बायबल—त्रस्त जगात सांत्वन आणि आशेचा स्रोत
१ हे जग मानवजातीला अतिशय दबावाखाली तसेच सांत्वनाची आणि आशेची गरज असण्याच्या स्थितीत ठेवते. बायबल हे खऱ्या सांत्वनाचा एकमात्र स्रोत आहे. ते धार्मिकतेच्या नवीन जगाची आशा देते. (रोम. १५:४; २ पेत्र ३:१३) इन्साईट पुस्तक खंड १, पृष्ठ ३११ असे निरीक्षण करते: “बायबलविना आपण यहोवाला जाणले नसते, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे अतिउत्तम लाभ जाणले नसते आणि देवाच्या नीतीमान राज्यात किंवा त्याच्या सत्तेखाली सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी पूर्ण कराव्या लागणाऱ्या गरजा समजू शकलो नसतो.”
२ जगातील दबावांना तोंड देण्यात लोकांना मदत करण्यास देवाचे वचन, म्हणजे बायबल कोणती भूमिका पार पाडते याकडे आपण नोव्हेंबर दरम्यान खासपणे लक्ष आकर्षित करू. आपण शक्य असेल तेव्हा, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स आणि द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे पुस्तक सादर करू. आपण योग्य मनोवृत्तीच्या व्यक्तींना बायबलच्या मूल्याची गुणग्राहकता बाळगण्यास मदत होईल असे काय म्हणू शकतो?
३ स्वतःचा परिचय करून दिल्यावर, तुम्ही असे म्हणू शकता:
▪“आपल्या मनाची शांती हिरावून घेणाऱ्या समस्यांनी आपण घेरलेले आहोत या गोष्टीशी तुम्ही कदाचित सहमत असाल. या समस्यांचा सामना कसा करावा हे दाखवणारा व्यावहारिक सल्ला आपल्याला कोठे मिळू शकतो? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मला बायबल खात्रीदायक वाटले आहे कारण ते आपल्याला आनंदी कसे राहावे हे शिकवते. [लूक ११:२८ वाचा.] बायबल वाचण्यास आणि त्याच्या सूचनांपासून लाभ मिळवण्यास लोकांना उत्तेजन देणे हा आमच्या कार्याचा हेतू आहे. ते करण्यास द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे बायबल अभ्यासाचे साहित्य तुम्हाला मदत करू शकते. ते जगाच्या बहुतेक समस्यांच्या कारणाबद्दल काय म्हणते पाहा.” [पृष्ठ १८७ वरील परिच्छेद ९ मधील दुसरे वाक्य वाचा.] सरकार आणि आपल्या समस्या ही माहितीपत्रके किंवा ट्रु पीस ॲण्ड सेक्युरिटी हे पुस्तक अशाच पद्धतीने सादर केले जाऊ शकते.
४ तुम्ही कदाचित अशा एखाद्या साध्या प्रस्तावनेचा उपयोग करण्याचे निवडाल:
▪“आम्ही देवाचे वचन, बायबल याला अधिक आदर देण्याचे उत्तेजन देण्यात आस्था राखतो. तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता? या पत्रिकेची एक प्रत तुम्हाला देण्यास मला आवडेल. ती एका चांगल्या जगाची निश्चित आशा मिळवण्यासाठी बायबलकडे आपण का पाहू शकतो याचे स्पष्टीकरण देते. [पृष्ठ ६ काढा आणि समारोपाच्या परिच्छेदासह स्तोत्र ३७:२९ वाचा.] तुम्ही स्वतः ही पत्रिका वाचा आणि पुढील वेळी मी भेट देईन तेव्हा बायबल जी आशा देते त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे मला सांगा.”
५ उचित असेल तेथे, बायबल अभ्यास सुरु करण्यासाठी तुम्ही कदाचित या थेट प्रस्तावाचा उपयोग करू शकाल:
▪“मी तुम्हाला एक मोफत गृह बायबल अभ्यास देण्यासाठी भेट देत आहे. बायबल देवाकडून प्रेरित केलेले आहे आणि त्याची सूचना आमच्यात सुधारणा करण्यास मदत करू शकते. आधुनिक भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स याची व्यक्तिगत अभ्यासासाठी रचना करण्यात आली आहे. तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता याचे मला संक्षिप्त रुपात प्रात्यक्षिक दाखवू द्या. [पृष्ठ १६५३ काढा आणि २३अ याकडे लक्ष आकर्षित करा. उल्लेखिलेली एक किंवा दोन शास्त्रवचने काढून पाहा. उल्लेखिलेली शास्त्रवचने काढून पाहिल्याने, देवाने त्याच्या राज्याद्वारे काय साध्य करण्याचे उद्देशिले आहे ते कशाप्रकारे प्रकट होईल हे समजावून सांगा.] मला पुन्हा येऊन या राज्य आशेबद्दल पुढे चर्चा करावयास नक्कीच आवडेल.”
६ बायबल हे सांत्वन आणि आशा त्याचप्रमाणे आपल्याला सार्वकालिक जीवनाप्रत निरवू शकणाऱ्या सत्याचा स्रोत आहे. (योहा. १७:३, १७) इतरांसोबत बायबलच्या ज्ञानाची सहभागिता केल्याने यहोवा संतुष्ट होतो. “त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे.”—१ तीम. २:४.