शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
सप्टेंबर ९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६५ (८१)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. स्थानिक क्षेत्रास उचित ठरणाऱ्या एक किंवा दोन मासिक सादरता प्रस्तुत करा व सर्व प्रचारकांना या आठवड्याच्या शेवटी क्षेत्र सेवेला जाण्याचे उत्तेजन द्या. पुढील सेवा सभेच्या वेळी आपणासोबत रिझनिंग पुस्तक बरोबर आणण्याचे स्मरण द्या.
२० मि: “देवाच्या नावाची सर्वतोपरी स्तुती करा.” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. सध्याच्या संभाषणाच्या विषयाचा कसा वापर करता येऊ शकतो याचे चांगली तयारी केलेले प्रात्यक्षिक दाखवा. स्थानिक परिस्थितीला अनुसरुन जुळवून घ्या. आपली ओळख दाखविल्यावर प्रचारक म्हणू शकतोः “आज आम्ही आपल्या शेजाऱ्यांसोबत भविष्याबाबत आशावादी दृष्टीकोण राखण्याच्या गरजेविषयी बोलत आहोत. जागतिक नेते दरवेळी चांगल्या जगाबद्दल त्यांनी आखलेल्या योजनांबद्दल बोलत असतात. त्यांच्या या आशा कशावर आधारित आहेत? मानव चांगले जग निर्माण करू शकेल असा तुमचा विश्वास आहे का? [प्रतिसादास वाव द्या.] यिर्मया संदेष्ट्याला याविषयी काही सांगायचे होते. ते त्याने यिर्मया १०:२३ मध्ये लिखित करून ठेवले आहे. [वाचा.] आम्हाला भविष्याबद्दल आशावादी राहता येऊ शकते कारण ही गोष्ट स्वतः देवाने दिलेल्या अभिवचनांवर आधारीत आहे. त्याचे अभिवचन कधीही अपयशी जात नाही. [वाचा २ पेत्र ३:१३.] देवाचे हे अभिवचन या माहितीपत्रकात केवढ्या चांगलेपणाने चित्रित करण्यात आले आहे ते बघा.” यानंतर प्रचारक सादर करीत असलेल्या माहितीपत्रकातून योग्य माहिती काढून दाखवितो.
१५ मि: “लावणे व पाणी घालणे—शिष्य बनविण्यातील पावले.” पान ३ वर असणाऱ्या पुरवणीतील परिच्छेद १-९ ची सभागृहासोबत चर्चा करा. परिच्छेद ७-९ ची चर्चा करीत असता तेथे उल्लेखित असणाऱ्या मुद्यांचा व्यावहारिक अवलंब स्पष्ट करण्यासाठी फारच त्रोटक अशा प्रचारकांच्या मुलाखती घ्या किंवा स्थानिक अनुभव विवेचीत करा. हे अनुभव किंवा मुलाखती अगदी त्रोटक व मुद्देसुद आहेत याची खात्री करा
गीत १३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ७२ (५८)
१० मिः स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. जे अनुदान संस्थेला पाठविण्यात आले आहे व ज्याची पोच व रसिकता प्राप्त झाली आहे ती मंडळीला वाचून दाखवा. तसेच स्थानिक मंडळीच्या गरजेस्तव जो हातभार लावला त्याबद्दल बंधूजनांचे अभिनंदन करा. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रकार्य करण्यास उत्तेजन द्या व शिवाय साक्षीकार्याच्या गटाच्या ज्या व्यवस्था आखण्यात आलेल्या आहेत तेथेही पाठबळ देण्यासा उत्तेजन द्या.
१५ मिः “पूर्ण जिवाने क्षेत्रकार्य करा—भाग २.” लेखातील साहित्यावर आधारित प्रोत्साहनदायक व बोधप्रद भाषण तसेच रिझनिंग पुस्तकाचा वापर स्पष्ट करा. उल्लेखिलेल्या मुद्यांचे इतरांकरवी प्रात्यक्षिक करून दाखवणे जरुरीचे नाही, पण वक्ता स्वतःच या सुंदर क्षेत्रकार्याच्या सहित्यामधील माहिती कशी शोधता व वापरता येते ते स्पष्ट करू शकतो. क्षेत्रकार्यासाठी तयारी करण्यामध्ये सरावाची तालीम केवढे व्यावहारिक मूल्य राखून आहे ते थोडक्यात विदारीत करा. वेळ असल्यास एखाद्या प्रचारकाला, तो किंवा ती हे कसे करतो ते स्पष्ट करण्यासाठी निमंत्रित करा.
२० मिः “लावणे व पाणी घालणे—शिष्य बनविण्यातील पावले.” गेल्या आठवडी या साहित्याची जी हाताळणी झाली तिची त्रोटक प्रस्तावना झाल्यावर पान ३ व ४ वरील पुरवणीतील १०-२० परिच्छेदांवर प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. आपले सेवाकार्य कसे सुधारले गेले तसेच मागील आमची राज्य सेवा यामध्ये आलेल्या सूचनांचा वापर करून पवित्र शास्त्र अभ्यास कसे सुरु करण्यात आले त्याविषयी काही प्रचारक माहिती देऊ शकतील.
गीत ४८ (२८) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर २३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७४ (१३)
५ मिः स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. बांधवांना प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी अगाऊ तयारी करण्याचे उत्तेजन द्या. वेळ मिळेल त्याप्रमाणे या आठवड्याच्या शेवटी घरोघरच्या कार्यात अलिकडील मासिकातील कोणते लेख दाखविणे उचित ठरेल ते सांगा.
२० मिः “सुवार्ता सादरता—वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात.” प्रश्नोत्तरे. माहितीचा स्थानिक अवलंब स्पष्ट करा किंवा मंडळीच्या गरजेस अनुलक्षून दाखवा.
२० मिः “मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था—भाग २.” प्रभावशाली पुस्तक अभ्यास चालकांद्वारेचे उत्तेजनात्मक भाषण.
गीत २५ (११९) व समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ३० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३४ (१०६)
१५ मिः स्थानिक घोषणा. मंडळीच्या क्षेत्रकार्याच्या योजनेची तसेच पायनियर प्रचारकांना उत्तेजन मिळावे यासाठी काय केले जात आहे त्याबद्दल विस्तारित चर्चा. जे पायनियर सेवा सुरु करीत आहेत अशांच्या गरजेकडे खास लक्ष द्या. या आठवड्याच्या शेवटी क्षेत्रसेवेत सहभागी होण्याचे उत्तेजन द्या. तसेच प्रचारकांनी नव्या महिन्यात उपयोग करावा म्हणून क्रिएशन पुस्तकाचा साठा आपणासोबत न्यावा याचे स्मरण द्या.
१५ मिः स्थानिक गरजा. चहाडी या विषयासंबंधाने भाषण किंवा चर्चा करण्यासाठी आधार म्हणून जून ८, १९९१ चा अवेक! मधील लेख घ्या. (प्रादेशिक भाषेत: टेहळणी बुरुज मे १, १९९१, विषय: “घातक चहाड्यांपासून स्वतःला आवरा!”)
१५ मिः “तुम्ही कुटुंब या नात्याने आध्यात्मिक ध्येयाप्रत काम करीत आहात का?” प्रश्नोत्तर रुपाने चर्चा. वेळेप्रमाणे परिच्छेदांचे व शास्त्रवचनांचे वाचन करा.
गीत १६ (१०१) व समाप्तीची प्रार्थना.