यहोवाचा सन्मान करण्यासाठी तुम्हाला आणखी काही करता येईल का?
१ आम्ही सर्वांनी विचारात घेण्याजोगा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. येशू ख्रिस्त या आमच्या गुरुचे विश्वासू अनुयायी या अर्थाने आम्ही आज आमच्या देवाच्या नावाचा सन्मान त्याच्या नावाची घोषणा करण्याद्वारे करतो. देवाची मर्जी मिळवावयाची आहे तर ही जबाबदारी आम्ही उचलली पाहिजे. (मार्क १३:१०; लूक ४:१८; प्रे. कृत्ये ४:२०; इब्री १३:१५) हा खराच केवढा अवर्णनीय हक्क, होय सन्मान आहे की, आम्हाला तुरळक जागी पसरलेल्या त्या अवशिष्ट “मेंढरां”कडे सुवार्ता नेण्याची संधी आहे. हेच लोक यहोवाच्या सार्वत्रिक मेंढवाड्याचे सदस्य होण्याच्या रांकेत आहेत.—योहान १०:१६.
२ यहोवाच्या सेवेत आणखी वाढ करण्याद्वारे तुम्हाला व तुमच्या मुलांना त्याचा अधिक सन्मान करता येईल का? जगभरात तुमचे बंधू-भगिनी वाढत्या संख्येने पायनियर कार्यात उतरत आहेत. एप्रिल १९९२ मध्ये भारतात २,१०६ इतका खास, नियमित व साहाय्यक पायनियरांचा उच्चांक होता. हे, त्या महिन्यात जितक्या प्रचारकांनी कार्याचा अहवाल दिला होता त्याच्या जवळजवळ १८ टक्के होते! तुम्ही पायनियरींग करण्याबद्दल व्यक्तीशः गंभीर विचार केला आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना पूर्ण वेळचे सेवकपण घ्यावे म्हणून उत्तेजन देता का?
३ पायनियर सेवेबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या भावनांचे परिक्षण का करून पाहू नये? जेव्हा या विषयाचा उल्लेख होतो तेव्हा लागलेच, तुम्हाला पायनियरींग जमणार नाही, हा निर्वाळा देऊन तुम्ही मोकळे होता का? पायनियरींग सर्वांसाठी शक्य होणार नाही हे खरे आहे. शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या व इतर काही मर्यादांमुळे काहींना पूर्ण वेळेच्या सेवेत उतरणे जमणार नाही. (१ तीम. ५:८) पण तुम्ही याबद्दल अलिकडेच प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? तुम्ही आपल्या कुटुंबात या विषयाबद्दल चर्चा करून तुमच्यापैकी निदान एका सदस्याला तरी नियमित पायनियर होता होईल का हे पाहिले आहे का? नोव्हेंबर १५, १९८२ च्या द वॉचटावरमध्ये पृष्ठ २३ वर विचार करायाला लावणारे हे विधान होतेः “आपल्याला पायनियरींग करता येईल की नाही, याचा प्रत्येक ख्रिस्ती सेवकाने खरे पाहता, प्रार्थनापूर्वक विचार करावयास हवा. दक्षिण आफ्रिकेत पंधरा वर्षे पायनियरींग केलेल्या एका जोडप्याने म्हटलेः ‘आम्ही का पायनियरींग करीत आहोत? आम्ही ती न केल्यास त्याबद्दल यहोवाला योग्य समर्थन देता येईल का?’ जे पायनियर नाहीत अशांनी असाही प्रश्न विचारला पाहिजे की, ‘मी पायनियर नाही याचे मी यहोवासमोर योग्यपणे समर्थन खरेच करू शकतो का?’”
४ या विषयाबद्दल आणखी एका वॉचटावर लेखाने हे सूक्ष्म विचार मांडलेः “आम्ही प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिक असावयास हवे. ‘आत्मा उत्सुक आहे, पण देह अशक्त आहे,’ असे तुम्ही म्हणता का? प्रश्न हा आहे की, आत्मा हा खराच उत्सुक आहे का? यास्तव, आपण शरीराच्या अशक्तपणाला आत्म्याला नाखूष करण्याकडे प्रवृत्त होण्याची सबब होऊ देण्याचे टाळावे.”—वॉ.७८ ८/१५ पृ. २३.
