सुवार्ता सादरता
संध्याकाळी
१ येशू ख्रिस्ताच्या आरंभीच्या काही शिष्यांना यहुदी प्रमुख याजकाने असे म्हटलेः “तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे.” (प्रे. कृत्ये ५:२८) त्या क्षेत्रात बांधवांनी आपले प्रचारकार्य चांगलेपणाने उरकले होते हे स्पष्ट दिसते, आणि त्यांनी शहरातील प्रत्येकाचा शोध घेतला असावा हेही स्पष्ट आहे. ते तेथे तसेच इतरत्रही कसून साक्ष देत राहिले.—प्रे. कृत्ये ८:२५.
२ आज पुष्कळ क्षेत्रात आम्ही सत्याच्या शिकवणीने आपले काम केले आहे. अशा क्षेत्रात प्रचारकांची चांगली वाढ तसेच मंडळ्यांची वृद्धीही दिसून आली आहे. क्षेत्रे लहान होत गेली व ती सारखी उरकण्यात येऊ लागली. यामुळे अधिक लोकांप्रत सुवार्ता घेऊन जाण्यासाठी आपले क्षेत्र विस्तारीत करावे लागले.
संध्याकाळच्या साक्षीकार्याचे लाभ
३ आपले क्षेत्र विस्तारीत करण्याचा एक मार्ग पुष्कळ प्रचारकांना आढळला आहे व तो म्हणजे संध्याकाळचे क्षेत्रकार्य. दिवसभरात घरी न भेटणाऱ्या पुष्कळ घरमालकांना त्यांना भेटता आले. संध्याकाळच्या वेळी भेट देताना बहुधा प्रत्येक घरात कोणी ना कोणी तरी आढळल्याचे प्रचारकांनी कळवले आहे. अधिक लोक भेटत असतात इतकेच नाही तर ते आरामशीर असतात व आमचा संदेश ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत राहतात. विभागीय देखरेख्यांनी पुष्कळ मंडळ्यांना सायंकाळच्या साक्षीकार्याची आखणी करण्याची मदत दिली आहे. विभागीय देखरेख्यांच्या भेटी दरम्यान बुधवारी नित्याने होत असलेल्या सायंकाळच्या क्षेत्रसेवेते सर्व प्रचारकांनी सहभाग घ्यावा असे उत्तेजन दिले जात आहे.
४ तुम्ही तुमच्या क्षेत्रात कधी सायंकाळचे क्षेत्रकार्य केले आहे का? उन्हाळ्यात सूर्य उशीरा अस्ताला जात असल्यामुळे संध्याकाळी आम्हाला इतर ऋतुपेक्षा अधिक वेळ क्षेत्रात असण्यासाठी मिळतो. संध्याकाळच्या वेळेतील एक भाग घरोघरच्या कार्यासाठी किंवा घरी न भेटलेल्यांची भेट देण्यासाठी वापरता येईल. मग, संध्याकाळी आपल्याला पुनर्भेटी किंवा पवित्र शास्त्र अभ्यासाचे काम करता येईल. वर्षात नंतर लवकर अंधार होत असला तरी संध्याकाळच्या आधीची वेळ आम्हाला घरोघरच्या कार्यासाठी देता येईल. अर्थातच, जेथे अंधार पडल्यावर काम करणे सुरक्षित नाही अशा क्षेत्रात असताना आम्ही मनाची एकाग्रता तसेच विवेकी बुध्दीचा वापर केला पाहिजे.
विचारशील असा
५ संध्याकाळच्या साक्षीकार्यात आम्हाला यशस्वी व्हावयाचे आहे तर काही मूलभूत मुद्दे आपल्या मनात ठेवले पाहिजेत. उदाहरणार्थ, काही क्षेत्रात कोणी अनोळखी पाहुणा संध्याकाळी एकाएकी भेटण्यास आल्यावर लोकांना एकदम बावरल्यासारखे वाटत असल्यामुळे आम्ही आमच्या प्रस्तावनेत उबदार व मैत्री प्रदर्शित करून आमच्या भेटीचा उद्देश त्वरीत सांगितला पाहिजे. घरमालकाच्या कल्याणाविषयी आम्ही खरी कळकळ व्यक्त केल्यास त्यांना निर्धास्त वाटते व ते आनंदाने आपले विचार व्यक्त करू लागतात.
६ काही ठिकाणी घरमालकांनी आपल्या सुरक्षेचा प्रबंध केलेला असतो. तेव्हा कदाचित त्यांच्यासोबत इंटरकॉममधून बोलावे लागेल किंवा दरवाजा बंद ठेवूनच ते बोलतील किंवा आपल्याला दारावर बसवलेल्या छिद्रातून बघतील. घरमालकाने केलेल्या व्यवस्थेला मान दिल्यामुळे तो आपण सादर करीत असलेल्या सत्याकडे अधिक कान देण्याचे पसंद करील.
७ कित्येक मंडळ्यांनी सायंकाळी गटाचे साक्षीकार्य आठवड्यातील एक किंवा दोन दिवशी योजिलेले आहे. यामुळे पूर्ण वेळेची प्रापंचिक नोकरी करणाऱ्या बांधवांना सेवकार्यात मोठी मदत मिळाली व त्यांना अधिक प्रचारकांसोबत कार्य करणे जमू शकले, जे त्यांच्या कामाच्या वेळेमुळे पूर्वी करता येत नव्हते. संध्याकाळच्या साक्षीकार्यामुळे काही प्रचारकांना क्षेत्रात अधिक वेळ देता आला व यामुळे ते इतरांमध्ये सुवार्तेची सहभागिता करण्यात अधिक कुशल बनले. तसेच पुष्कळ नवे पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यात आले आणि हे अशांचे होते, ज्यांनी पूर्वी यहोवाच्या साक्षीदारांचे ऐकून घेतले नव्हते.
८ तर मग, तुम्हाला संध्याकाळच्या साक्षीकार्यात सहभागी होता येऊन या ‘सुवार्तिकाचे काम करण्याच्या’ जोड हक्काचा अनुभव अनुभवता येईल का? (२ तीम. ४:५) आम्हापैकी अधिकांनी या प्रश्नाचे उत्तर निश्चयाने दिल्यास आमचे क्षेत्र सत्याने भरण्याचे चांगले काम आपल्याला करता येईल.