यशया
६३ अदोमकडून येणारा हा कोण आहे?+
भडक रंगाचे* कपडे घालून बस्रावरून+ येणारा हा कोण आहे?
वैभवशाली वस्त्र घालून मोठ्या सामर्थ्याने चालत येणारा हा कोण?
“तो मीच आहे. नीतीच्या गोष्टी बोलणारा,
तारण करण्याची विलक्षण शक्ती असणारा तो मीच आहे.”
२ तुझे कपडे लाल का आहेत?
तुझे कपडे द्राक्षकुंडात द्राक्षं तुडवणाऱ्या माणसासारखे का आहेत?+
३ “मी एकट्यानेच द्राक्षं तुडवली.
राष्ट्रांतल्या लोकांपैकी कोणीही माझ्यासोबत नव्हतं.
मी रागाने द्राक्षं तुडवत राहिलो,
मोठ्या क्रोधाने माझ्या पायांखाली मी ती चिरडत राहिलो.+
त्यांच्या रक्ताचे शिंतोडे माझ्या कपड्यांवर उडाले,
आणि म्हणून माझ्या सगळ्या कपड्यांवर डाग आहेत.
४ मी सूड घेण्याचा दिवस ठरवलाय.+
माझ्या लोकांची सुटका करण्याचं वर्ष जवळ आलंय.
५ मी इकडे तिकडे पाहिलं, पण मला मदत करणारा कोणीही दिसला नाही;
मला साथ देणारा कोणीच नाही हे पाहून मला आश्चर्य वाटलं.
६ मी रागाने राष्ट्रांना तुडवलं,
मी माझ्या क्रोधाचा प्याला त्यांना पाजला व ते झिंगले.+
आणि त्यांचं रक्त मी जमिनीवर ओतलं.”
७ मी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाच्या कार्यांबद्दल बोलीन,
यहोवाच्या प्रशंसनीय कार्यांबद्दल मी इतरांना सांगीन.
कारण यहोवाने आमच्यासाठी खूप काही केलं आहे;+
आपल्या अपार दयेमुळे आणि एकनिष्ठ प्रेमामुळे,
त्याने इस्राएलच्या घराण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
८ कारण तो म्हणाला: “ते माझे लोक आहेत. ती माझी मुलं आहेत. ती कधीच माझा विश्वासघात करणार नाहीत.”+
आणि म्हणून तो त्यांचा तारणकर्ता बनला.+
९ ते दुःखात असायचे, तेव्हा त्यालाही दुःख व्हायचं.+
आणि त्याच्या दूताने* त्यांना वाचवलं.+
त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि करुणेमुळे त्याने त्यांची सुटका केली.+
त्याने त्यांना उचलून घेतलं आणि नेहमी त्यांना सांभाळलं.+
१० पण तरीही त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड केलं+ आणि त्याच्या पवित्र शक्तीला* दुखावलं.+
म्हणून तो त्यांचा शत्रू बनला+ आणि त्यांच्याशी लढला.+
११ तेव्हा त्यांना जुने दिवस आठवले.
देवाचा सेवक मोशे याचे दिवस आठवून ते म्हणाले:
“आपल्या लोकांना आणि त्यांच्या मेंढपाळांना+ समुद्र पार करून आणणारा कुठे आहे?+
ज्याने त्याला आपली पवित्र शक्ती दिली तो कुठे आहे?+
१२ ज्याने मोशेच्या उजव्या हाताला आपल्या वैभवशाली हाताचा आधार दिला,+
ज्याने आपल्या नावाची कायम आठवण राहावी,+
म्हणून त्यांच्यासमोर समुद्राचे दोन भाग केले,+ तो कुठे आहे?
१३ मैदानातून* घोड्याला नेलं जातं,
तसं ज्याने त्यांना अडखळू न देता उसळणाऱ्या समुद्रातून* पार नेलं तो कुठे आहे?
१४ गुरंढोरं जशी खोऱ्यात उतरतात आणि विसावा घेतात,
तसं यहोवाच्या पवित्र शक्तीने त्यांना विसावा दिला होता.”+
आपल्या नावाचा गौरव व्हावा म्हणून,
तू अशा प्रकारे आपल्या लोकांचं मार्गदर्शन केलंस.+
१५ स्वर्गातून खाली बघ,
पवित्र आणि वैभवी* असलेल्या तुझ्या उच्च निवासस्थानातून खाली पाहा.
तुझा आवेश आणि तुझं सामर्थ्य कुठे आहे?
तुझ्यातली करुणा+ आणि दया+ कुठे गेली?
तू ती माझ्यापासून दूर का ठेवली आहेस?
१६ तू आमचा पिता आहेस;+
अब्राहामने जरी आम्हाला ओळखलं नाही,
इस्राएलने जरी आम्हाला ओळखलं नाही,
तरी हे यहोवा, तू आमचा पिता आहेस.
जुन्या काळापासून तुझं नाव ‘आमची सुटका करणारा’ असं आहे.+
१७ हे यहोवा, तू आम्हाला तुझ्या मार्गांपासून भटकू का देतोस?
तू आमची मनं इतकी कठोर का होऊ देतोस, की आम्हाला तुझं भय वाटत नाही?+
तुझ्या सेवकांसाठी, तुझा वारसा असलेल्या लोकांसाठी परत ये.+
१८ तू तुझ्या पवित्र लोकांना दिलेल्या देशात ते काही काळच राहिले.
आमच्या शत्रूंनी तुझं मंदिर पायांखाली तुडवलं.+
१९ आम्ही बऱ्याच काळापासून अशा स्थितीत आहोत,
जसं काय तू आमच्यावर कधी राज्य केलंच नाहीस,
जसं काय आम्हाला तुझ्या नावाने कधी ओळखलंच गेलं नाही.