तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करा
१ टेहळणी बुरूज व सावध राहा! या नियतकालिकांतील, जागतिक प्रश्नांपासून ‘देवाच्या गहन गोष्टींपर्यंत’ सर्व विषयांचा समावेश करणाऱ्या समयोचित व माहितीपर लेखांसाठी आपण त्यांची कदर करतो. (१ करिंथ. २:१०) सत्यावर क्रमाक्रमाने प्रकाश टाकण्यासाठी यहोवा ज्यांचा उपयोग करत आहे अशा, या नियतकालिकांमध्ये वाचण्यात आलेल्या अनेक नवीन व उभारणीकारक गोष्टी आपल्या सर्वांना आठवतात. (नीति. ४:१८) संधी मिळताच, किरकोळ प्रती व वर्गण्या सादर करण्याद्वारे, ही नियतकालिके होता होईल तितक्या व्यापक प्रमाणावर वितरित करण्याची आपण उत्सुकता बाळगू इच्छितो.
२ तुमच्या क्षेत्राचा अभ्यास करा: तुमच्या परिसरात कोणत्या प्रकारचे लोक राहतात? ते धकाधकीचे जीवन जगत असल्यास, तुम्हाला संक्षिप्त व आटोपशीर प्रस्तुती तयार करावी लागेल. तुमच्या क्षेत्रातील लोकांचे जीवन फारसे धकाधकीचे नसल्यास, कदाचित तुम्हाला अधिक बोलता येईल. अधिकांश घरमालक दिवसा कामावर जात असल्यास, दुपारी उशिरा किंवा संध्याकाळी उशीर होण्यापूर्वी त्यांच्या घरी भेटी दिल्यास तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळतील. तुम्ही दिवसा रस्त्यावरील साक्षकार्याद्वारे अथवा दुकाना-दुकानातील कार्य करण्याद्वारे काहींशी संपर्क साधू शकता. काही प्रचारकांना बस किंवा रेल्वे स्थानकांजवळ व सार्वजनिक उद्यानांत लोकांशी अनौपचारिकपणे बोलून चांगले परिणाम प्राप्त होतात.
३ नियतकालिकांशी परिचित व्हा: प्रत्येक अंक मिळताच तो वाचून काढा. असे लेख निवडा जे तुमच्या मते तुमच्या क्षेत्रातील लोकांना आकर्षक वाटतील. त्यांच्या चिंतेचे कोणते विषय आहेत? तुम्हाला जो लेख सादर करायचा आहे त्यातून उद्धृत करता येईल असा एखादा खास मुद्दा शोधा. अभिरूची जागृत करण्यासाठी वापरता येईल असा एखादा प्रश्न शोधून काढा. संधी मिळाल्यास घरमालकाला वाचून दाखवण्यासाठी, एखादे समयोचित शास्त्रवचन निवडा. वर्गणी स्वीकारण्याविषयी घरमालकास उत्तेजन देण्यासाठी तुम्हाला काय म्हणता येईल व पुनर्भेटीची पार्श्वभूमी तुम्ही कशी तयार करू शकाल याचा विचार करा.
४ प्रास्ताविक शब्दांची तयारी करा: स्वतःची ओळख करून देण्यासाठी व संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही काय म्हणू इच्छिता ते विचारपूर्वक ठरवा. काहींना सुरवातीला हा अभिप्राय मांडणे परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे: “मी या नियतकालिकात एक सुरेख लेख वाचला असून मला तो इतरांनाही द्यायचाय.” अनेक जण, जो बोलण्याजोगा मुद्दा उपयोगात आणू इच्छितात त्याकडे लक्ष वेधणारा एखादा प्रश्न मांडून सुरवात करतात. उदाहरणार्थ:
५ गुन्हेगारीच्या अस्तित्वाबद्दल एखाद्या लेखाकडे लक्ष वेधताना, तुम्ही विचारू शकता:
◼ “रात्री दरोडा पडण्याच्या किंवा कोणता अपाय होण्याच्या भीतीशिवाय निर्धास्त झोपता येणं कशाप्रकारे शक्य होईल?” या समस्येच्या एका उपायाबद्दल तुमच्याजवळ काही माहिती आहे याबद्दल सांगा. या उपायाकरवी लवकरच इतर सर्व प्रकारच्या सामाजिक अव्यव्यस्थेलाही संपुष्टात आणले जाईल. नियतकालिकातून अशाप्रकारची आशा देणारे काही उल्लेखित करा. तुम्ही पुन्हा भेट देता तेव्हा ज्ञान पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करू शकता.
