इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
१ इतरांची खरी काळजी घेणारा या नात्याने यहोवा सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. विश्वाचा सार्वभौम असल्याने, तो त्याच्या मानवी निर्मितीच्या गरजांबद्दल संवेदनाक्षम आहे. (१ पेत्र ५:७) येशूने आपल्या पित्याचे गुण प्रदर्शित करण्यासाठी शिष्यांना उत्तेजन दिले, जो पिता नीतिमानांवर व अनीतिमानांवर सूर्य उगवितो व पाऊस पाडतो. (मत्त. ५:४५) इतरांबद्दल खरी चिंता बाळगून—तुम्हाला भेटणाऱ्या सर्वांना राज्याचा संदेश सांगण्यास तयार राहण्याद्वारे तुम्ही यहोवाचे अनुकरण करू शकता. जुलै दरम्यान सेवेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या माहितीपत्रकांशी चांगल्यारितीने परिचित होण्याद्वारे तुम्ही इतरांना आध्यात्मिक साहाय्य देण्याकरता उत्तम स्थितीत असाल. तुम्ही सुरवातीच्या भेटीकरता कशी तयारी करू शकता व नंतर समयोचित पुनर्भेटी देऊन आस्थेचा मागोवा कसा घेऊ शकता याविषयी पुढील सूचना काही कल्पना देतात.
२ “देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही म्हणू शकता:
◼ “देव खरोखर आपली काळजी घेत असल्यास, तो मानवांवर दुःख का येऊ देतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] हे माहितीपत्रक केवळ या प्रश्नाचेच समाधानकारक उत्तर देत नाही तर मानवाने स्वतःवर व त्याच्या पार्थिव घरावर जे नुकसान ओढवून घेतले आहे त्याची भरपाई करण्याचे अभिवचन देवाने दिले आहे हे देखील दाखवते.” पृष्ठ २७ वरील परिच्छेद २३ वाचा. त्याखालील चित्र दाखवा, आणि परिच्छेद २२ मधून स्तोत्र १४५:१६ वाचा. माहितीपत्रक सादर करा. ते स्वीकारण्यात आल्यास, पुढील भेटीत ज्याचे उत्तर दिले जाईल असा एखादा प्रश्न विचारा, जसे की: “देव, मानवजातीला आशीर्वाद देण्याचा व पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करण्याचा आपला उद्देश कसा पूर्ण करील हे जाणण्यास तुम्हाला आवडेल का?”
३ ज्यांना तुम्ही “देव खरोखरी आपली काळजी करतो का?” हे माहितीपत्रक दिले आहे अशांकडे परत गेल्यावर, तुम्ही अशाप्रकारे आणखी एक चर्चा सुरू करू शकता:
◼ “मागील भेटीत, आपण देव खरोखरी आपली काळजी करतो व मानवाने स्वतःवर आणि त्याच्या पार्थिव गृहावर जे नुकसान ओढवून घेतले आहे त्याची भरपाई करण्याचा त्याचा उद्देश आहे याचा विचार केला होता.” माहितीपत्रकातील पृष्ठे २-३ वरील चित्र काढा व असे म्हणा: “देव, मानवजातीला आशीर्वाद देण्याचा व पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करण्याचा आपला उद्देश कसा पूर्ण करील हा प्रश्न विचारून आपण आपले संभाषण थांबवले होते. तुम्हाला काय वाटते?” प्रतिसादासाठी वाव द्या. पृष्ठ १७ काढा, परिच्छेद २ व दानीएल २:४४ वाचा. त्यानंतर, पृष्ठ १८ वरील परिच्छेद १२ वाचा. मग, घरमालकाला तुमच्यासोबत माहितीपत्रकातील नवव्या भागाची चर्चा करण्यास आवडेल का असे विचारा. त्याला आवडल्यास, त्याच्यासोबत त्या भागाचा अभ्यास करा.
४ “तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा” हे माहितीपत्रक सादर करताना उपयोगात आणली जाईल अशी प्रस्तुती येथे दिली आहे. त्याचे मुखपृष्ठ दाखवा व म्हणा:
◼ “मृत्युमुळे आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्या लाखो लोकांना ज्याद्वारे सांत्वन आणि उमेदी मिळाली आहे ते माहितीपत्रक आम्ही आज देत आहोत. मृतांसाठी कोणती आशा आहे याचा तुम्ही कधी विचार केलात का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल, पुनरुत्थानाविषयी देवाच्या अभिवचनाबद्दल स्पष्टरित्या सांगते.” योहान ५:२८, २९ वाचा. माहितीपत्रक उघडा आणि पृष्ठ २८ वरील शेवटल्या व पृष्ठ ३१ वरील पहिल्या परिच्छेदात दिलेल्या मुद्यांवर टिपणी करा. सोबत दिलेली चित्रे दाखवा. माहितीपत्रक सादर करा. तुम्ही असा प्रश्न विचारून पुनर्भेटीचा मार्ग तयार करू शकता, “सरतेशेवटी मृत्यू पूर्णतः काढून टाकण्यात येईल याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?”
