नीतिवचनं
२४ दुष्ट माणसांचा हेवा करू नकोस
आणि त्यांच्या संगतीची इच्छा धरू नकोस.+
२ कारण त्यांच्या मनात हिंसा करण्याचे विचार घोळत असतात
आणि ते नेहमी दुसऱ्यांची हानी करण्याच्या गोष्टी करतात.
५ बुद्धिमान माणसाजवळ ताकद असते+
आणि ज्ञानाने माणूस आपली शक्ती वाढवतो.
७ खरी बुद्धी मूर्खाच्या आवाक्याबाहेर असते;+
शहराच्या फाटकाजवळ त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसतं.
८ दुष्ट योजना करणाऱ्याला
लोक कारस्थानी म्हणतील.+
११ ज्यांना ठार मारायला नेलं जातंय, त्यांना सोडव
आणि ज्यांची कत्तल होणार आहे, त्यांना वाचवायचा प्रयत्न कर.+
१२ “पण आम्हाला याबद्दल माहीतच नव्हतं,” असं जर तुम्ही म्हणालात,
हो, तुमच्यावर* लक्ष ठेवणाऱ्या देवाला ते कळेल
आणि तो प्रत्येक माणसाला त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल.+
१३ माझ्या मुला, मध खा कारण तो चांगला असतो;
पोळ्यातला मध गोड असतो.
१४ त्याचप्रमाणे, बुद्धीही तुझ्यासाठी चांगली आहे* हे विसरू नकोस.+
तुला ती सापडली, तर तुझं भविष्य उज्ज्वल होईल
आणि तुझी आशा नाहीशी होणार नाही.+
१५ नीतिमान माणसाच्या घराजवळ दुष्ट इराद्याने टपून बसू नकोस;
त्याच्या विश्रांतीचं ठिकाण उद्ध्वस्त करू नकोस.
१७ तुझा शत्रू पडला तर आनंदी होऊ नकोस;
तो अडखळला तर मनातल्या मनात खूश होऊ नकोस.+
१८ नाहीतर, यहोवा हे बघेल तेव्हा त्याला ते आवडणार नाही
आणि तुझ्या शत्रूवरचा त्याचा राग शांत होईल.+
१९ वाईट कामं करणाऱ्यांमुळे चिडू* नकोस
आणि दुष्टांचा हेवा करू नकोस.
२१ माझ्या मुला, यहोवाची आणि राजाची भीती बाळग.+
विद्रोह करणाऱ्यांची* संगत धरू नकोस.+
२२ कारण त्यांच्यावर अचानक संकट येईल.+
दोघं* त्यांच्यावर कोणती विपत्ती आणतील, हे कोण सांगू शकतं?+
२३ बुद्धिमानांनी असंही म्हटलेलं आहे:
न्याय करताना पक्षपात करणं योग्य नाही.+
२४ जो दुष्टाला, “तू नीतिमान आहेस,” असं म्हणतो,+
त्याला लोक शाप देतील आणि राष्ट्रं त्याचा तिरस्कार करतील.
२६ प्रामाणिकपणे उत्तर देणाऱ्याचा लोक आदर करतील.*+
२८ पुरावा नसताना आपल्या शेजाऱ्याविरुद्ध साक्ष देऊ नकोस.+
आपल्या शब्दांनी इतरांची फसवणूक करू नकोस.+
२९ “त्याने माझ्यासोबत केलं, तसंच मीही करीन;
त्याने जे केलं त्याचा मी बदला घेईन,” असं म्हणू नकोस.+
३० मी आळशी माणसाच्या शेताजवळून;+
समज नसलेल्या माणसाच्या द्राक्षमळ्याजवळून गेलो.
३१ तेव्हा मला त्यात सगळीकडे जंगली झुडपं उगवलेली दिसली;
जमीन काट्याकुसळ्यांनी भरली होती
आणि त्याची दगडी भिंत पडली होती.+
३२ हे पाहून मी त्यावर विचार केला
आणि त्यातून हा धडा घेतला:
३३ जराशी डुलकी घेतो, जराशी झोप घेतो,
हात छातीशी घेऊन अजून थोडासा आराम करतो,
३४ असं म्हणत राहिलास, तर गरिबी एखाद्या लुटारूप्रमाणे
आणि दारिद्र्य एखाद्या शस्त्रधारी माणसाप्रमाणे तुला गाठेल.+