५ मुलांना यशस्वी करण्याची ज्या पालकांची इच्छा आहेः नीतीसूत्रे १५:२० आम्हाला हे खात्रीपूर्वक सांगतेः “शहाणा मुलगा बापाला आनंदवितो.” आपले मुले-मुली यहोवाला समर्पित सेवा सादर करण्यात स्वतःचे जीवन घालवीत आहेत हे पाहून ईश्वरी पालकांना निश्चितपणे आनंद होतो. पण, तुमची मुले स्वतः आपोआप सुज्ञ मार्ग धरू शकणार नाहीत. या जगाची आकर्षणे प्रबळ आहेत. पालकहो, तुमच्या मुलांची मूल्ये ही प्रामुख्यत्वे तुम्हामुळेच घडवली जातात. तुम्ही पूर्ण वेळेच्या सेवेच्या लाभांबद्दल नहेमी सकारात्मक रितीने बोलत राहिला, त्यांना भक्तिमान पायनियर्सचा सहवास संपादण्याचे उत्तेजन दिल्यास, शिवाय पूर्ण वेळेची सेवा तुमच्या मुलांसाठी अत्यंत सन्माननीय असे ध्येय आहे याची तुम्हाला व्यक्तिशः खात्री पटल्यास ही सकारात्मक वृत्ती तुमच्या मुलांवर चांगला प्रभाव पाडील. मनुष्यांपेक्षा यहोवासोबत चांगले नाव मिळवण्याच्या मोलाची रसिकता बाळगण्याची मदत त्यांना द्या.
६ तरुणांनो, तुम्हाला जी निवड करावयाची आहे त्याबद्दल नीतीसूत्रे २२:१ ठळकपणे असे म्हणतेः “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.” तुम्ही स्वतःबद्दल कोणते नाव मिळवणार? ज्यांनी आपल्या समर्पित सेवेद्वारे देवाशी चांगले नाव केले त्या पवित्र शास्त्रातील पुरुष व स्त्रियांबद्दल वाचन करताना त्यांचा विचार करा. यामध्ये प्रिय वैद्य लूक व खऱ्या देवासमागमे चालणारा हनोख हेही आहेत. शमुवेलाला अगदी कोवळ्या वयापासूनच यहोवाच्या मंदिरात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे शक्य ते सर्वात उत्तम शिक्षण मिळाले. या विश्वासू सेवकांनी जी निवड केली त्याबद्दल त्यांना कधी खंत वाटली असे तुम्हांस वाटते का? त्यांना ती का वाटावी? त्यांनी आपले जीवन आंनद, उत्कर्ष व उल्लासात घालवले. शिवाय यांना यहोवासोबत दीर्घकालची मर्जी संपादता आली.—स्तोत्र. ११०:३; १४८:१२, १३; नीती. २०:२९अ; १ तीम. ४:८ब.
७ मुले जीवनात यशस्वी झाल्यावर पालकांना मोठा अभिमान वाटतो. “परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] दिलेले धन [“वारसा,” न्यू.व.]” या आपल्या मुलांच्या बाबतीत पालकांनी तालीम, शिस्त व शिक्षण यासंबंधाने जे सर्व परिश्रम घेतले ते सर्व कारणी लागल्याची कृतकृत्यता त्यांना वाटते. (स्तोत्र. १२७:३) यहोवाचा सन्मान करण्यामध्ये एखाद्या मुलाला वा मुलीला जे काही साध्य करता येते त्यापेक्षा अधिक कशामध्ये पालकांना मोठा अभिमान वाटू शकतो? आज पुष्कळ तरुण लूक, हनोख, व शमुवेल यांचे अनुकरण करीत आहेत हे या विशिष्ठ पत्राद्वारे दिसतेः “मी १६ वर्षांचा आहे. माझा बाप्तिस्मा झाला त्याच्या नऊ महिन्यांनी . . . मी नियमित पायनियरींगला सुरवात केली व तेव्हापासून यहोवाचे आशीर्वाद मला मिळत आहेत. . . . पायनियरींगचा शाळेमध्ये देखील लाभ मिळतो. मी साक्षीदार आहे म्हणून पूर्वी मला शाळेत माझ्या विद्यार्थी मित्रांकडून खूप चिडवणूक होत असे. पण आता मला खूप व्यक्तीगत अभ्यास करावयास मिळत असल्यामुळे मी ‘माझी निंदा करणाऱ्यांना चांगले उत्तर’ देऊ शकतो.”
