. सुधारणा करण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

२ चांगली तयारी करा: आमची राज्य वा हिच्या अलिकडील अंकाचा उपयोग करून तुमच्या क्षेत्रातील पुष्कळ लोकांना अपीलकारक ठरेल अशा तुम्हाला वाटणाऱ्‍या एखाद्या सादरतेची निवड करा. तुमचे वक्‍तव्य स्थानिक परिस्थितींप्रमाणे जुळवणे हे महत्त्वाचे आहे. किंवा तुम्हाला व्यक्‍तिगतरित्या परिणामकारक वाटणाऱ्‍या कल्पना किंवा शास्त्रवचनांचा उपयोग करून स्वतःची सादरता तयार करण्यास कदाचित तुम्हाला आवडेल. आस्था-उत्पन्‍न करणाऱ्‍या एखाद्या प्रस्तावनेची तुम्हाला गरज भासेल. (रिझनिंग पुस्तक, पृष्ठे ९-१५ पाहा.) तुम्ही कदाचित विचारास प्रवृत्त करणारा एखादा प्रश्‍न किंवा स्थानिक आस्थेच्या एखाद्या वार्तेबद्दल घरमालकाचे विवेचन विचारण्याचे ठरवत असाल. तुमच्या मनात तुमची सादरता असल्यास, कुटुंबाच्या अशा सदस्याबरोबर किंवा एखाद्या प्रचारकाबरोबर त्याचा सराव करा जे तुम्हाला सुधारण्यासाठी काही सुचवू शकतील.

३ लोकांशी संभाषण करा: आपला उद्देश, एक महत्त्वपूर्ण संदेश देणे हा आहे. आपल्या ऐकणाऱ्‍या व्यक्‍तीला एका अर्थपूर्ण संभाषणात गोवून हे साध्य केले जाऊ शकते. घरमालक आक्षेप घेतात किंवा मत मांडतात, तेव्हा त्याला जे सांगायचे आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. त्याच्या विवेचनांमुळे तुम्ही बाळगत असणाऱ्‍या आशेचे शास्त्रवचनीय उत्तर देण्यास ते तुम्हाला मदत करील. (१ पेत्र ३:१५) त्याचा दृष्टिकोन बायबलच्या एकमतात नसेल, तर तुम्ही चातुर्याने असे म्हणू शकता: “तुमच्याप्रमाणेच पुष्कळांना तसेच वाटते. तरीसुद्धा, या विषयाकडे पाहण्याचा एक दुसरा मार्ग आहे.” त्यानंतर एखादे उचित शास्त्रवचन वाचा आणि त्यावर त्यांचे विवेचन मिळवा.

४ एक लवचीक आराखडा ठेवा: तुम्ही लोकांशी बोलू शकला नाहीत तर चांगली तयारी केल्याचे काहीच मूल्य राहणार नाही. आजकाल, आपण भेटी देतो तेव्हा केवळ थोडकेच घरमालक सापडणे सामान्य गोष्ट आहे. तुमच्या क्षेत्रात हीच बाब असेल, तर अधिक लोक घरात असतील अशा वेळी घरोघरचे कार्य करणे शक्य होण्यासाठी तुमच्या आराखड्यात काही तडजोड करा. भेटी देण्याची सर्वात उत्तम वेळ सप्ताहांत आहे असे तुम्हाला आढळून येईल; इतरजण सप्ताहाच्या दरम्यानच परंतु बहुतेककरून सायंकाळी घरी भेटू शकतील. काही भागांमध्ये प्रचारकांना जगिक सुट्यांच्या दिवशी प्रचार करणे फायदेकारक वाटते कारण त्यावेळी त्यांना अधिक लोक घरात भेटतात. अशावेळी लोक आरामात असतील आणि संभाषण करण्यासाठी अधिक इच्छुक असतील. तुमची प्रस्तावना त्या प्रसंगाशी जुळवणे आणि नंतर एखाद्या शास्त्रवचनीय विषयासोबत तुमचे बोलणे जोडणे हे उचित असेल.

५ तुमच्या सादरतेच्या परिणामकारकतेचे परीक्षण करा: प्रत्येक दरवाजातून निघाल्यावर, स्वतःला विचारा: ‘मी घरमालकाच्या अंतःकरणाप्रत पोहंचलो का? मी त्याला त्याचे मत व्यक्‍त करण्यास लावले का आणि त्याला जे सांगायचे होते त्याकडे लक्ष दिले का? मी चातुर्याने उत्तर दिले का? परिस्थितींना लक्षात घेऊन, मी उत्तम पद्धत वापरली का?’ स्वतःचा परिणामकारकपणा वाढवण्याच्या हेतूने एखाद्या अनुभवी प्रचारकासोबत किंवा पायनियरासोबत वेळोवेळी कार्य करणे आणि तुमच्या सेवाकार्यात त्यांच्या सादरता लक्षपूर्वक ऐकणे साहाय्यकारी ठरेल.

६ तुम्ही तुमच्या कार्यात कौशल्यपूर्ण असाल, तर ‘स्वतःचे व तुमच्या ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधणाऱ्‍या’ राज्याच्या सत्याची सहभागिता तुम्ही करू शकाल.—१ तीम. ४:१६; नीती. २२:२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा