वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर रूपरेषा

      • यहूदीयातल्या बांधवांसाठी दान गोळा करणं (१-१५)

      • तीतला करिंथमध्ये पाठवण्यात येतं (१६-२४)

२ करिंथकर ८:१

समासातील संदर्भ

  • +रोम १५:२६

२ करिंथकर ८:२

तळटीपा

  • *

    किंवा “भरभरून.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००१, पृ. ३०

    ११/१/१९९८, पृ. २५-२६

२ करिंथकर ८:३

समासातील संदर्भ

  • +प्रेका ११:२९; २कर ९:७
  • +मार्क १२:४३, ४४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/१९९८, पृ. २५-२६

२ करिंथकर ८:४

समासातील संदर्भ

  • +रोम १५:२५, २६; १कर १६:१; २कर ९:१, २

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ५/२०१९, पृ. ३

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ५/२०१९, पृ. २

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००१, पृ. ३०

    ११/१/१९९८, पृ. २५-२६

२ करिंथकर ८:६

समासातील संदर्भ

  • +२कर १२:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/१९९८, पृ. ३०

२ करिंथकर ८:७

समासातील संदर्भ

  • +१ती ६:१८

२ करिंथकर ८:९

समासातील संदर्भ

  • +मत्त ८:२०; फिलि २:७

२ करिंथकर ८:१०

समासातील संदर्भ

  • +१कर ७:२५

२ करिंथकर ८:१२

समासातील संदर्भ

  • +अनु १६:१०, १७; नीत ३:२७, २८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१३, पृ. १५

    ११/१/२०००, पृ. ३०

    ११/१/१९९८, पृ. २६

२ करिंथकर ८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ६/१९९८, पृ. ६

२ करिंथकर ८:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    राज्य सेवा,

    ६/१९९८, पृ. ६

२ करिंथकर ८:१५

समासातील संदर्भ

  • +निर्ग १६:१८

२ करिंथकर ८:१६

समासातील संदर्भ

  • +२कर १२:१८

२ करिंथकर ८:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/१९९८, पृ. ७

२ करिंथकर ८:२०

समासातील संदर्भ

  • +१कर १६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००१, पृ. ३०-३१

२ करिंथकर ८:२१

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +नीत ३:४; १पेत्र २:१२

२ करिंथकर ८:२३

तळटीपा

  • *

    शब्दशः “वाटेकरी.”

२ करिंथकर ८:२४

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:२२; २:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ करिंथ. ८:१रोम १५:२६
२ करिंथ. ८:३प्रेका ११:२९; २कर ९:७
२ करिंथ. ८:३मार्क १२:४३, ४४
२ करिंथ. ८:४रोम १५:२५, २६; १कर १६:१; २कर ९:१, २
२ करिंथ. ८:६२कर १२:१८
२ करिंथ. ८:७१ती ६:१८
२ करिंथ. ८:९मत्त ८:२०; फिलि २:७
२ करिंथ. ८:१०१कर ७:२५
२ करिंथ. ८:१२अनु १६:१०, १७; नीत ३:२७, २८
२ करिंथ. ८:१५निर्ग १६:१८
२ करिंथ. ८:१६२कर १२:१८
२ करिंथ. ८:२०१कर १६:१
२ करिंथ. ८:२१नीत ३:४; १पेत्र २:१२
२ करिंथ. ८:२४१पेत्र १:२२; २:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ८:१-२४

करिंथकर यांना दुसरं पत्र

८ आता बांधवांनो, मासेदोनियातल्या मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या अपार कृपेबद्दल तुम्हाला माहीत असावं अशी आमची इच्छा आहे.+ २ अतिशय कठीण काळात ते बरीच दुःखं सोसत होते. पण, स्वतः भयंकर दारिद्रयात असूनही त्यांनी अगदी आनंदाने दान दिलं आणि यावरून त्यांची मोठी* उदारता दिसून आली. ३ कारण त्यांनी फक्‍त आपल्या ऐपतीप्रमाणे+ नाही, तर आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त दान दिलं+ आणि या गोष्टीची मी स्वतः साक्ष देतो. ४ ते स्वतःहून पुढे आले आणि दान देण्याचा बहुमान आपल्याला मिळावा, तसंच पवित्र जनांची सेवा करण्यात आपल्यालाही हातभार लावता यावा, अशी ते आम्हाला वारंवार विनंती करत राहिले.+ ५ आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतकं त्यांनी केलं. देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी स्वतःला आधी प्रभूच्या सेवेसाठी आणि मग आमच्या सेवेसाठी वाहून घेतलं. ६ त्यामुळे आम्ही तीतला असं प्रोत्साहन दिलं,+ की तुम्ही प्रेमाने दिलेलं दान गोळा करायचं जे काम त्याने सुरू केलं होतं, ते त्याने पूर्णही करावं. ७ तुम्ही सर्व बाबतींत, म्हणजेच विश्‍वासात, बोलण्यात, ज्ञानात, उत्साहात आणि आम्ही तुम्हाला दाखवलेलं प्रेम इतरांना दाखवण्याच्या बाबतीत जसे श्रीमंत आहात, तसंच तुम्ही दान द्यायच्या बाबतीतही उदार असावं.+