८ सेवकपणात तयार करण्यासाठी शिक्षणः येथे आपल्याला प्रापंचिक शिक्षणाबद्दलचा प्रश्न विचारात घेणे महत्त्वाचे आहे. हे असे क्षेत्र आहे जेथे, समतोल दृष्टिकोणाची गरज आहे. फेब्रुवारी १, १९९३ च्या टेहळणी बुरुज मासिकातील “उद्देशयुक्त शिक्षण” हा लेख प्रकाशित करण्यात आला. या लेखात “पुरेसे शिक्षण” पोटमथळ्याखाली हे विचार मांडले गेलेः “ख्रिश्चनांनी जरी पूर्ण वेळेची पायनियर सेवा पत्करली असली तरी त्याला स्वतःचा उदरनिर्वाह करता आला पाहिजे. (२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२) . . . या पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा आदर करण्यासाठी आणि आपली ख्रिस्ती कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी एखाद्या तरुण ख्रिश्चनाने केवढे शिक्षण घ्यावे? . . . जे सुवार्तेचे पायनियर सेवक होऊ शकतात अशांच्या बाबतीत ‘चांगला’ [पगार] कोणता अर्थ राखून आहे? अशांनी अर्धवेळ नोकरी करावी, ज्यामुळे त्यांचे भाऊ किंवा कुटुंब यावर ते ‘भार’ होणार नाहीत.—१ थेस्सलनीकाकर २:९.”
९ आपल्या पूर्ण वेळेच्या कार्यात पुढे जाण्यास मदत मिळावी म्हणून कोणा संभाव्य नियमित पायनियरला पुरवणी शिक्षण घेणे आवश्यक आहे असे वाटत असल्यास, फेब्रुवारी १, १९९३ चा टेहळणी बुरुज हे विचार मांडतो की, “ते शक्य आहे तर घरीच राहून घेतल्यास युवक साक्षीदारांना चांगलेच होईल. त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या ख्रिस्ती सवया, सभांची उपस्थिती आणि प्रचार कार्य या नित्याच्या बाबी पूर्ण करता येतील.”
१० आफ्रिकेत एका २२ वर्षे वयाच्या तरुणाला पायनियर कार्य करण्याची खूप इच्छा होती, पण त्याला व्यावसायिक कामाचे शिक्षण देणाऱ्या शाळेत जावे लागले. या शाळेत शिक्षण घेत असतानाच त्याने साहाय्यक पायनियरींग सुरु केली. त्याच्या मित्रांनी तर त्याची थट्टाच उडवली, आणि म्हटले की, तो नक्कीच नापास होणार. तथापि, हा त्यांना हेच उत्तर देत होता की, “प्रथम देवाचे राज्य व त्याची नीतीमत्ता” मिळवा. स्वतःला स्वयंशिस्त लावून तो दररोज सकाळी लवकर उठे आणि दोन तास शाळेतील अभ्यास करी व मग शाळा संपल्यावर दुपारी तो सेवाकार्याला जाई. खास बक्षिस मिळवण्याच्या परिक्षेत पहिल्या तीन क्रमांकात याचा जेव्हा तिसरा क्रमांक लागला, ते पाहून सबंध शाळेला मोठे आश्चर्य वाटले. दुसरा क्रमांक मिळवणारा विद्यार्थी हा आस्थेवाईक व्यक्ती होता आणि आमचा पायनियर बंधू शाळेमध्ये याचा पवित्र शास्त्र अभ्यास घेत होता. पहिला क्रमांक आलेला विद्यार्थी हा त्याच शाळेत शिकणारा आणखी एक उत्साही साक्षीदार युवक होता.
११ वडील आपला कार्यभाग पूर्ण करतातः पायनियर्स जे कार्य करतात त्याचा मंडळीतील वडीलांना मोठा अभिमान वाटतो, त्यामुळे ते त्या आवेशी सेवकांना मोठे उत्तेजन देत असतात. कष्टाळू, फलदायी पायनियर्स हे कोणाही मंडळीला आशीर्वाद असतात याची जाण असल्यामुळेच वडीलांना त्यांची मदत करण्यासाठी संतुष्टता वाटते. साधारणपणे एक किंवा अधिक वर्षे या नियमित पायनियरींगच्या कार्यात घालवल्यावर अशांना पायनियर सेवा शाळेतील अधिक तालीम मिळण्याचा लाभ मिळू शकतो. पायनियरांमधील कुशलता वाढीस लावण्याकरता हा शिक्षणक्रम अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. पायनियर्स ह्या कामात अगदी पुढे असल्यामुळे यांनाही प्रेमळ प्रोत्साहनाची गरज आहे व यामुळेच वडीलांनी ही गरज पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे.—१ पेत्र ५:१-३.
