नियमित पायनियर सेवेत अधिक बांधवांची गरज आहे
१ पौलाने आपल्याला, “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” असे आर्जवले. (१ करिंथ. १५:५८) अनेकांकरता, याचा अर्थ नियमित पायनियर सेवा स्वीकारणे असा होतो. भारतात दर वर्षी, सुमारे १०० व्यक्ती नियमित पायनियर बनतात!
२ सध्या, या देशात नियमित पायनियर म्हणून काम करणाऱ्यांमध्ये दोन तृतीयांश व्यक्ती बहिणी आहेत. (स्तोत्र ६८:११) अधिक बांधवांची पूर्ण-वेळेच्या सेवकांमध्ये भरती होऊ शकली तर मंडळीकरता तो केवढा मोठा आनंद असेल! (स्तोत्र ११०:३) अनेक बांधवांना महत्त्वपूर्ण ऐहिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात हे समजण्याजोगे आहे. इतरजण मंडळीच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्याकरता देखील कठीण परिश्रम घेतात. राज्याकरता स्वतः परिश्रम घेणाऱ्या या पुरुषांची आम्ही प्रशंसा करतो.—१ तीम. ४:१०.
३ तथापि, तुम्हा बांधवांपैकी अनेकजण नियमित पायनियर सेवा करू शकतील का? तुमची पत्नी पायनियरींग करत असल्यास, तुम्हीही तिच्यासोबत पायनियरींग करू शकता का? तुम्ही सेवा-निवृत्त असल्यास, पूर्ण-वेळेची सेवा करण्यामध्ये वेळ घालवणे हाच सर्वात समाधानकारक मार्ग आहे याजशी तुम्ही सहमत नाही काय? तुमचे शालेय शिक्षण नुकतेच संपत असल्यास, सेवेच्या जादा विशेषाधिकारांप्रत पोहंचण्याची पायरी म्हणून तुम्ही नियमित पायनियर सेवा स्वीकारण्याबद्दल गंभीर व प्रार्थनापूर्वक विचार केला आहे काय?—इफिस. ५:१५-१७.
४ एका बांधवाने नियमित पायनियरींग करण्यास शक्य व्हावे म्हणून आपला भरभराटीचा धंदा सोडून अर्ध-वेळेची नोकरी स्वीकारली. त्यांच्या उत्तम पुढाकारामुळे, चार मुलांपैकी त्यांची तीन मुले शाळा संपताच नियमित पायनियर बनले. चौथा त्यांच्यासोबत कार्य करण्यास उत्सुक होता. या बांधवाला व त्यांच्या कुटुंबाला समृद्ध आशीर्वाद मिळाले.
५ एक मोठे द्वार उघडे आहे: नियमित पायनियर सेवा, “कार्य साधण्याजोगे [मोठे] द्वार” उघडू शकते. (१ करिंथ. १६:९) नियमित पायनियर असलेल्या बांधवांचा मंडळीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाऊ शकतो. आवेशी क्षेत्र कार्यहालचालीमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी वाढते व ती त्यांच्या ईश्वरशासित प्रगतीकरता हातभार लावते. नियमित पायनियरींग, अधिक सेवेच्या विशेषाधिकारांसाठी मार्ग मोकळा करू शकते. पायनियरींगचे पहिले वर्ष पूर्ण केल्यावर, पायनियर सेवा प्रशालेकरता उपस्थित राहण्याचा आशीर्वाद मिळतो. अविवाहित सेवा सेवक व वडील सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू शकतात. कालांतराने बांधव प्रवासी कार्यासाठी पात्र ठरू शकतील. होय, नियमित पायनियर सेवा यहोवाच्या संघटनेतील या मोठ्या सेवेच्या विशेषाधिकारांसाठी द्वार उघडते.
६ जे बांधव नियमित पायनियर सेवेकरता योजना करू शकतात त्यांना अधिक देण्यातील आनंद लाभू शकतो.—प्रे. कृत्ये २०:३५.