बायबलचा संदेश या माहितीपत्रकाचा उपयोग करण्याचा एक मार्ग
आपण प्रचार करत असलेल्या क्षेत्रातील बहुतेक लोकांना, विशेषकरून गैर-ख्रिस्ती लोकांना बायबलबद्दलची इतकी माहिती नाही. अशा लोकांबरोबर बायबल काय शिकवते पुस्तकाचा अभ्यास करताना काही प्रचारकांनी, त्यांच्या विद्यार्थ्याला बायबलची माहिती मिळावी म्हणून बायबलचा संदेश या माहितीपत्रकाचादेखील उपयोग करण्याचे ठरवले आहे. उदाहरणार्थ, एक बांधव बायबल काय शिकवते पुस्तकातल्या तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करताना या माहितीपत्रकाचा भाग १ दाखवतो. यानंतर, प्रत्येक अभ्यासाच्या शेवटी तो नंतरचा एक-एक भाग दाखवतो. तुम्ही अशा कोणाबरोबर अभ्यास करत आहात का ज्याला बायबलची फार कमी किंवा काहीच माहिती नाही? तुमच्या बायबल विद्यार्थ्याला, ‘तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ असलेल्या पवित्र शास्त्राची माहिती’ शिकता यावी म्हणून तुम्हीसुद्धा बायबल काय शिकवते पुस्तकासोबत बायबलचा संदेश या माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता.—२ तीम. ३:१५.