लावणे व पाणी घालणे—शिष्य बनविण्यातील पावले
१ “मी लाविले, अप्पुलोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले.” (१ करिंथ. ३:६) अशापद्धतीने, प्रेषित पौलाने ख्रिस्ताचे शिष्य बनविण्यामध्ये असणाऱ्या तीन मूलभूत पावलांची ओळख करून दिली. लावणे व पाणी घालणे या पहिल्या दोन गोष्टीत देवाच्या समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या सेवकांवरील जबाबदारी व हक्क समाविष्ट आहेत.
२ येथे जाहीरपणे, घरोघर तसेच अनौपचारिकपणे व इतर मार्गांनी प्रचार करण्याची हाक आहे. शिवाय लोकांना, येशूने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टींचे शिक्षण प्रगतिकारकपणे देण्याचेही समाविष्ट आहे. (मत्तय २८:१९, २०) हे नंतरचे पाऊल केवळ आस्था दाखविणाऱ्यांच्या पुनर्भेटी घेणे व त्यांच्याबरोबर पवित्र शास्त्राविषयीची चर्चा करून पवित्र शास्त्राभ्यास चालविणे याद्वारे पूर्ण करता येते. तर मग, सत्याच्या बिजाची लावणी करून आणि परत जाऊन जरूरीप्रमाणे पाणी घालणे व मशागत करणे याद्वारे यहोवाला सहकार्य देण्यामध्ये तुम्ही एक निष्ठावान सहकारी असल्याचे दाखवून देत आहात का?—१ करिंथ ३:९.
संभाव्यता तसेच गरज ओळखणे
३ भारतात आम्ही १९९०च्या कार्यवर्षात जवळपास ४,१४,००० पुस्तके, पुस्तिका आणि ८,९४,००० मासिकांचे वितरण केले! तसेच स्मारकविधीला २८,००० पेक्षा अधिक लोक होते व हे त्या वर्षांच्या ९,७२५ सरासरी प्रचारकांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक होते. प्रकाशनांचे वितरण हे आमच्या कामातील ‘लावणे’ या भागाचा अंतर्गत भाग आहे. अशा पद्धतीने लावण्यात आलेले सत्याचे बीज नव्या शिष्यांच्या निर्मितीची प्रचंड संभाव्यता राखून आहे. पण आम्ही देवाचे सहकारी या अर्थाने या लोकांना पुनर्भेटी देण्यासाठी व त्यांची पवित्र शास्त्र विषयासंबंधाने आस्था वाढविण्यासाठी खरेच पुढे होत आहोत का? भारतातील मंडळ्यातील प्रचारक सरासरी ०.४ पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत आहेत. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की, जर प्रत्येक प्रचारकाने आपल्या व्यक्तीगत जबाबदारीचे अधिक अचूकपणे परीक्षण केले व नुसते बी लावण्यापेक्षा त्यापलिकडे जाऊन प्रगतिशील पवित्र शास्त्र अभ्यास करण्यासाठी पुढे आलो तर नक्कीच ही सरासरी अधिक सुधारेल. विविध अशा मर्यादांमुळे जरी काहींना एक किंवा अधिक पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे जमले नाही तरी प्रत्येकाने स्वतःच्या व्यक्तीगत स्थितीची उजळणी करून पाहाणे हे बरे ठरेल.
४ याविषयी काही क्षेत्रात जे घडत आहे ते पाहाणे मनोरंजक आहे. मंडळीकडे फलदायी क्षेत्रे आहेत व ते एका प्रचारकांमागे एक किंवा दोन पवित्र शास्त्र अभ्यासाची सरासरी कळवतात. चालविल्या जाणाऱ्या पवित्र शास्त्र अभ्यासांच्या संख्येनुरुप नव्या शिष्यांची वाढही दिसून येते. ही गोष्ट आपल्याला १९९१ वार्षिक अहवाल पुस्तक यात काही देशातील प्रचारकांची सरासरी संख्या तसेच तेथे चालविले जाणारे पवित्र शास्त्र अभ्यास याद्वारे दिसून येऊ शकेल.