१२ नियमित पायनियरींगच्या कामाला वडील कसे प्रोत्साहन देऊ शकतात? या हक्कासाठी कोण प्रयत्न करीत आहेत ते अधूनमधून पाहणे ही चांगली सुरवात असेल. पायनियरींग कार्याला संमती दर्शविणाऱ्या, नियमित रुपाने साहाय्यक पायनियरींग करणाऱ्या, सेवा निवृत्त लोक, गृहिणी, व विद्यार्थी यांची ते भेट घेऊ शकतात. सहभागी झालेच पाहिजे असे बंधन कोणाला वाटू देऊ नये, तरी ज्यांची इच्छा आहे, पण जे मागेपुढे करीत आहेत अशांना थोडेसे व्यावहारिक उत्तेजन देऊन पायनियरींग त्याच्या कक्षेत आहे याची समज त्यांना देता येईल.
१३ जे अर्ज करू इच्छितात अशांना उत्तेजन देताना वडीलांनी हे लक्षात ठेवावे की, कोणाची नियमित पायनियर या अर्थाने नियुक्ती होण्याआधी त्याने कित्येक महिने साहाय्यक पायनियरींग केलीच पाहिजे हा काही दंडक नाही. (रा.से. १०/८६ पुरवणी परि. २४-२६) तरीपण, अर्जदार अपेक्षिलेले तासांचे ध्येय पूर्ण करू शकेल याबद्दल वडीलांनी व्यावहारिकपणे खात्रीदायक असावे.
१४ अर्जाचे मंडळीच्या सेवा समितीद्वारे परिक्षण झाल्यावर आणि त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत हे सचिवाने काळजीपूर्वक पाहिल्यावर तो लगेच संस्थेला पाठवण्यात यावा.
१५ नियमित पायनियरांना एखादी समस्या अनुभवास येत असल्यास त्याबद्दल सचिवाने वडीलांना कळवीत राहावे. जेथे पुष्कळ पायनियर्स आहेत तेथे हे खासपणे महत्त्वाचे आहे. मंडळीच्या ॲनलिसिस् रिपोर्ट (एस-१०) वर दाखवल्यानुसार प्रत्येक सेवा वर्षाच्या अंताला नियमित पायनियरांची उजळणी करण्यासोबत सचिवांनी सेवा देखरेख्यांबरोबर मार्चच्या आरंभाला कोण तासांचे ध्येय गाठण्यामध्ये मागे आहेत व कोणाकडे व्यक्तिगत लक्ष देण्याची गरज आहे याची उजळणी व्हावी. (फेब्रुवारी १९९३ ची आमची राज्य सेवा यातील घोषणा सदर पाहा.) विलंब न लावता मदत दिली गेल्यास त्या पायनियरला ते सेवा वर्ष यशस्वीरित्या पार करता येईल.
१६ नव्या नियमित पायनियरांच्या मालिकेतील बहुतेक जण तरूण तसेच सत्यामध्येही तसे पाहता नवेच आहेत. त्यांनी दाखवलेला स्वेच्छेचा आत्मा आम्हाला खरोखरी आनंदीत करतो! तरीही या नव्या जणांना घरोघरच्या कार्यातील कौशल्य वाढवण्यासाठी, प्रभावी पुनर्भेटी करण्यासाठी, आणि पवित्र शास्त्राभ्यासात शिकवण्यासाठी तालीम देण्याची गरज आहे. ही तालीम न दिली गेल्यास, साधारणपणे एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीतच त्यांना निराश झाल्यासारखे वाटायला लागेल, आणि सेवा कार्यात चांगले परिणाम न मिळाल्यामुळे पायनियर कार्य सोडून द्यावेसे वाटेल. दक्ष वडील अशी ही क्षुल्लक कारणे व कार्यातील मंदपणा चटकन् ओळखतील. तातडीने लक्ष दिल्यास आणि त्या पायनियरला त्याच्या समस्येमध्ये मदत केल्यास त्याला पुष्कळ वर्षांच्या फलदायी सेवेचा परिणाम अनुभवण्यास मिळू शकेल.
१७ दूरच्या जलात तुम्ही मासेमारी करणार का? येशूच्या शिष्यांपैकी काही कोळी होते. काही वेळेला त्यांनी रात्रभर मासेमारी करून देखील त्यांची जाळी रिकामीच राहिली. (योहान २१:३) या देशातील काही शहरात जेथे ‘मनुष्याची मासेमारी’ कित्येक वर्षे होत राहिली तेथे आता मोठमोठ्या मंडळ्या असून त्यामध्ये पुष्कळ आवेशी साक्षीदार आहेत व ते ‘मासेमारी’च्या कामाचे निरिक्षण करीत आहेत. काहींना असे वाटत असेल की, आता त्यांच्या मंडळ्यांतील “पाण्या”त खूपच कमी “मासे” राहिले असतील. (मत्तय ४:१९) याऊलट, इतर शहरांमधून प्रचारक व पायनियर्स खूप पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत असल्याचे वृत्त ऐकून आम्हाला आनंद होत नाही का? अशा शहरात पायनियर्सना आनंद मिळत आहे हे अगदीच स्पष्ट आहे. (टे. बु. ९२ १२/१ पृ. १३ परि १५.) या कारणास्तव, जे कष्टाळू पायनियर्स शहरातील ज्या भागात अधिक गरज आहे तेथे स्थलांतरित होऊ शकतात, व जे असे करण्याच्या विचारात आहेत अशांनी ते करण्याआधी शाखा दप्तराला चौकशी करून पहावी.
