पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
भाग २: उत्साह वाढविणे
१ एखाद्या कार्यात आपल्याला आनंद मिळत असला तर त्या कार्याचा उत्साह वाढविणे हे सोपे असते. शिवाय हेही खरे की, जेव्हा तयारी केलेली असते तेव्हा ते काम करण्याचा आनंद लाभत असतो. हेच आमची सेवा पूर्ण तऱ्हेने करण्याविषयी खरे आहे.—२ तीमथ्य ४:५.
तयारी महत्त्वाची
२ क्षेत्र सेवेतील आमचा उत्साह हा आम्ही यासंबंधाने किती चांगली तयारी केली आहे व कितीदा सेवाकार्यास जात असतो यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर आम्हाला घरोघरच्या कार्यात कोणी मुस्लीम भेटला तर आम्ही काय बोलू शकू? एक चांगली तयारी केलेला प्रचारक असे म्हणू शकतोः “ठीक आहे. मी पुष्कळ मुस्लीमांसोबत बोललो आहे. मी अलिकडेच या पुस्तकामध्ये तुमच्या धर्माच्या काही शिकवणींविषयीची माहिती वाचीत होतो. [रिझनिंग पुस्तकाच्या पृष्ठ २३ कडे वळा.] येथे म्हटले आहे की, येशू हा संदेष्टा होता असा तुमचा विश्वास आहे, पण तुम्ही म्हणता की, मोहंमद हा शेवटला व महत्त्वाचा संदेष्टा आहे, हो ना? [प्रतिसादास वाव द्या.] मोशे देखील खरा संदेष्टा होता असा तुमचा विश्वास आहे का? [होकारार्थी प्रतिसादास वाव द्या.] तर मग, या पवित्र लिखाणातून मोशे देवाकडून त्याच्या व्यक्तीगत नामाविषयी जे शिकला त्याविषयी जरा दाखवू का?” तेव्हा निर्गम ६:३ काढून वाचा. अशाप्रकारे तुम्हाला मनोरंजक संभाषणाची सुरवात करता येईल.
३ विशिष्ट पृष्ठांचे आकडे लक्षात ठेवणे हे आम्हापैकी अनेकांना बरेच मुष्किलीचे वाटत असते. पण थोडीशी तयारी व तालीम केली तर रिझनिंग पुस्तकाच्या आरंभाला “कॉनव्हर्सेशन स्टापर्स” हे जे सदर दिलेले आहे त्याचा उपयोग करता येईल. येथे एका विशिष्ट धर्माच्या लोकांसोबत गाठ पडल्यावर त्यांच्याशी कसे बोलावे याविषयी मदत करणारी कितीतरी उपयुक्त माहिती आपल्याला आढळेल.
४ रिझनिंग पुस्तकात प्रस्तावनेविषयी देखील सुंदर सदर आहे. आपली प्रस्तावना यांना का जुळवून ठेवू नये? आपल्याला परिस्थितीनुसार आपली सादरता ठेवावी लागेल. रिझनिंग पुस्तकात पुष्कळ विषयांच्या शेवटी “इफ समवन् सेस्,” हे एक सदर आहे, ज्यात विषयाला अनुलक्षून जे आक्षेप घेतले जातात किंवा जे प्रश्न विचारले जातात त्याला कशी उत्तरे द्यावीत याबद्दलची सूक्ष्म माहिती देण्यात आली आहे.
तयारी कशी करावी
५ सेवा सभेत जेव्हा एखाद्या प्रकाशनाची चर्चा होणार असते तेव्हा त्याकडे लक्ष द्या व यासंबंधाने चर्चा वा प्रात्यक्षिक सादर होत असताना त्याला अनुसरण्यासाठी ते प्रकाशन आपणासोबत घेऊन या. याद्वारे तुम्हाला इतरांच्या तयारीपासून अधिक लाभ उचलता येईल.
६ सेवेसाठी तयारी करण्यामध्ये थोडाफार वेळ घालविणे हे लाभदायक आहे. जरुर असणारा प्रकाशन साठा आपण घेतला आहे याची खात्री करा. काही मिनिटे संभाषणाचा विषय लक्षात घ्या. तेथे देण्यात आलेल्या शास्त्रवचनांची उजळणी करा आणि जे साहित्य सादर करायचे आहे त्यातून काही बोलके मुद्दे शोधून काढा. हे कुटुंब मिळून तयार करणे खूपच साहाय्यक ठरते.
७ सरावाचे वर्ग ठेवा. हे सराव तुम्हाला विविध वेळी करता येतील—मंडळीचा पुस्तक अभ्यास झाल्यावर, सामाजिक भेटीत, वाहनांमध्ये एकत्र बसताना, किंवा एका घराकडून दुसरीकडे जाताना. सादरता सादर करणे तसेच आक्षेपांची हाताळणी कशी करता येईल याबद्दल चर्चा व प्रात्यक्षिक करणे हे खूप मनोरंजक ठरते व यामुळे आमची कुशलता अधिक प्रखर होण्याची संधी मिळते.
८ परिश्रमाने केलेली तयारी सेवेविषयी आमचा उत्साह वाढवू शकेल. याचा परिणाम आम्ही कुशल कामकरी होऊन आनंदी व समाधानी गोष्टीची कापणी करण्यात दिसेल.—योहान २:१७.