सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातून पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे
१ पवित्र शास्त्र अभ्यास असणे तुमच्यासाठी आणि घरमालकासाठी आनंददायक आणि फलदायक असू शकतो. पवित्र शास्त्राच्या ज्ञानाची सहभागिता इतरांबरोबर करण्यात जो आनंद मिळतो त्याची कशाबरोबरही तुलना करता येत नाही.—नीती. ११:२५.
२ शेवटल्या दिवसांचे चिन्ह: वरील लेखातील सूचनेचा तुम्ही उपयोग केला व या जगाचा बचाव होईल का ह्या पत्रिकेतून तुमची चर्चा चालू केलीत तर सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या १११ अध्यायाचा उपयोग करून तुम्ही एखादा पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालू करू शकता? अध्याय १११ उघडा, आणि पहिले तीन परिच्छेद वाचा. धड्याच्या शेवटी तुम्ही पहिला प्रश्न विचारू शकता: “प्रेषितांनी प्रश्न विचारण्याचे कारण काय, पण त्यांच्या मनात आणखी काय आहे?” उत्तरावर तर्क करण्यासाठी घरमालकाला मदत करा, आणि शिकवण्यासाठी चित्रांचा उपयोग करा. चौथ्या परिच्छेदापासून सहाव्या पर्यंत वाचून झाल्यावर दुसरा प्रश्न विचारा: “इ.स. ७० मध्ये येशूच्या भविष्यवादाच्या कोणत्या भागाची पूर्णता होते, पण तेव्हा काय घडत नाही?” घरमालक आस्थेवाईक वाटत असल्यास व त्याच्याकडे सवड असल्यास, तुमची चर्चा पुढे चालू ठेवा.
३ घरमालकासाठी दुसरा वेळ अनुरूप आहे असे तुम्हाला वाटल्यास, तुम्ही विचारू शकता: “युगाची समाप्ती कधी होणार आहे याबद्दलची आणखी माहिती जाणण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का?” त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही पुन्हा जाण्याची व्यवस्था करू शकता.
४ शांतीपूर्ण जग शक्य आहे का? सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही शांतीपूर्ण नवीन जगातील जीवन पत्रिकेचा वापर केल्यास, पवित्र शास्त्र अभ्यास चालू करण्यासाठी १३३वा अध्याय कसा मदतगार ठरेल?
दुसरा पेत्र ३:१३ वाचल्यानंतर, पत्रिकेच्या पृ. ३ वरील दुसरा परिच्छेद तुम्ही वाचू किंवा थोडक्यात स्पष्टीकरण देऊन म्हणू शकता:
▪“येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र हा यहोवाच्या राज्याचा राजा असेल. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक येशूचे वर्णन कसे देते हे नीट लक्ष देऊन पाहा व तो भवितव्यात काय साध्य करणार आहे याबद्दल आम्हाला ते माहिती देते.” आणि मग संपूर्ण अध्याय वाचा. अध्यायाच्या शेवटी असलेला पहिला प्रश्न घरमालकास विचारा: “‘हर्मगिदोनमधून वाचणाऱ्यांना व त्यांच्या मुलांना कोणता आनंदमय विशेषाधिकार असेल?’ [प्रतिसादास वाव द्या. दुसऱ्या प्रश्ननांची चर्चा अशारितीने केली जाऊ शकते.] येशू ज्या पृथ्वीवर राजा म्हणून राज्य करणार आहे तिचा एक भाग बनण्यास तुम्हाला आवडेल का? हा तुमचा अनुभव कसा होऊ शकतो हे तुम्हाला पवित्र शास्त्रातून मदत करण्यासाठी प्रत्येक आठवडी मला संधी दिल्यास बरे होईल.”
५ ह्या वेळच्या भेटीच्या दरम्यान काही व्यक्ती येशू ख्रिस्ताबद्दलची आणखी चर्चा करण्यासाठी आस्थेवाईक असतील.
तुम्ही म्हणू शकता:
▪“चार शुभवर्तमानामध्ये मांडल्याप्रमाणे येशूच्या पार्थिव जीवनाबद्दलची माहिती ह्या पुस्तकात सादर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पृथ्वीवरील येशूच्या जीवनाबद्दल तुम्हाला आणखी शिकायला आवडेल का?” घरमालक राजी झाल्यास तुम्हाला १५व्या अध्यायातील येशूच्या पहिल्या चमत्कारांबद्दलची चर्चा करावयास आवडेल.
६ धार्मिकतेसाठी प्रीती असलेले अजूनही अनेक प्रामाणिक अंत:करणाचे लोक आहेत जे, त्यांना सामना कराव्या लागत असणाऱ्या समस्यांसाठी तोडग्याची वाट पाहत आहेत. खरोखरच, पवित्र शास्त्राद्वारे येशू ख्रिस्ताच्या शिकवणी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न खरा मोबदला देईल.