ईश्वरशासित वृत्त
कॅमेरून: जून महिन्यामध्ये १८,८१० प्रचारकांचा नवीन उच्चांक गाठला गेला, आणि त्या महिन्यात ८४ जणांचा बाप्तिस्मा झाला.
आयव्हरी किनारा: जून महिन्यामध्ये प्रचारकांची एकूण संख्या ४,३३० होती व हा त्यांच्या सेवा वर्षातील सहावा प्रचारकांचा उच्चांक होता.
इटली: जून महिन्यामध्ये क्षेत्र सेवेत १,९८,१७९ जणांनी भाग घेऊन प्रचारकांचा आणखी एक उच्चांक गाठला. त्या महिन्यात बावीस नवीन मंडळ्यांची स्थापना झाली.
साओटोम आणि प्रिन्सिप: जून ३० रोजी एका गटाला कायदेशीररित्या मान्यता प्राप्त झाली व त्यामुळे अधिक कार्यासाठी मार्ग खुला झाला. या महिन्यात अहवाल देणारे १०० प्रचारक, गेल्या वर्षाच्या सरासरी पेक्षा ४३ टक्क्यांची वाढ सूचित करतात.
उरुग्वे: जूनमध्ये ९,०९३ प्रचारकांचा नवीन उच्चांक गाठला.