५ “तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा” हे माहितीपत्रक तुम्ही जेथे दिले असेल, तेथे पुनर्भेटीच्या वेळी ही प्रस्तुती वापरण्याची तुमची इच्छा असेल:
◼ “आपण आधी, पुनरुत्थानाच्या सुंदर प्रत्याशेविषयी चर्चा केली होती. मी तुम्हाला दिलेले माहितीपत्रक, सरतेशेवटी मृत्यू पूर्णतः काढून टाकण्यात येईल याविषयी आपल्याला खात्री का असू शकते याचे स्पष्टीकरण देते. तुम्हाला देवाची अभिवचने सांत्वनदायक व खात्रीलायक असल्याची आढळली नाहीत काय?” प्रतिसादासाठी वाव द्या. त्यानंतर, माहितीपत्रकातील पृष्ठ ३१ काढा आणि दुसरा व तिसरा परिच्छेद वाचा तसेच प्रकटीकरण २१:१-४ देखील वाचा. कधीच मृत्यू न येता जीवनाचा आनंद लुटण्याचे जे भवितव्य आपल्यासमोर आहे त्यास ठळकपणे मांडा. जितकी आस्था दाखवली आहे त्यानुसार व परिस्थितीनुसार तुम्ही ज्ञान पुस्तकातून बायबल अभ्यास सादर करू शकता किंवा पुढील पुनर्भेटीकरता मार्ग खुला करण्यासाठी दुसरा प्रश्न विचारू शकता.
६ “जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?” हे माहितीपत्रक सादर करताना तुम्ही पुढीलप्रमाणे म्हणू शकता:
◼ “जीवनाचा काय उद्देश आहे याविषयी अनेक लोक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांनी स्वतःला विचारले आहे: ‘मी येथे का आहे? मी कोठे जात आहे? माझ्याकरता भवितव्यात काय राखून ठेवले आहे?’ याची उत्तरे आपल्याला कोठे सापडतील असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल काय म्हणते त्याकडे लक्ष द्या. [स्तोत्र ३६:९ वाचा.] आपण येथे का आहोत हे समजावण्याकरता मानवाचा निर्माणकर्ता सर्वात योग्य व्यक्ती आहे असा निष्कर्ष काढणे उचित नाही काय? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवाने आपल्याकरता जो महान उद्देश राखून ठेवला आहे तो या माहितीपत्रकात दाखवला आहे.” पृष्ठे २०-१ काढा, मथळा वाचा आणि चित्राबद्दल टिपणी करा; मग माहितीपत्रक सादर करा. ते स्वीकारल्यास, असे विचारा: “मानवांनी पृथ्वीवर परादीसमध्ये सर्वकाळ जगावे हा अद्यापही देवाचा उद्देश आहे याबद्दल आपल्याला खात्री कशी असू शकते?” परत येण्यासाठी वेळ ठरवा.
७ “जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?” हे माहितीपत्रक दिले असल्यास, परतल्यावर तुम्ही असे काही म्हणू शकता:
◼ “माझ्या प्रथम भेटीत, मानवी जीवनाला खरच उद्देश आहे या बायबलच्या दृष्टिकोनाची तुमच्याशी चर्चा करण्यास मला खरोखर आनंद वाटला.” पृष्ठ ३१ वरील चित्र दाखवा आणि विचारा, “मानवांनी पृथ्वीवर परादीसमध्ये सर्वकाळ जगावे अशी देवाची अद्यापही मनसा आहे याची आपल्याला खात्री कशी असू शकते?” पृष्ठ २० वरील परिच्छेद ३ वाचा. पृष्ठ २१ वर “देवाचा अजूनही तोच उद्देश आहे” या उपशिर्षकाखालील मुद्यांची चर्चा करा. माहितीपत्रकाचे अंत्यपृष्ठ दाखवा, व मोफत गृह बायबल अभ्यासाच्या सादरतेविषयी वाचा. ज्ञान पुस्तक सादर करा आणि बायबलचा अभ्यास करण्यासाठी आपण ते कसे उपयोगात आणतो ते दाखवण्याविषयी विचारा.
८ आपल्या सेवाकार्याद्वारे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना ‘सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचण्यासाठी’ मदत करण्याची आपली मनापासूनची इच्छा आहे हे प्रदर्शित झाले पाहिजे. (१ तीम. २:४) यास्तव, सेवाकार्यात भाग घेताना तुम्हाला ज्या भाषा आढळण्याची शक्यता आहे त्या सर्व भाषांतील माहितीपत्रके सोबत घ्या. तुम्ही माहितीपत्रक देता त्या प्रत्येक व्यक्तीला जाऊन पुनर्भेट देण्याकरता तुमच्या सेवा आराखड्यातून वेळ काढा. त्यांच्याकरता खरी चिंता प्रदर्शित केल्याने, बचावासाठी चिन्हीत होण्याकरता खोट्या धर्मात आचरल्या जाणाऱ्या अमंगळ कृत्यांबद्दल जे उसासे टाकून विलाप करतात अशांची मदत करण्यात येईल. (यहे. ९:४, ६) इतरांची खरीच काळजी घेऊन तुम्ही यहोवाचे अनुकरण करत आहात हे जाणल्याने मिळणारा आनंद व समाधान देखील तुम्ही अनुभवू शकता.—पडताळा फिलिप्पैकर २:२०.