अगाध संपत्तीची ओळख होण्यास इतरांना मदत करणे
१ राज्याच्या सुवार्तेविषयी आम्ही इतरांना प्रचार करतेवेळी, देवाच्या वचनाच्या श्रेष्ठ मूल्याची गुणग्राहकता बाळगण्यास प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत देण्याच्या आमच्या ध्येयांमधील एक असला पाहिजे. (फिलिप्पै ३:८) राज्याच्या संदेशाचा प्रचार करण्यात आमची पवित्र शास्त्र आधारित प्रकाशने महत्त्वाची भूमिका पार पाडतात. उदाहरणार्थ, अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाने लाखो लोकांना, त्यांनी पवित्र शास्त्राचे सत्य शिकल्यामुळे, यहोवाची सेवा करण्यास मदत केली आहे.
२ इच्छित व्यक्तींकडे प्रकाशने सोडून जाण्यापेक्षा अधिक काही आमच्या सेवेमध्ये गोवलेले आहे. आकर्षक पद्धतीने आम्ही संदेशाची ओळख करून दिली पाहिजे, घरमालक काय बोलतो ते लक्षपूर्वक ऐका, आणि मग ‘त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद’ करण्यास तयार राहा.—प्रे. कृत्ये १७:२.
३ ते कसे करता येईल? घरमालक पवित्र शास्त्रामध्ये आणि त्याच्या संदेशामध्ये आस्थेवाईक आहे की नाही हे दाखवण्यासाठी आमच्या प्रस्तावना त्यांच्यासाठी मार्ग खुला करू शकतात.
तुम्ही म्हणू शकता:
▪“आजच्या आमच्या सभोवतालच्या जगामध्ये जे होत आहे त्याचा अर्थ काय आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही लोकांच्या भेटी घेत आहोत. अनेक लोकांमध्ये, देव आणि पवित्र शास्त्रामध्ये जीवनासाठी दिलेला जो दर्जा आहे त्याबद्दल फार कमी आस्था आहे. लोकांचा एकमेकांबद्दलच्या दृष्टिकोनावर याचा खूप प्रभाव झाला आहे. हे तुम्ही कधी निरक्षिले आहे का? [विवेचनास वाव द्या. तुम्ही विशिष्ट प्रसंगांचा संदर्भ देऊ शकता.] कृपया २ रे तीमथ्य ३:१-५ मध्ये उल्लेखिलेल्या प्रवृत्तीकडे लक्ष द्या, आणि हे आजच्या जगाबरोबर मिळतेजुळते आहे की नाही ते मला सांगा. [वाचा; विवेचनास वाव द्या.] भवितव्यामध्ये चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करण्याचे विश्वसनीय कारण आहे का?” आस्था दाखवल्यास, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृ. १२, आणि १३ वरील चित्र दाखवा आणि १२ आणि १३ परिच्छेदांकडे लक्ष वळवा. आस्था मर्यादित असल्यास, शांतीदायक नवीन जगातील पत्रिका सादर केली जाऊ शकते.
४ दारात एखादे पालक आले तर, आम्ही आमचे संभाषण अशा तऱ्हेने चालू करू शकतो:
▪“आम्ही अशा लोकांबरोबर बोलत आहोत जे कौटुंबिक जीवनाच्या समस्यांचा सामना कसा करावा हे जाणण्यात आस्था राखून आहेत. आम्ही सर्व आमच्या परीने होता होईल तितके चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अधिक यश मिळविण्यासाठी आम्हाला मदत करणारे काही तरी असल्यास, आम्हाला ते आवडेल, हो ना? [विवेचनास वाव द्या.] पवित्र शास्त्र याबाबतीत काही मार्गदर्शन देते जे कलस्सैकरास ३:१२-१४ मध्ये मिळते. [वाचा.] तर मग, यशस्वी कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ह्या पुस्तकातील ‘कौटुंबिक जीवन यशस्वी करणे’ धड्यात काय म्हटले आहे ते पाहा.’” अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाच्या पृ. २३८ वरील परिच्छेद ३ वाचा. घरमालक व्यग्र असेल किंवा तत्परतेने प्रतिसाद देत नसेल, तर कौटुंबिक विषयांची चर्चा करणारे एखादे अलिकडचे मासिक किंवा एन्जॉय फॅमिली लाईफ ही पत्रिका सादर करावी.
५ राज्याविषयीची पूर्ण साक्ष देण्याचा आमचा उद्देश आम्ही कधीच गमावू इच्छिणार नाही. (मत्त. २४:१४) पवित्र शास्त्राचा आणि आमच्यासाठी उपलब्ध असलेल्या ईश्वरकृत प्रकाशनांच्या उत्तम तरतूदींचा चांगला उपयोग केल्याने, ह्या महत्त्वाच्या काळामध्ये त्याची इच्छा पूर्ण साध्य करण्यासाठी, त्याच्या आशीर्वादांकरता आम्ही यहोवाकडे आत्मविश्वासाने पाहू शकतो.—गलती. ६:९.