५ आम्ही राज्य संदेशाच्या करीत असलेल्या प्रचारास प्रतिसाद दाखवणाऱ्या लोकांसंबंधाने असलेल्या प्रेमाने आम्हाला पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची प्रेरणा दिली पाहिजे. यहोवा लोकांविषयी जी काळजी राखून आहे तीच आम्हीही राखावी व त्यांच्या आध्यात्मिक वाढीवरच त्यांचे तारण अवलंबून आहे हे ओळखले पाहिजे. (१ पेत्र २:२) खरोखरीच्या वनस्पतीची वाढ होण्यासाठी जशी पाणी घालण्याची जरुरी आहे तसेच राज्य संदेशाविषयी प्रथमदर्शनी आस्था दाखविणारे लोक, त्यांना पवित्र शास्त्र अभ्यासाच्या माध्यमाने देवाच्या संस्थेकडे नियमित रुपाने मार्गदर्शित केले नाही तर सभांना येऊच शकणार नाहीत.
६ येथे आम्हास दाखवावा लागणारा आज्ञाधारकपणाही दृश्यात येतो. येशूने म्हटले की, सत्याच्या बाजूला असणारे लोक त्याची वाणी ऐकतील. (योहान १८:३७) त्याने आपल्या शिष्यांना प्रचार करण्याची व शिकवण्याची आज्ञा केली व हे कार्य करता यावे म्हणून त्यांना सिद्धही बनविले. येशूचे शिक्षक या नात्याचे अप्रतिम उदाहरण तसेच त्याने लोकांविषयी दाखवलेली काळजी यावर त्याने आम्हासाठी, इतरांना मदत देता यावी म्हणून एक आदर्श मांडला. (लूक ६:४०; योहान १३:१३; १४:१२) तेव्हा, आमचे प्रयत्न हे आम्हासाठी तसेच ज्यांना आम्ही शिकवतो अशांच्याही तारणासाठी परिणामी ठरतील.—१ तीम. ४:१६.
पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी मदत
७ एखादा कुशल कारागीर आपले काम पूर्णपणे करावे यासाठी हाताशी असणाऱ्या विविध अवजारांमधील निवडक अवजारे घेतो. शिक्षक या नात्याने आम्हापाशी वापरण्याजोगी विविध प्रकाशने, माहितीपत्रके व हस्तपत्रिका आहेत. हे सर्व आम्हाला विविध पार्श्वभूमीच्या व विविध दृष्टीकोणाच्या लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्यात मदत मिळावी यासाठी योजलेले आहे.
८ काही प्रचारकांनी हस्तपत्रिका व माहितीपत्रके वापरुन पवित्र शास्त्राच्या चर्चेस सुरवात करण्यात चांगले यश संपादण्याचा अनुभव मिळविला आहे. उदाहरणार्थ, शांतीमय नव्या जगातील जीवन यात २० वेगवेगळी शास्त्रवचने देण्यात आली असून ती या अद्भूत आशेची चांगली माहिती देतात. या शास्त्रवचनांचा विविध अशा उत्साहदायक पवित्र शास्त्रीय चर्चा वाढविण्यात उपयोग करता येईल. आमची लक्ष आकर्षून घेणारी व साधी माहितीपत्रके लोकांना मूलभूत पवित्र शास्त्रीय सत्याचा परिचय करून देण्यात व त्यांना आणखी माहितीचे संशोधन करण्याची चालना देतात.
९ अपुरे प्रापंचिक शिक्षण तसेच डोळ्यांनी कमी दिसते अशा कोणाची आपणास ओळख आहे का? अशा लोकांसोबत प्रगतिशील अशी पवित्र शास्त्रीय चर्चा प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! या माहितीपत्रकाचा उपयोग केला आहे का? तसेच “पाहा!” माहितीपत्रक हे सुद्धा एक आणखी असे सुंदर अवजार आहे ज्यातील सुरवातीचे परिच्छेद घरमालकाला देवाने भविष्याविषयी दिलेल्या अभिवचनांविषयी शिकून घेण्यासाठी चतुरपणे गोवून घेतात. याचप्रमाणे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे १९८२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक हे त्यानंतर ज्या १७,००,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला त्यातील मोठ्या संख्येला मदत करण्यात नक्कीच साहाय्यक ठरले आहे.