१८ पायनियरींग करणे योग्य आहे असे समजून काहींनी त्याची सुरवात केली असेल, पण नंतर आपल्याला यात यशस्वी होता येईल का अशी त्यांना शंका वाटू लागली असेल. अशांनी काही संशय व अपेक्षा मनात बाळगून अर्ज भरला असेल. आरंभाला त्यांचे क्षेत्रातील परिणाम देखील कमीत कमी दिसले असतील. पण काही काळातच, त्यांची कुशलता सुधारली गेली व त्यांच्या कार्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे प्रत्ययास आले. यामुळे त्यांचा आनंद व विश्वास वाढत गेला. काहींच्या बाबतीत पायनियरींग बेथेल सेवा किंवा फिरत्या कामासाठी एक टप्पा ठरला.
१९ कदाचित तुम्हाला नियमित पायनियर या नात्याने दूरच्या शहरात जाण्याचे शक्य नसेल, तरीपण, तुम्हाला जर तुमचे सध्याचे क्षेत्र इतके फलदायी नाही असे वाटत असल्यास तुमच्याच प्रांतात इतरत्र पाण्यात मासेमारी करण्याच्या संधी उपलब्ध असतील. यासाठी करावे लागणारे स्थलांतर तुमच्या जीवनशैलीत थोडेफार बदल सुचवील, पण त्यामुळे मिळणारे आध्यात्मिक प्रतिफळ खूपच मोठे असणार.—मत्तय ६:१९-२१.
२० शिवाय, तुमची शक्यता असल्यास तुमच्या स्वतःच्या विभागातच जवळच्या मंडळ्यात मदत करण्याचे तुम्हाला जमू शकेल. तुम्ही यासाठी पात्र असल्यास तुमचे विभागीय पर्यवेक्षक, विभागात पायनियरांच्या सेवेकडून कोणाला लाभ मिळू शकेल अशा क्षेत्राबद्दल तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतील.
२१ काही पायनियर्स व प्रचारकांना आपल्याच घरी राहून आपल्या स्वतःच्या क्षेत्रातील विशिष्ट गरजांची काळजी घेता आली. अशा क्षेत्रात दुसरी भाषा बोलली जात असेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात एखाद्या विशिष्ट स्थळी लोकांचा मोठा समुदाय वेगळी भाषा बोलतो असे दिसून आले आहे का? या भाषेच्या वापराद्वारे राज्य संदेश प्राप्त करण्याची काही लोकांची तयारी आहे का? ज्यांना दुसरी भाषा ठाऊक आहे अशांना राज्य संदेशामार्फत सर्व प्रकारच्या लोकांकडे जाण्याची ही चांगली मदत आहे. हे आव्हानात्मक असले तरी खूप प्रतिफळदायक ठरू शकते.—१ तीम. २:४; तीत. २:११.
२२ यहोवाचा सन्मान करण्यामध्ये तुम्हाला जे काही करता येणे शक्य आहे ते करीत आहात तर तुमच्या सध्याच्या कार्याच्या हक्कात आनंद माना. तुम्हाला अधिक करण्याची शक्यता दिसते तर ही गोष्ट प्रार्थनेद्वारे यहोवाला कळवा. तुमची परिस्थिती तुम्हाला कोणते बदल करण्यास मुभा देऊ शकेल त्याचे व्यवहार्य रितीने परिक्षण करा. पायनियर आत्मा असलेल्या वडीलांसोबत किंवा विभागीय पर्यवेक्षकासोबत याबद्दल बोलणी करा. तुम्ही प्रार्थनाशील व व्यवहारी निर्णय घेतल्यावर, त्यानुरुप त्वरेने हालचाल करा व हे करताना, यहोवाचा सन्मान करणाऱ्यांचा तो सन्मान करतो या अभिवचनाची खात्री असू द्या.—इब्री. १३:५, ६; १ शमु. २:३०.