शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
एप्रिल ८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४ (१९)
१० मि: स्थानिक घोषणा व आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. या सप्ताहाच्या शेवटास आयोजित केलेल्या क्षेत्रकार्याची रुपरेखा द्या.
२३ मि: “जवळ आलेल्या चांगल्या परिस्थितीची सुवार्ता कळवा.” प्रश्नोत्तरे. ६व्या परिच्छेदाची चर्चा करताना सभागृहातील प्रभावी प्रचारकांना क्षेत्रकार्यात वापरता येऊ शकणाऱ्या बोलक्या मुद्यांविषयीचे प्रस्ताव सांगण्यास कळवा. हे प्रस्ताव आधीच तयार केलेले असावेत.
१२ मि: पुढील आस्था अधिक वाढवण्यासाठी परत भेट घ्या. ज्यांनी अनंतकाल जगू शकाल या पुस्तकाविषयी आस्था दाखविली होती त्यांची त्वरेने भेट घेण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या. गरजेची त्रोटक चर्चा तसेच जेथे आस्था आढळली आहे तेथे परत भेट देण्याविषयीचे उबदार प्रोत्साहन दिल्यावर, जेथे पुस्तक दिले आहे अशा ठिकाणी परत भेट कशी घेता येते त्याबद्दलचे छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ६ (४) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ८७ (४७)
१० मिः स्थानिक घोषणा व जमाखर्च अहवाल. अनुदानाची पोच मिळाल्याची माहिती कळवा.
१५ मि: स्थानिक गरजा किंवा “कंटीन्यू टू बी रिॲडजेस्टेड” या द वॉचटावर नोव्हेंबर १, १९९० मधील लेखावर भाषण (प्रादेशिक: टे.बु. नोव्हेंबर १, १९९० “तुमची देवाकडून ऐकण्याची तयारी आहे का?”)
२० मि: प्रभावी प्रस्तावना तयार करा. क्षेत्रकार्यात प्रभावी असणारा वडील प्रचारकांना त्यांच्या क्षेत्रात उचित ठरणाऱ्या प्रस्तावनांची तयारी करण्यात मदत देतो. आपले प्रस्ताव रिझनिंग पुस्तकाच्या ९-१५ पृष्ठांवरील साहित्यावर आधारीत ठेवा. सध्याच्या संभाषणाच्या विषयासोबत किंवा इतर समयोचित विषयासोबत जुळणाऱ्या दोन किंवा तीन प्रस्तावनांची चर्चा करा. अनुभवी प्रचारकांद्वारे दोन घरोघरच्या सादरतेची प्रात्यक्षिके. वेळ मुभा देईल तसे, घरमालकाचे लक्ष खेचून घेणाऱ्या प्रस्तावनांच्या मूल्याविषयीचे स्थानिक अनुभव त्रोटकपणे विवेचीत करा.
गीत १२९ (६६) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १३५ (७२)
१० मिः स्थानिक घोषणा, ईश्वरशासित वृत्त, सेवाकार्याच्या योजना सांगा, तसेच मासिक कार्यात वापरण्यात येणाऱ्या अलिकडच्या मासिकातील ठळक वैशिष्ट्ये सांगा. सध्याच्या क्षेत्रातील सादरतेचे अनुभव सांगितले जाऊ शकतात. मे महिन्यासाठी साहाय्यक पायनियरिंगचे कार्य करण्यावर भर द्या.
१५ मिः “तुमच्या मे महिन्याच्या कोणत्या योजना आहेत?” सेवा देखरेख्याद्वारेचे भाषण. या खास महिन्यातील कार्य कसे वृद्धींगत करता येईल त्याचे मार्ग सांगा, जसे की, आठवड्याच्या मधल्या दिवसांचे कार्य तसेच सायंकाळचे कार्य. योजिलेल्या गटाच्या साक्षीकार्याला अधिक पाठबळ द्यावे यासाठी पायनियर्स तसेच प्रौढ प्रचारक आपल्या आराखड्यात काही सुधारणा करू शकतील का?
२० मिः “सुवार्ता सादरता—आनंदाने.” प्रश्नोत्तराने. परिच्छेद ३ च्या अनुषंगाने एक प्रौढ प्रचारक नव्या प्रचारकाला संभाषणाचा विषय किंवा रिंझनिंग पुस्तकाच्या वापराने प्रस्तुती शिकवीत आहे याचे दृश्य दाखवा.
गीत १२६ (२५) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६८ (८४)
१० मिः स्थानिक घोषणा. “सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा,” या लेखातील ठळक मुद्दे सांगा. तसेच या आठवड्याच्या शेवटाला आयोजित असणाऱ्या क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
१५ मिः “अधिवेशनात प्रकाशित झालेल्या नव्या प्रकाशनांसोबत परिचित व्हा.” सभागृहासोबत सूक्ष्म चर्चा, स्थानिकरित्या उपयुक्त असणाऱ्या प्रत्येक प्रकाशनातील प्रमुख मुद्यांवर जोर द्या. या प्रकाशनातील माहितीशी परिचित होण्याचे बांधवांनी लांबणीवर टाकू नये.
२० मिः “उपाध्यपणात प्रगति करणे.” एक वडील तसेच एक प्रचारक, जो काही वर्षांपासून सत्यात आहे पण ज्याने प्रगति केली नाही अशाची भूमिका करतो, त्यांजमधील चर्चा. परिच्छेद ३ मध्ये सांगण्यात आलेली सराव करण्याची योजना कशी असते त्याचे त्रोटक दृश्य दाखवू द्या. परिच्छेद ४ ची चर्चा करताना एक पायनियर किंवा प्रभावी प्रचारक कोणा कमअनुभवी प्रचारकाला क्षेत्रावर वेळोवेळी उद्भवणाऱ्या आक्षेपांना कसे तोंड द्यावे ते दाखवू द्या. चर्चेत वॉचटावर ऑगस्ट १, १९८५, पृष्ठे १५-२० वर, अंतःकरणाप्रत जाण्याविषयी देण्यात आलेले प्रस्ताव समाविष्ट करा. बाहेरील लोकांशी आपले संभाषण सुधारण्यासाठी तसेच आस्थेचा पाठलाग करण्याचे सर्वांना उत्तेजन देऊन हा भाग संपवावा.
गीत १२३ (६३) व समाप्तीची प्रार्थना.