यशया
४३ हे याकोब! तुला निर्माण करणारा यहोवा,
हे इस्राएल! तुला घडवणारा देव असं म्हणतो,+
“घाबरू नकोस, कारण मी किंमत देऊन तुझी सुटका केली आहे.+
मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे,
तू माझा आहेस.
२ तू जलाशय ओलांडशील तेव्हा मी तुझ्यासोबत असेन,+
तू नद्यांमधून जाशील तरी तू बुडणार नाहीस,+
तू आगीतून चालशील तरी तुला भाजणार नाही,
आगीच्या ज्वालांची तुला झळ बसणार नाही.
३ कारण मी, यहोवा तुझा देव आहे.
मी इस्राएलचा पवित्र देव, तुझा तारणकर्ता आहे.
मी इजिप्त, इथियोपिया आणि सबा यांना तुझ्यासाठी खंडणी म्हणून दिलंय.
म्हणून मी तुझ्या जागी लोकांना देईन,
तुझ्या जिवाच्या बदल्यात मी राष्ट्रांना देईन.
५ घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे.+
६ मी उत्तरेला म्हणीन, ‘त्यांना जाऊ दे!’+
आणि दक्षिणेला सांगीन, ‘त्यांना धरून ठेवू नकोस.
माझ्या मुलांना दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या टोकांपासून घेऊन ये.+
७ ते सगळे माझ्या नावाने ओळखले जातात,+
मी त्यांना माझ्या गौरवासाठी बनवलंय,
मी त्यांना घडवलंय आणि निर्माण केलंय.’+
८ डोळे असूनही जे आंधळे आहेत,
आणि कान असूनही जे बहिरे आहेत त्यांना घेऊन या.+
त्यांच्यातला* कोण या गोष्टी सांगेल?
किंवा त्यांच्यातला कोण पहिल्या घडणाऱ्या गोष्टी* आपल्याला कळवेल?+
आपण बरोबर आहोत हे सिद्ध करण्यासाठी,
त्यांनी आपले साक्षीदार पुढे आणावेत,
म्हणजे ते ऐकून म्हणतील, ‘हे खरंय!’”+
तुम्ही मला ओळखावं आणि माझ्यावर विश्वास* ठेवावा,
आणि मी तोच आहे हे समजावं,+
म्हणून मी तुम्हाला निवडलंय.+
माझ्या आधी कोणी देव नव्हता,
आणि माझ्यानंतरही कोणी होणार नाही.+
११ मीच यहोवा आहे,+ आणि माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.”+
१२ यहोवा म्हणतो, “तुमच्यामध्ये कोणताही परका देव नव्हता,+
त्या वेळी पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणारा, त्या जाहीर करणारा आणि तुम्हाला वाचवणारा मीच होतो.
म्हणून तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि मीच देव आहे.”+
मी एखादं काम करतो, तेव्हा कोण मला अडवू शकतं?+
१४ तुमची सुटका करणारा,+ इस्राएलचा पवित्र देव+ यहोवा असं म्हणतो:
“मी तुमच्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन आणि दरवाजांचे सगळे अडसर तोडून टाकीन,+
आणि खास्दी लोक आपल्या जहाजांमध्ये दुःखाने ओरडतील.+
१५ मी तुमचा पवित्र देव यहोवा आहे.+ मी इस्राएलचा निर्माणकर्ता,+ तुमचा राजा आहे.”+
१६ यहोवा हा समुद्रातून मार्ग काढणारा,
खवळलेल्या पाण्यातून वाट काढणारा देव आहे;+
१७ तोच युद्धाचे रथ आणि घोडे,
शूर योद्धे आणि सैन्य बाहेर आणतो.+
तो म्हणतो: “ते खाली पडतील आणि परत कधीच उठणार नाहीत,+
जळती वात जशी विझवली जाते, तसं त्यांना कायमचं विझवलं जाईल.”
१८ “पूर्वीच्या गोष्टी आठवू नका,
आणि घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका.
१९ पाहा! मी काहीतरी नवीन करतोय.+
त्याची सुरुवातही झाली आहे.
तुम्हाला ते दिसत नाही का?
२० रानातले जंगली प्राणी माझा आदर करतील,
कोल्हे आणि शहामृग माझा सन्मान करतील.
कारण माझ्या लोकांना, माझ्या निवडलेल्या लोकांना,+
मी ओसाड रानात पिण्यासाठी पाणी पुरवीन,+
आणि वाळवंटात नद्या वाहायला लावीन.
२३ तू मला होमार्पणं द्यायला मेंढरं आणली नाहीस,
किंवा आपल्या बलिदानांनी माझा गौरव केला नाहीस.
मी तुला भेट आणायची बळजबरी केली नव्हती,
किंवा तुला कंटाळा येईपर्यंत मी तुझ्याकडे धूपाची मागणी केली नव्हती.+
२४ तू आपल्या पैशांनी माझ्यासाठी अगरू* विकत घेतला नाहीस,
किंवा आपल्या बलिदानांच्या चरबीने मला तृप्त केलं नाहीस.+
उलट, तू तुझ्या पापांचं ओझं माझ्यावर लादलंस,
आणि तुझ्या अपराधांनी मला थकवलंस.+
२५ स्वतःच्या नावासाठी+ तुझे अपराध* मिटवून टाकणारा, तो मीच आहे.+
मी तुझी पापं कधीही लक्षात ठेवणार नाही.+
२६ मला आठवण करून दे; आपण एकमेकांसमोर आपला खटला सादर करू,
तू आपली बाजू मांड आणि निर्दोष आहेस हे सिद्ध कर.
२८ म्हणून मी पवित्र ठिकाणाच्या अधिकाऱ्यांना अशुद्ध करीन,
मी याकोबचा नाश,
आणि इस्राएलची निंदा होऊ देईन.+