वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९३ पृ. २
  • खंडणीला गुणग्राहकता दाखवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खंडणीला गुणग्राहकता दाखवणे
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने दिलेल्या बलिदानाबद्दल कदर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • खंडणी—देवाची सर्वात मौल्यवान भेट
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खंडणी बलिदान—पित्याकडून असलेलं एक “पूर्ण दान”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km २/९३ पृ. २

खंडणीला गुणग्राहकता दाखवणे

१ मृत नातेवाईकाला किंवा मित्राला गुणग्राहकता दाखवण्याची इच्छा सर्व संस्कृतीत सर्वसामान्य गोष्ट आहे. ही इच्छा विशेषत: तीव्र होते जेव्हा प्रिय व्यक्‍तिचा मृत्यू इतरांना वाचवताना झाला असेल. सार्वकालिक जीवनाच्या आशेत भाग घेणाऱ्‍या सर्वांना एप्रिल ६ ता. ख्रिस्ताच्या मृत्युच्या स्मरणदिनाला उपस्थित राहून खंडणीला गुणग्राहकता दाखवण्याची मोठी कारणे आहेत.—२ करिंथ ५:१४; १ योहान २:२.

२ यहोवाच्या प्रेमाचे गुणग्रहण करा: आमचा महान सत्कृत्यकर्ता, यहोवा देव, ज्याने खंडणी पुरवली त्याला आम्ही आमची खोल गुणग्राहकता दाखवतो हे किती योग्य आहे! (१ योहान ४:९, १०) लाखो धार्मिक स्वर्गदूतांमधील एक नव्हे तर त्याच्या एकुलत्या एक अतिप्रिय पुत्राचीच अमूल्य देणगी म्हणून पुरविलेल्या खंडणीवरुन यहोवाच्या प्रेमाची सखोलता दिसून येते. (नीती. ८:२२, ३०) यहोवाला सर्वात उत्तम ओळखणारा हा पुत्र येशू, याने आठवण करुन दिली: “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याजवर विश्‍वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.

३ येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचे गुणग्रहण करा: अशाचप्रकारे, हे उचित आहे की आम्ही येशू ख्रिस्तालाही, ज्याने बहुतांच्या खंडणीसाठी आपला जीव दिला सखोल गुणग्राहकता दाखवतो. (मत्तय २०:२८) खंडणीसंबंधाने यहोवाच्या इच्छेला स्वत:हून अधीन झाल्याने त्याचे प्रेम, दिसून येते. आमच्यासाठी खंडणी देण्याकरिता त्याने त्याच्या पित्याबरोबरचा व अयुते धार्मिक स्वर्गदूतांच्या सोबत अनुकूल परिस्थितींमध्ये असणाऱ्‍या सहवासाचा त्याग केला. पापी मानवांमध्ये राहण्याच्या आव्हानामुळे व त्यांच्या अधीन होण्यामुळे किंवा मृत्युद्वारे खंडणी देण्याच्या ज्ञानामुळे त्याच्या मनात शंका आली नाही. उलटपक्षी, त्याने “मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरुप धारण केले आणि तेही वधस्तंभावरचे मरण, सोशिले एथपर्यंत आज्ञापालन करुन स्वत:ला लीन केले.”—फिलिप्पै २:५-८.

४ खंडणीला आम्ही गुणग्राहकता कशी दाखवतो?: खंडणीबद्दल आमची गुणग्राहकता फक्‍त आभार मानण्यापलिकडे गेली पाहिजे. आम्ही येशूद्वारे तारण मिळण्याच्या देवाच्या तरतुदीबद्दल शिकले पाहिजे. (योहान १७:३) मग आम्ही खंडणीवर विश्‍वास प्रकट केला पाहिजे. (प्रे. कृ ३:१९) यहोवा देवाला आम्ही स्वत:च्या समर्पणाने बहाल करण्यास व बाप्तिस्मा घेण्यास प्रवृत्त झालो पाहिजे. (मत्तय १६:२४) आमच्या समर्पणाप्रमाणे आचरण ठेवत असता, आम्ही दुसऱ्‍यांना तारणाच्या आश्‍चर्यकारक तरतूदीबद्दल सांगण्याची प्रत्येक संधी साधली पाहिजे.—रोम १०:१०.

५ ह्‍या गरजा पूर्ण करणे आमच्यातील कोणाच्या क्षमतेपलिकडले नाही. मीखा ६:८ आम्हाला खात्री पुरविते की “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून परमेश्‍वर [यहोवा न्यू.व] तुजजवळ काय मागतो?” अशाचप्रकारे, दाविदाने यहोवास म्हटले: “सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते, तुझ्याच हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहो.”—१ इति. २९:१४.

६ यहोवाच्या आश्‍चर्यकारक तरतूदींसाठी आमच्या गुणग्राहकतेला तीव्र करण्यासाठी, ग्रेटेस्ट मॅन पुस्तकाचे ११२ व १२६वा धडा स्मारक दिनाआधी कुटुंब यानात्याने वाचून चर्चा का करु नये? ह्‍यापद्धतीने, आपण सर्वजण एप्रिल ६, १९९३ रोजी होणाऱ्‍या स्मारक विधित खंडणीबद्दल गुणग्राहकता दाखवण्यासाठी स्वत:ला मानसिकरित्या तयार करु शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा