२ म्हणून त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “हे यहोवा, मी माझ्या देशात होतो तेव्हा मला याचीच भीती नव्हती का? म्हणूनच तर मी तार्शीशला पळून जायचा प्रयत्न केला;+ कारण मला माहीत आहे, की तू एक दयाळू आणि कृपाळू* देव आहेस, तू सहनशील आणि एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहेस.+ आणि तुला संकटं आणायला आवडत नाही.