तुमच्या सेवेत विविध माहितीपत्रकांचा वापर करा
१ आज लोक विविध विषयांमध्ये रस घेतात. तुम्ही जुलै दरम्यान क्षेत्र सेवेत भाग घेता तेव्हा, अनेक विभिन्ना माहितीपत्रके तुमच्या सोबत ठेवू शकता व क्षेत्रातील लोकांना आवडेल असे एखादे माहितीपत्रक वापरू शकता. कदाचित तुम्हाला यापैकी एखाद्या सादरतेचा उपयोग करून पाहणे आवडेल:
२ “आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही विचारू शकता:
▪ “समस्या नसत्या तर जग कसे असते असे तुम्हाला वाटते? [प्रातिसादासाठी वाव द्या.] आपल्या सर्व समस्या सोडवल्या जाण्याची वास्तविकपणे अपेक्षा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, देवाला पृथ्वीवरील आधिपत्य ताब्यात घेण्यास वाव देणे होय. [पृष्ठ २० काढा आणि पहिला परिच्छेद वाचा, त्यामध्ये स्तोत्र ३७:१० व स्तोत्र ४६:९ उद्धृत केले आहे.] तुम्हाला अशा जगात राहावेसे वाटत असल्यास, तुम्ही हे माहितीपत्रक वाचले पाहिजे.” माहितीपत्रक सादर करा.
३ “व्हेन समवन यू लव्ह डाईझ” अशा प्राकारे सादर केले जाऊ शकते:
▪ “आपल्यातील कोणाचाही प्रियजन मृत्यूमध्ये गमावणार नाही असा दिवस कधी येईल असे तुम्हाला वाटते का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] असा दिवस नजीकच्या भवितव्यात येत आहे या बायबलच्या निश्चित अभिवचनासह या सुंदररितीने लिहिलेल्या माहितीपत्रकाने लाखोंना सांत्वन दिले आहे. [पृष्ठ ५ काढा व पाचवा परिच्छेद तसेच १ करिंथकर १५:२१, २२ वाचा. त्यानंतर पृष्ठ ३० वरील चित्र पाहा.] आपल्या मृत प्रियजनांचे पुनरुत्थानात पुन्हा स्वागत करताना आपण ज्या अनुभवाचा आनंद घेऊ तो या कलाकाराने येथे रेखाटला आहे. परंतु, ते आनंदी दृश्य कोठे पाहावयास मिळेल? हे माहितीपत्रक तुम्हाला या प्राश्नाचे बायबल काय उत्तर देते हे दाखवील.” माहितीपत्रक स्वीकारण्यात आल्यावर, तुम्ही पुढे असे म्हणू शकता: “मला पुन्हा एकदा येऊन या विषयावर अधिक चर्चा करावयास आवडेल.”
४ बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या थेट प्रास्तावाचा उपयोग करून “पहा! मी सर्व काही नवे करतो” हे माहितीपत्रक तुम्ही सादर करू शकता:
▪ “तुम्ही बायबलविषयी ऐकले असेल परंतु, त्याच्याविषयी अधिक शिकून घेण्याची संधी तुम्हाला मिळाली नसेल. या प्राकाशनामध्ये बायबलविषयी सामान्यपणे विचारण्यात येणारे काही प्राश्न देण्यात आले आहेत. [पृष्ठ ३० चा संदर्भ द्या.] या शेवटल्या प्राश्नाने पुष्कळांची आस्था जागृत केली आहे: ‘तुम्ही परादीसमध्ये सार्वकालिक जीवनासाठी तयारी कशी करू शकता?’” तुम्ही पृष्ठे २९-३० वरील परिच्छेद ५७-८ ची चर्चा केली आणि प्राकटीकरण २१:३, ४ वाचले तर एका बायबल अभ्यासासाठी पाया घातला असेल. माहितीपत्रक सादर करून व इतर काही प्राश्नांची चर्चा करता यावी म्हणून पुनर्भेटीची व्यवस्था करून समाप्त करा.
५ “द डिव्हाईन नेम दॅट वील एन्ड्यूर फॉरएव्हर” या माहितीपत्रकासह तुम्हाला ही सोपी सादरता वापरून पाहण्यास आवडेल:
▪ “मी बायबलमधून सर्वात प्राथम देवाचे नाव शिकलो. ते काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] मी तुम्हाला ते दाखवतो. ते बायबलमध्ये स्तोत्र ८३:१८ येथे दिले आहे. [वाचा.] हे माहितीपत्रक, देवाचे नाव, यहोवा अनेक विविध भाषांमध्ये कसे आहे ते दाखवते. [पृष्ठ ८ वरील चौकोन दाखवा.] तुम्हाला यहोवा व त्याच्या उद्देशांविषयी अधिक शिकून घेण्यास आवडेल, तर तुम्ही हे माहितीपत्रक वाचले पाहिजे.” घरमालकाच्या हातात माहितीपत्रक द्या.
६ अशी विविध उत्तम माहितीपत्रके असल्यामुळे, आपण निश्चितच “दीनांस शुभवृत्त सांगण्यास” चांगल्या रीतीने सज्ज आहोत.—यश. ६१:१.