८ पण, मी तुम्हाला असं करायचा हुकूम देत नाही, तर इतर जण किती आनंदाने दान देत आहेत, हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि तुमचं प्रेम किती खरं आहे हे पारखण्यासाठी तुम्हाला हे सांगत आहे. ९ कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेची तुम्हाला जाणीव आहे. तो श्रीमंत असूनही तुमच्यासाठी गरीब झाला.+ हे यासाठी की त्याच्या दारिद्र्‌यामुळे तुम्ही श्रीमंत व्हावं.

१० याबद्दल मी तुम्हाला आपलं मत सांगतो:+ हे काम करणं तुमच्या हिताचंच आहे, कारण तुम्ही ते सुरू करून आता एक वर्ष उलटलं आहे आणि ते करण्याची तुम्ही इच्छाही दाखवली होती. ११ तर, तुम्ही जे काम सुरू केलं होतं ते आता पूर्णही करा. म्हणजे, आपल्या ऐपतीप्रमाणे तुम्ही जे काही द्याल त्यातून तुमची उत्सुकता दिसून येईल. १२ कारण एखाद्याला दान देण्याची जर खरंच उत्सुकता असेल, तर त्याचं दान मान्य केलं जाईल. त्याच्याकडे जे नाही त्याची अपेक्षा केली जात नाही. तर त्याच्याकडे जे आहे,+ त्याप्रमाणे तो जे काही देईल ते मान्य केलं जाईल. १३ कारण इतरांचा भार हलका करून तुमच्यावर जास्त भार टाकायची माझी इच्छा नाही. १४ तर माझी अशी इच्छा आहे, की या वेळी तुमच्या समृद्धीतून त्यांची गरज भागवली जावी आणि त्यांच्या समृद्धीतून तुमची गरज भागवली जाऊन समानता घडून यावी. १५ शास्त्रातसुद्धा असंच लिहिलं आहे: “ज्याच्याजवळ जास्त होतं, त्याला खूप जास्त झालं नाही आणि ज्याच्याजवळ कमी होतं, त्याला फार कमी पडलं नाही.”+

१६ आता, आम्हाला तुमच्याबद्दल जशी कळकळ वाटते, तशीच कळकळ तीतच्या मनात उत्पन्‍न केल्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो.+ १७ कारण, तो फक्‍त आमच्या सांगण्यावरून तुमच्याकडे यायला तयार झाला नाही, तर तो स्वतःहून खूप उत्सुकतेने तुमच्याकडे येत आहे. १८ पण त्याच्यासोबत आम्ही अशा एका बांधवाला पाठवत आहोत, ज्याने आनंदाच्या संदेशासाठी केलेल्या कार्याबद्दल, सगळ्या मंडळ्यांमध्ये त्याची प्रशंसा होत आहे. १९ इतकंच नाही, तर तुम्ही आनंदाने दिलेली ही देणगी घेऊन जायला, मंडळ्यांनी त्याला आमच्यासोबत जाण्यासाठी नेमलं आहे. ही देणगी वाटण्याचं काम आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि यावरून इतरांना मदत करण्याची आमची उत्सुकता दिसून येईल. २० ही उदार देणगी पोहोचवण्याच्या कामात कोणीही आम्हाला दोष लावू नये म्हणून आम्ही काळजी घेतो.+ २१ कारण, ‘फक्‍त यहोवाच्याच* नाही, तर माणसांच्या नजरेतही सगळ्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे करायची आमची इच्छा आहे.’+

२२ याशिवाय, त्यांच्यासोबत आम्ही आमच्या अशा एका बांधवालाही पाठवत आहोत, ज्याला आम्ही बऱ्‍याचदा पारखून पाहिलं आहे. आणि तो बऱ्‍याच बाबतींत मेहनती असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे. शिवाय, तुमच्यावर त्याचा खूप भरवसा असल्यामुळे तो आणखी जास्त मेहनत करेल. २३ तीतबद्दल कोणी विचारलं, तर तो माझा साथीदार* आणि तुमच्या भल्यासाठी कार्य करणारा माझा सहकारी आहे. किंवा मग, आमच्या बांधवांबद्दल कोणी विचारलं, तर ते मंडळ्यांचे प्रेषित आणि ख्रिस्ताचा गौरव आहेत. २४ तेव्हा, त्यांच्यावर मनापासून प्रेम करा+ आणि तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान का वाटतो, ते दाखवून द्या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा