ईश्वरशासित वृत्त
भारत: १९९२ मध्ये मागच्या वर्षापेक्षा ८ टक्क्यांनी उत्तम वाढ आहे व प्रत्येक महिन्याला सरासरीने ११,५९७ व्यर्क्तिनी अहवाल दिला व जुलै महिन्यात १२,१६८ प्रचारकांचा उच्चांक आहे. ह्या वर्षात जवळ जवळ २७ लाख तास क्षेत्रकार्यात खर्च केले व बहुतेक ११ लाख मासिकांचे वितरण केले, प्रत्येक महिन्याला सरासरी ९,५९४ शास्त्राभ्यास चालविले गेले. एकूण ९२८ जणांनी ह्या कार्यवर्षात बाप्तिस्मा घेतला.
नेपाळ: ९८ प्रचारकांच्या उच्चांकाने जून महिन्यात अहवाल दिला जेव्हा संपूर्ण राष्ट्राने प्रचारकांमधील २४ टक्क्यांची वाढ अनुभवली.
टर्की: मागच्या वर्षाच्या सरासरी पेक्षा ९ वाढ आहे, व जून महिन्यात १,०१३ प्रचारकांनी नव्या उच्चांकाचा कार्य अहवाल दिला.