आस्थेवाईकांच्या बाबतीत जबाबदारपणे हालचाल करणे
१० मंडळीतील तुमचे प्रचारक कार्ड काढून गेल्या १२ महिन्यात तुम्ही किती पुस्तके, पुस्तिका (माहितीपत्रकासहित), आणि मासिके वितरीत केली ते लक्षात घेणे लाभदायक दिसेल. ती सर्व वितरीत करण्यामध्येच त्याचा शेवट झाला का? किंवा तुम्ही लावणे या पावलाच्या आणखी एक पाऊल पुढे गेला? ज्या लोकांनी आमची प्रकाशने घेण्यात जी आस्था दाखवली त्यांच्यापैकी किती जणांची तुम्ही लवकर भेट घेण्याचा प्रयत्न केला? तुम्ही लाविलेल्या बीचे रुपांतर अंकुर फुटण्यात झाले आहे हे बघण्यात तुम्ही परतला होता का? त्यांनतर नियमितपणे पाणी देण्यासाठी तुम्ही परत गेला होता व यहोवाने ते बी वाढवावे यासाठी त्याची प्रार्थना केली का?—पडताळा प्रे. कृत्ये १६:१४ व २ थेस्सलनी ३:१.
११ तुम्हाला अपुरेपणा वाटत असल्यामुळे कदाचित तुम्ही पुनर्भेंटी घेतल्या नसतील व पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु केला नसेल. खरे म्हणजे तुम्हातील क्षमतेच्या उणीवेपेक्षा तुमची प्रवृत्ती येथे कारणीभूत आहे. यहोवाने आपल्या लोकांना सिद्ध न करता तसेच लायक न करता या कामावर पाठविले नाही. तो तर आपले पवित्र वचन व संस्था याद्वारे आम्हाला “प्रत्येक प्रकारच्या कामात” तयार करीत असतो. (२ तीमथ्य ३:१६, १७; २ करिंथ ३:५, ६) पवित्र आत्मा, छापील पृष्ठ, व्यासपीठावरुन दिल्या जाणाऱ्या तोंडी सूचना तसेच प्रात्यक्षिके आणि कुशल व भक्तीमान सेवकांची जिवंत उदाहरणे यांच्या माध्यमातून तो आम्हास मदत देण्यास तयार असतो, व आम्हाला ज्याची गरज आहे ते तो देतो. पवित्र शास्त्राचा अभ्यास चालविता यावा यासाठी जगातील उच्च शिक्षणाची काही आवश्यकता नाही. तथापि, यहोवाच्या संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या श्रेष्ठ आध्यात्मिक शिक्षणाला आम्ही प्रतिसाद देणे जरुरीचे आहे.—पडताळा प्रे. कृत्ये ४:१३.
१२ याचप्रमाणे, आमची राज्य सेवा, ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा, सेवा सभा तसेच शिक्षणाच्या इतर माध्यमाने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे व्यक्तीगत अवलंबन जरुरीचे आहे. प्रेषित पौलाने इब्री ख्रिश्चनांना अगदी स्पष्टपणे म्हटले होतेः “वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हावयास पाहिजे होता, पण तुम्हाला देवाच्या वचनांची मूळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची जरूरी आहे.” (इब्री. ५:१२) कोणा व्यवसायात कित्येक वर्षे काम करणाऱ्यांच्या बाबतीत ही अपेक्षा असते की, त्याने आपल्या अवजारांच्या वापराविषयी चांगली कुशलता हस्तगत केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपणही प्रांजळ आस्था दाखवली व शिकस्तीने प्रयत्न केला तर पवित्र शास्त्रीय चर्चा हाताळण्यातील प्रगति दिसून येऊ शकेल.—नीती. १२:२४; २२:२९.
१३ राज्य संदेशाच्या बाबतीत आस्था दाखविणाऱ्यांना परत भेटणे व पवित्र शास्त्रावरील पुढील चर्चा हाताळणे यासाठी वेळ व प्रयत्न खर्ची घालावे लागतात. आम्हीही केवळ यहोवाचे प्रेम व त्याची विपुल दया यामुळेच सत्यामध्ये येऊ शकलो ही आवड बाळगली पाहिजे. आमच्या बाबतीत देवाचे हे गुण, आम्हास कितीतरी तास सत्याचे सहनशीलतेने शिक्षण देणाऱ्या त्या बांधवाच्या द्वारे व्यक्त करण्यात आले. या प्रेमामुळेच आपणही शिष्य बनविण्याच्या महत्त्वपूर्ण कामासाठी आवश्यक असणारा वेळ काढून तो यासाठी खर्च करण्याची चालना आम्हाला मिळावी.—२ करिंथ. ५:१४, १५; इफिस ५:१५, १६.
१४ पुष्कळ मंडळ्यांनी सांयकाळचे साक्षीकार्य करावे ही संस्थेने दिलेली सूचना अनुसरली आहे. आस्था दाखवली आहे अशांच्या भेटी घेण्याची सायंकाळची सुरवातीची वेळ चांगली असते. प्रभावी रुपाच्या पुनर्भेटी घेण्यासाठी व पवित्र शास्त्र अभ्यासाची सुरवात करण्यासाठी, ज्याला साक्ष देण्यात आली त्याविषयीची आवश्यक माहिती देणाऱ्या घरोघरच्या कार्याच्या नोंदीचा कपटा जरुरीचा आहे. हा कपटा एका पुस्तकात किंवा पवित्र शास्त्रात घालून तो विसरुन जाऊ नका. आठवडे निघून गेले व परत भेट घेण्याचे विसरले तर सैतानाचे हस्तक येऊन त्या माणसाची भेट घेतील व ते त्याच्या अंतःकरणात असणारे बी काढून घेतील. असे करण्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. (लूक ८:१२) तर मग, सैतानाच्या या कुयुक्तीला, लवकरच पुनर्भेटी घेण्याद्वारे तुम्ही उधळून लावाल का? आपली जबाबदारी ओळखली व आपल्या हक्काची कदर केली तर तुम्ही शक्यतो लवकर भेट घ्याल.—१ करिंथ ९:१६, २३.
पवित्र शास्त्र अभ्यास सुरु कसा करावा
१५ पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यामध्ये कठीण व गुंतागुंतीची पद्धत समाविष्ट नाही. काही लोक तर, तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याचा सरळ प्रस्ताव मांडताच तो लागलेच स्वीकार करतील. पण बहुतेक प्रचारक अभ्यासाचा उल्लेख करण्याचे टाळतात व पवित्र शास्त्रीय चर्चा तेथपर्यंतच नेतात.
१६ लोकांविषयीचे प्रेम व त्यांना मदत करण्याची इच्छा जरुरीची आहे. उत्तम तयारी करण्याची देखील गरज आहे. यात तुम्ही आधी त्या विशिष्ठासोबत केलेल्या चर्चेची व आता पुढील पवित्र शास्त्रीय चर्चा करण्यात कोणता पुढचा पवित्रा घेणार याविषयी उजळणी करण्याचे समाविष्ठ असावे. तुमच्या विवेचनात सर्वसाधारण मार्गदर्शन देण्याचा विचार असावा. पूर्वी चर्चिलेल्या विषयाबद्दल आणखी थोडीफार शास्त्रवचने निवडणार का? किंवा घरमालकाला दिलेली हस्तपत्रिका अथवा पुस्तक उघडून त्यातील आरंभाच्या काही परिच्छेदांची चर्चा त्याच्याशी कराल? घरमालकाने रस दाखविलेला विषय तुम्ही हाताळण्यासाठी घेऊ शकाल. आरंभाला केवळ १० ते १५ मिनिटेच घ्या. मग हा वेळ घरमालकाने दाखविलेल्या आस्थेच्या अनुषंगाने हळूवारपणे वाढवू शकता. पुढे कसे प्रगमन करावे व किती काळ थांबावे याबद्दलचा सारासार विचार तुम्हाला साहाय्यक ठरला पाहिजे.