६ कौटुंबिक जीवनावर आधारित असलेला एखादा लेख सादर करत असताना, तुम्हाला असे म्हणता येईल:
◼ “अधिकाधिक पालकांना हल्ली, कुटुंबाचं पालनपोषण करणं अत्यंत आव्हानात्मक वाटतं. या विषयावर अनेक ग्रंथ लिहिण्यात आले आहेत, पण याविषयी तज्ज्ञांचे देखील एकमत नाही. विश्वासहार्य मार्गदर्शन देऊ शकेल असं कुणी अस्तित्वात आहे का?” बायबलमध्ये सापडणारा सुज्ञ सल्ला प्रदर्शित करणारे नियतकालिकातील एखादे खास विधान त्यांना दाखवा. पुनर्भेट द्याल तेव्हा, ज्ञान पुस्तकात १४५-८ पृष्ठांवर मुलांचे संगोपन करण्याविषयी दिलेल्या शास्त्रवचनीय विचारांवर चर्चा करा.
७ एखाद्या सामाजिक प्रश्नावर आधारित असलेला लेख सादर करताना, तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “आपण तणावपूर्ण काळात जगत असल्यामुळे अनेक लोक भाराक्रांत झाले आहेत. आपण अशा दशेत जगावं हे देवाने योजलं असावं, असं तुम्हाला वाटतं का?” आजच्या समस्यांना कशाप्रकारे तोंड द्यावे हे दाखविणाऱ्या किंवा चिंतांपासून मुक्त अशा भवितव्याची अपेक्षा करण्यासाठी कारणे देणाऱ्या एखाद्या लेखाकडे लक्ष वेधा. तुमच्या पुढच्या भेटीत, ज्ञान पुस्तकातील ४-५ पृष्ठांवरील चित्र व मथळ्यावर चर्चा करा आणि त्यानंतर थेट एक गृह बायबल अभ्यास सुरू करा.
८ घरमालकाशी जुळवून घ्या: तुम्हाला निरनिराळ्या गोष्टींत रसिकता बाळगारे व विविध पार्श्वभूमी असलेले लोक भेटतील. प्रत्येक घरमालकासाठी फेरबदल करता येतील या दृष्टीने एक मूळ प्रस्तुती तयार करा. तुम्ही जे बोलता ते एखादा पुरुष, स्त्री, वयस्क गृहस्थ किंवा एखादा तरुण यांसोबत तुम्हाला कशाप्रकारे जुळवून घेता येईल यावर आधीच विचार करा. तुम्ही काय म्हणावे याबद्दल कोणतेही अनिवार्य नियम नाहीत. तुमच्या दृष्टीने जे सहजसोपे व परिणामकारक आहे ते उपयोगात आणा. तथापि उत्साही असा, मनापासून बोला व एकण्यात तत्परता दाखवा. ‘योग्य मनोवृत्ती असलेले’ तुमचा प्रांजळपणा ओळखतील व अनुकूलपणे प्रतिसाद देतील.—प्रे. कृत्ये १३:४८, NW.
९ एकमेकांस साहाय्य करा: एकमेकांसोबत विचारांची देवाणघेवाण करण्याद्वारे आपण स्वतःस व्यक्त करण्याच्या नवनवीन पद्धती शिकतो. एकत्र मिळून आपल्या प्रस्तुतींचा सराव केल्यामुळे आपल्याला अनुभव व आत्मविश्वास लाभतो. (नीति. २७:१७) तुम्ही काय बोलणार याचा आधीच सराव केल्यास तुम्हाला दारावर बोलतेवेळी इतका तणाव वाटणार नाही. पालकांनी मुलांना तयारी करण्यात मदत करण्यासाठी वेळ काढावा, ते त्यांच्या प्रस्तुतीचा सराव करतात तेव्हा कान देणे व सुधारणेसाठी सूचना देणे अतिमहत्त्वपूर्ण आहे. नवीन लोक अधिक अनुभवी प्रचारकांसोबत कार्य करण्याद्वारे लाभ प्राप्त करू शकतात.
१० तुमची स्वतःची नियतकालिक प्रस्तुती तयार करणे अवघड नाही. बोलण्यासाठी एखाद्या खास विषयाचा विचार आधीपासून करणे व मग तो एका आकर्षक पद्धतीने व्यक्त करणे, एवढेच खरे तर यात समाविष्ट आहे. पुढाकार घेऊन पूर्वविचार केल्यास तुम्ही एखादी छान प्रस्तुती तयार करू शकता जी तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळवून देईल.
११ नियतकालिकांचे वितरण हे सबंध जगात राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्याचे आपले एक प्रमुख माध्यम आहे. तुम्ही प्रांजळ लोकांना टेहळणी बुरूज व सावध राहा! च्या किरकोळ प्रती किंवा वर्गण्यांचा वाटप करू शकला, तर शब्दांशिवाय ही नियतकालिकेच स्वतःस व्यक्त करतील. ती किती महत्त्वपूर्ण आहेत व त्यांत सामावलेला संदेश जीवनरक्षक आहे याचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका. अशाप्रकारे, ‘चांगले केल्याने व दान केल्याने’ यहोवा अत्यंत संतुष्ट होतो.—इब्री. १३:१६.