क्षेत्र सेवेसाठी एक खास महिना
१ तुमच्यासाठी डिसेंबर हा खास क्षेत्र सेवेचा महिना असू शकेल काय? तुमच्या नित्यक्रमामध्ये काही बदल करावे लागतील परंतु, त्याचे बक्षीस खरोखरीच योग्यतेचे ठरणार नाही का?
२ काही बाप्तिस्मा प्राप्त युवक प्रचारकांना शाळेची अधिक सुट्टी असेल आणि त्यांना त्या महिन्यासाठी साहाय्यक पायनियर सेवेत दाखल होण्यास आवडेल. क्षेत्रात, त्यांच्यासोबत काही वडील, सेवा-सेवक आणि इतर प्रचारक काम करीत असल्यामुळे ते त्यांच्यासाठी किती उत्तेजनदायक असेल! त्या महिन्यात पायनियरींग करण्यासाठी व्यक्तिगत परिस्थिती वाव देत नसली तर, पायनियरींग करणाऱ्यांबरोबर सेवेत काही अधिक तास घालवण्यासाठी तुम्हाला शक्य होईल का? हे निश्चितच, परस्परांसाठी उत्तेजनदायक ठरेल.
३ सर्व प्रचारकांनी अधिक परिश्रम घेतले तर, सुट्टीच्या हंगामात, पायनियरींग करणाऱ्यांसोबत क्षेत्र सेवेत काम करण्यासाठी कोणीतरी असेल म्हणून, वडील, गटाच्या दररोजच्या साक्षकार्यासाठी व्यवस्था करू शकतील.
४ तुमच्या मंडळीत, व्यक्तिगतपणे, कौटुंबिक गट या नात्याने तसेच मंडळी मिळून, डिसेंबर हा क्षेत्र सेवेचा खास महिना बनवण्यासाठी योजना करण्याची वेळ, आता आहे.