१७ शिष्य बनविण्याच्या कामी प्रगतिशील पावले उचलावीत म्हणून कितीतरी वर्षांमधून मुबलक साहाय्यक सूचना दिल्या गेल्या आहेत. नोव्हेंबर तसेच डिसेंबर १९९० च्या आमची राज्य सेवा याच्या अंकातून मालिकेच्या रुपात “प्रभावी पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे अंतःकरणाप्रत पोहंचा,” आणि “पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला यहोवाच्या संस्थेकडे निरविणे” या लेखाद्वारे त्या देण्यात आल्या. आमची राज्य सेवा याच्या मार्च १९८७ च्या अंकात “घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासाची तयारी करणे व तो चालविणे” हा लेख देण्यात आला होता. तसेच इंडेक्स मध्ये “बायबल स्टडीज्” या सदराखाली मिळणाऱ्या माहितीचे त्वरेने परिक्षण केल्यास तुम्हाला अधिक साहाय्यक माहिती मिळू शकेल.
१८ अभ्यास कसा चालवावा याचा नमुना बघायचा असेल तर मंडळीचा पुस्तक अभ्यास कसा चालविला जातो त्याकडे लक्ष द्या. हे खरे की, घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासात आपण केवढ्या साहित्याचा अभ्यास करणार हे आधी ठरवत नसतो. यासाठी तो किती हाताळावा हे तुम्ही आपल्या विद्यार्थ्याची क्षमता व त्याच्या गरजा याला अनुलक्षून ठरविले पाहिजे. अर्थातच, अभ्यास प्रभावीपणे चालविण्यासंबंधीच्या उपयुक्त सूचना सेवा देखरेखे, तसेच इतर अनुभवी प्रचारक व पायनियर्स हे तुम्हासोबत तुमच्या अभ्यासाला येऊन सादर करण्यात निश्चितच आनंद मानतील.
१९ आम्ही लोकांची मदत करण्यामध्ये जे प्रयत्न करतो त्याबाबतीत यहोवा आपली प्रमुख भूमिका पार पाडत असतो हे जाणून आम्ही अभ्यासासाठी कोणीतरी आम्हास मिळावा याबद्दलच नव्हे तर आम्हास भेटलेल्या आस्थेवाईक व्यक्तीची प्रगती घडावी अशीही प्रार्थना केली पाहिजे. पौलाने अग्रिप्पा राजाला साक्ष देताना जी मनोवृत्ती राखली होती तीच भावना आपणही राखावी की, “थोडके किंवा फार, कसेही असो, पण केवळ आपणच नव्हे, तर आज हे जे सर्व माझे भाषण ऐकत आहेत त्यांनी . . . माझ्यासारखे व्हावे अशी देवाजवळ माझी प्रार्थना आहे.” (प्रे. कृत्ये २६:२९) पौलाने अशी इच्छा धरली की, आपणाकडून ऐकणाऱ्या लोकांनी ख्रिस्ताचे खरे शिष्य व्हावे, मग यासाठी व्यक्तीगत मदत देण्यामध्ये त्याला थोडा वेळ लागो की अधिक वेळ लागो.
२० पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे हे आम्हास “देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांग”ण्यासाठी समर्थ बनविते. (प्रे. कृत्ये २०:२४) अंधःकारापासून प्रकाशाकडे तसेच सैतानाच्या अधिकारापासून देवाकडे अगणित लोकांना वळविण्याचे काम अद्याप बाकी आहे. (प्रे. कृत्ये २६:१८) तुम्ही, यहोवाच्या समर्पित व बाप्तिस्मा झालेल्या प्रत्येक सेवकाने सत्याच्या बीजाची लावणी करून, पवित्र शास्त्रीय चर्चेद्वारे त्याला जरुरीचे पाणी देऊन व नियमित रुपात पवित्र शास्त्र अभ्यास चालवून आपला कार्यभाग पूर्ण केला पाहिजे. असे केल्यामुळे लोक शिष्य बनत आहेत हे बघण्याचा तसेच तेही तुम्हासोबत मिळून इतरांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवीत आहेत हे पाहण्याचा सर्वथोर आनंद तुम्हाला मिळू शकेल.