तुम्ही शास्त्रवचनांमधून तर्क करता का?
१ युद्धासाठी निघालेला अनुभवी सैनिक संपूर्णतः शस्त्राने सज्ज असलेला आणि संरक्षित असेल. एका मोठ्या बांधणी प्रकल्पावर काम करत असलेला कुशल कारागीर त्याचे काम पूर्ण करावयास आवश्यक असलेली साधने घेऊन जाईल. क्षेत्र सेवेत असलेल्या यहोवाच्या सेवकाच्या हातात त्याची “तरवार” असेल आणि तो कुशलतेने, संधी मिळेल तेथे ती चालवेल. (इफि. ६:१७) हे व्यक्तिगतपणे तुम्हाबद्दल खरे आहे का? तुम्ही सेवेत भाग घेत असताना, पवित्र आत्म्याला, तुमच्या ऐकणाऱ्यांच्या हृदयांला स्पर्श करण्यासाठी देवाच्या वचनाला बोलण्यास वाव देता का?—नीती. ८:१, ६.
२ प्रचार करणे नेहमीच एक सोपे काम नाही. काही क्षेत्रांमध्ये लोक क्वचित्च घरी आढळतात, आणि प्रतिसाद देणारे बहुधा कामात असतात व थोड्या वेळासाठी पवित्र शास्त्रीय चर्चा करण्यास क्वचित्च संधी देतात. पवित्र शास्त्र हे आमचे मुख्य पाठ्यपुस्तक असल्यामुळे, सेवेत त्याचा अधिक उपयोग आम्ही कसा करू शकतो आणि त्याच्या प्रेरित संदेशाला आपल्या ऐकणाऱ्यांवर प्रभाव पाडावयास कसा वाव देऊ?
३ प्रत्येक संधीला: प्रत्येक घरात, घरमालकाला प्रवृत्त करण्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राचा उपयोग करावयास आवडेल. कोणते प्रकाशन सादर केले जाते ते न जुमानता, आम्ही हे करण्यासाठी तयार असायला हवे. एखादी व्यक्ती कामात असेल आणि पवित्र शास्त्र उघडून एक वा दोन वचने वाचण्यास पुरेसा वेळ नसेल तर, तुम्ही साहित्य सादर करण्याआधी एखाद्या वचनाचा उल्लेख किंवा तुमच्या शब्दात मांडून सांगू शकता का? केवळ त्यामुळेच एखादी व्यक्ती थांबेल व ऐकेल.—इब्री. ४:१२.
४ उदाहरणार्थ, तुम्ही “अ वर्ल्ड विदाऊट डिझीज” हा लेख असेलेले डिसेंबर ८, १९९३ चे अवेक! सादर करत असाल तर, मुखपृष्ठावरील चित्राकडे निर्देश केल्यावर हा प्रश्न विचारा, “रोगराईचा अंत होईल, व एके वेळी सर्वजण उत्तम आरोग्य उपभोगतील यावर तुम्ही विश्वास करता का?” उत्तर काहीही असले तरी, यशया ३३:२४ किंवा प्रकटीकरण २१:४ सारखे एखादे शास्त्रवचन, तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रातून थेट वाचून किंवा तुमच्या शब्दात मांडून सांगू शकाल. अशाप्रकारे, तुम्ही देवाच्या वचनाला बोलावयास वाव देता.
५ पुनर्भेटींच्या वेळी: पुनर्भेट करण्याआधी आम्ही तयारी करायला हवी. तरीसुद्धा, बहुतेक वेळा, आम्ही तयारी न केलेले विषय चर्चेसाठी उद्भवतील. अशावेळी, रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स हे एक मूल्यवान साधन ठरेल. रिझनिंग पुस्तकातून पुष्टी देणाऱ्या वचनांचा उल्लेख करून किंवा वाचून, आम्ही वचनाचे भेसळ करणारे नसून देवाचे सेवक आहोत हे लोकांना दिसून येण्यात मदत होईल.—२ करिंथ. २:१७.
६ पुनर्भेट करत असताना, कोणत्याही विशिष्ट विषयाबद्दल चर्चिलेले नसेल तर, रिझनिंग पुस्तकातून “येशू ख्रिस्त,” “शेवटला काळ,” किंवा “पुनरुत्थान,” या सारखा योग्य विषय निवडून, व चर्चा सुरू करण्यासाठी एखाद्या उपशिर्षकाचा उपयोग करु शकता. घरमालकाच्या स्वतःच्या पवित्र शास्त्रातून काही वचने वाचावयास त्याला आमंत्रण दिले जाऊ शकते. अशाप्रकारे, पवित्र शास्त्र त्यांच्यासाठी, आवड निर्माण करणारे आणि अर्थपूर्ण होईल आणि ते धार्मिक असतील तर यहोवाचा पवित्र आत्मा कार्य करील.
७ सुवार्तेचा प्रचार करणे आणि दुष्टाला इशारा देण्याची आमची जबाबदारी गंभीर आहे. तो संदेश आमचा नसून यहोवाचा आहे. त्याचे वचन, आत्म्याची तरवार, तुमची मदत करो.