पायनियर या नात्याने तुम्ही यहोवाची सेवा करू शकता का?
१ “ज्योति वाहक” प्रांतिय अधिवेशनातील एका वक्त्याने विचारले: “तुम्ही पायनियरींग करू शकता का? तुम्ही पायनियरींग करू शकाल का?” त्यांनी दर्शविले की हर्मगिदोन आता जवळ आहे त्यामुळे हे प्रश्न समर्पक आहेत, व या गोष्टी प्रचाराचे काम पूर्वीपेक्षा अधिक निकडीचे बनवतात.—१ करिंथ. ७:२९अ.
२ पायनियरींग हे परिश्रमाचे काम आहे यात काही प्रश्नच नाही. त्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची व चांगल्या संघटनेची जरूरी आहे. तथापि, सेवकपणात आमचे परिश्रम “व्यर्थ नाहीत.” (१ करिंथ. १५:५८) ज्या निवडलेल्या इतर कामात आमचा अधिक वेळ व श्रम जातो त्याविषयी देखील असेच म्हटले जाऊ शकते का? यहोवावरील प्रीती त्याच्या सेवेत ख्रिश्चनांना आवेशी राहण्यात प्रवृत्त करते, आणि यहोवाच्या सेवेसाठी असणाऱ्या आवेशाने पुष्कळांना पायनियरिंग सेवेकडे निरविले आहे.—१ योहान ५:३; प्रकटी. ४:११.
३ यहोवाचे अनेक तरूण सेवक माध्यमिक शाळेतील शिक्षण संपल्यावर पायनियरींग करण्यासंबंधी गंभीर विचार करीत आहेत. हे अगदी उचित आहे. पूर्ण वेळेच्या सेवे व्यतिरिक्त कोणते काम अधिक महत्वाचे असू शकते? (मत्तय ६:३३) देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार झालाच पाहिजे; हे यहोवाचे काम आहे, व एखाद्याने तरूणपणापासूनच त्यात असणे हे केवढ्या सुहक्काचे आहे!—मत्तय २४:१४.
४ पालकांनो, तुमच्या मुलांनी पूर्ण-वेळेची सेवा करावी म्हणून तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता का? पूर्ण अंतःकरणाचा, जीवाचा, मनाचा, व शक्तीचा वापर ह्या योग्य कामात करावा असे तुम्हाला वाटते हे तुमच्या मुलांना स्पष्टपणे समजले आहे का? (मार्क १२:३०) अनेक तरूण प्रचारक त्यांच्या शालेय वर्षामध्ये, प्रत्येक संधीचा फायदा घेऊन सहाय्यक पायनियरींग करून नियमीत पायनियरींगसाठी स्वतःला तयार करतात. खरोखर, यहोवाला केलेली अशी भक्ती त्याच्या हृदयाला खरोखरी आनंदित करते.—नीती. २७:११.
५ अर्थात, सर्वांचीच परिस्थिती त्यांना पायनियरींग करण्याची परवानगी देत नसेल. तथापि, विवाहित किंवा सडे, तरूण वा वयाने वृद्ध असोत, यहोवाची सेवा सुवार्तेचा एक पायनियर सेवक या नात्याने करण्यासाठी तुम्ही गंभीर व प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? (कलस्सै. ३:२३) पुष्कळ विवाहित जोडपी त्यांच्या सेवेत वाढ करण्यासाठी काम करीत आहेत जेणेकडून एक किंवा दोघेही पायनियर बनू शकतात.
६ जर नियमित पायनियरींग करण्याच्या तयारीत तुम्ही सध्या नसाल, तुम्ही सहाय्यक पायनियर म्हणून सेवा करू शकता का? बहुधा, एप्रिल महिन्यात तुमच्या मंडळीतील अनेक प्रचारक ती करण्यासाठी योजना करीत असतील. तुम्ही त्यांच्यासोबत करणार का? यहोवाच्या सर्व निष्ठावंत सेवकांना अनेक आशीर्वाद मिळत असले, तरी जे मेंढरांसमान लोकांना शोधण्यात राज्याच्या सेवेत अधिक वेळ खर्च करण्याच्या स्थितीत आहेत त्यांना यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळतील.—प्रे. कृत्ये. २०:३५.