प्रांतीय अधिवेशनात नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे सर्व आनंदित
नवीन पुस्तक देवाचे ज्ञान ठळकपणे मांडते
१ “आनंदी स्तुतीकर्ते” या प्रांतीय अधिवेशनातील सबंध कार्यक्रमाने आपण सर्वजण किती आनंदित झालो होतो! शनिवारी दुपारी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या नवीन पुस्तकाविषयी घोषणा आणि त्यानंतर संबंधित माहिती ऐकल्यावर आपल्याला अत्यानंद झाला. पृथ्वीवरील अब्जावधी लोकांना केवळ देव प्रदान करणारे ज्ञान—देव व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांचे ज्ञान हवे आहे.—नीति. २:१-६; योहा. १७:३.
२ वक्त्याने त्या पुस्तकाच्या भागांचे किती स्पष्ट वर्णन दिले! अध्यायांची लक्षवेधक शीर्षके, व्यावहारिक दृष्टान्त, सत्याचे सकारात्मक प्रस्तुतीकरण, सरळ प्रश्न, आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी “तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा” ही पेटी, हे सर्व या पुस्तकाचे वाचन करणाऱ्यांना अपीलकारक वाटणाऱ्या वैशिष्ट्यांपैकी आहेत. परंतु, बायबलच्या मूलभूत शिकवणी लवकरात लवकर प्राप्त केल्यास आपल्या बायबल विद्यार्थ्यांना विशेषतः लाभ मिळेल.
३ शनिवार आणि रविवारच्या समाप्तीच्या भाषणांमध्ये कौटुंबिक अभ्यासासाठी या पुस्तकाचा उपयोग करण्याचे उत्तेजन आपल्याला देण्यात आले होते. आतापर्यंत, आपण त्यातील मजकुराशी संभवतः परिचित झालेलो असू. हे नवीन पुस्तक क्षेत्रात सादर करताना लक्षात ठेवण्याजोग्या काही मुद्यांची चर्चा देखील तुम्ही केलीच असेल.
४ उजळणीचे मुद्दे: तुम्ही आठवण करू शकता, की “मानवजातीला देवाच्या ज्ञानाची गरज का आहे” हा विषय प्रस्तुत करताना, वक्त्याने अनेक मुद्यांवर जोर दिला, त्यामध्ये खालील मुद्यांचाही समावेश होता: (१) अभ्यास चालवण्यासाठी तुम्ही या पुस्तकाचा वापर करता तेव्हा त्यात मुख्य मुद्यांना अस्पष्ट करील अशा बाहेरील माहितीची भर घालणे सुज्ञतेचे ठरणार नाही; ते पुस्तक प्रत्येक अध्यायात जे शाबीत करते तेच कळवण्यावर लक्ष केंद्रीत करा. (२) अध्यायांची लांबी माफक असल्यामुळे तुम्ही अभ्यास कराल त्या प्रत्येक वेळी एक अध्याय पूर्ण करण्यास तुम्हाला सर्वसाधारणपणे शक्य होईल. (३) प्रत्येक अध्यायाच्या शेवटी, “तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा” या पेटीतील प्रश्नांमुळे संक्षिप्त उजळणी करता येईल.
५ बायबल अभ्यासांमध्ये वापर: अनेक प्रचारकांनी त्यांचे बायबल अभ्यास आता या नवीन पुस्तकातून घेणे इष्ट असेल का अशी विचारणा केली आहे. तुम्ही सध्या अभ्यास करत असलेल्या पुस्तकाचा बराच भाग संपवला असेल, तर त्या प्रकाशनाचा अभ्यास पूर्ण करणे व्यावहारिक होईल. अन्यतः, ज्ञान पुस्तकातून अभ्यास घेण्याची शिफारस केली जाते. बायबल अभ्यास सुरू करण्यास तुम्ही माहितीपत्रक किंवा पत्रिकेचा उपयोग केला असल्यास, योग्य वेळी नवीन पुस्तक प्रस्तुत करून त्याचा अभ्यासासाठी वापर करा. पुढील महिन्यांमध्ये, आमची राज्य सेवा यात ज्ञान पुस्तकाच्या उपयोगाविषयी अधिक माहिती येईल.
६ यहोवाने हे नवीन पुस्तक आपल्याला, सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या ज्ञानाविषयी इतरांना शिकवण्यात मदत करण्यासाठी पुरवले आहे. आता आपल्याला चांगली तयारी करून अद्याप करावयाच्या कार्यात पूर्ण सहभाग घेण्याची गरज आहे.