वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ राजे १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ राजे रूपरेषा

      • बेथेलमधल्या वेदीविरुद्ध भविष्यवाणी (१-१०)

        • वेदी दुभंगली जाते (५)

      • देवाचा माणूस आज्ञा मोडतो (११-३४)

१ राजे १३:१

तळटीपा

  • *

    किंवा “धूर वर जाण्यासाठी बलिदानं जाळायला.”

समासातील संदर्भ

  • +१रा १२:३२; आम ३:१४
  • +२रा २३:१६, १७

१ राजे १३:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा २१:२४; २२:१
  • +२रा २३:१५, १६; २इत ३४:३३

१ राजे १३:३

तळटीपा

  • *

    किंवा “चरबीयुक्‍त राख,” म्हणजे बलिदानांच्या चरबीत भिजलेली राख.

१ राजे १३:४

तळटीपा

  • *

    किंवा “त्याच्या हाताला लकवा मारला.”

समासातील संदर्भ

  • +२इत १६:१०; यिर्म २०:२
  • +२रा ६:१८

१ राजे १३:६

समासातील संदर्भ

  • +निर्ग १०:१६, १७; गण २१:७; यिर्म ३७:३; प्रेका ८:२४

१ राजे १३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. ८-९

१ राजे १३:१४

समासातील संदर्भ

  • +१रा १३:१

१ राजे १३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. ९-१०

१ राजे १३:२२

समासातील संदर्भ

  • +१रा १३:३०; २रा २३:१७, १८

१ राजे १३:२४

समासातील संदर्भ

  • +२शमु ६:७; १रा २०:३५, ३६; २रा १७:२५

१ राजे १३:२६

समासातील संदर्भ

  • +१रा १३:९
  • +१रा १३:२१, २२

१ राजे १३:३१

समासातील संदर्भ

  • +२रा २३:१७, १८

१ राजे १३:३२

समासातील संदर्भ

  • +लेवी २६:३०; १रा १२:२९, ३१
  • +२रा २३:१५, १९

१ राजे १३:३३

समासातील संदर्भ

  • +१रा १२:२५, ३१
  • +२इत ११:१४, १५

१ राजे १३:३४

समासातील संदर्भ

  • +१रा १६:३०, ३१; २रा ३:१, ३; १०:३१; १३:१, २
  • +१रा १४:१०; १५:२५-२९; २रा १७:२२, २३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ राजे १३:११रा १२:३२; आम ३:१४
१ राजे १३:१२रा २३:१६, १७
१ राजे १३:२२रा २१:२४; २२:१
१ राजे १३:२२रा २३:१५, १६; २इत ३४:३३
१ राजे १३:४२इत १६:१०; यिर्म २०:२
१ राजे १३:४२रा ६:१८
१ राजे १३:६निर्ग १०:१६, १७; गण २१:७; यिर्म ३७:३; प्रेका ८:२४
१ राजे १३:१४१रा १३:१
१ राजे १३:२२१रा १३:३०; २रा २३:१७, १८
१ राजे १३:२४२शमु ६:७; १रा २०:३५, ३६; २रा १७:२५
१ राजे १३:२६१रा १३:९
१ राजे १३:२६१रा १३:२१, २२
१ राजे १३:३१२रा २३:१७, १८
१ राजे १३:३२लेवी २६:३०; १रा १२:२९, ३१
१ राजे १३:३२२रा २३:१५, १९
१ राजे १३:३३१रा १२:२५, ३१
१ राजे १३:३३२इत ११:१४, १५
१ राजे १३:३४१रा १६:३०, ३१; २रा ३:१, ३; १०:३१; १३:१, २
१ राजे १३:३४१रा १४:१०; १५:२५-२९; २रा १७:२२, २३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ राजे १३:१-३४

१ राजे

१३ यराबाम बलिदानांचं हवन करायला* वेदीजवळ उभा होता,+ तेव्हा यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा एक माणूस+ यहूदाहून बेथेलला आला. २ मग यहोवाच्या सांगण्यावरून देवाचा माणूस त्या वेदीविरुद्ध मोठ्याने असं म्हणाला: “हे वेदी! हे वेदी! यहोवा असं म्हणतो: ‘पाहा! दावीदच्या घराण्यात योशीया+ नावाचा एक मुलगा जन्माला येईल. तुझ्यावर बलिदानांचं हवन करणाऱ्‍या उच्च स्थानांच्या* याजकांना तो तुझ्यावर अर्पण करेल आणि माणसांची हाडं तुझ्यावर जाळेल.’”+ ३ त्या दिवशी त्याने एक चिन्ह दिलं. तो म्हणाला: “यहोवाने सांगितलेलं चिन्ह हे: पाहा! वेदी दुभंगली जाईल आणि तिच्यावरची राख* इथे-तिथे फेकली जाईल.”

४ खऱ्‍या देवाच्या माणसाने बेथेलमधल्या वेदीविरुद्ध मोठ्याने बोललेले हे शब्द ऐकताच, यराबाम राजाने वेदीवरून आपला हात काढला आणि त्याच्याकडे हात रोखून तो म्हणाला: “धरा त्याला!”+ पण त्याच क्षणी, देवाच्या माणसाकडे रोखून धरलेला त्याचा हात वाळून गेला,* आणि त्याला तो मागे घेता येईना.+ ५ मग यहोवाच्या सांगण्यावरून खऱ्‍या देवाच्या माणसाने जे चिन्ह दिलं होतं, त्याप्रमाणे वेदी दुभंगली आणि तिच्यावरची राख इथे-तिथे फेकली गेली.

६ मग राजा खऱ्‍या देवाच्या माणसाला म्हणाला: “कृपा करून तुझा देव यहोवा याच्याकडे कृपेची भीक माग. माझा हात बरा व्हावा म्हणून माझ्यासाठी प्रार्थना कर.”+ तेव्हा त्याने यहोवाकडे कृपेची भीक मागितली आणि राजाचा हात बरा होऊन पहिल्यासारखा झाला. ७ मग राजा त्याला म्हणाला: “माझ्यासोबत घरी चल आणि काहीतरी खा. मला तुला भेटवस्तूही द्यायची आहे.” ८ पण खऱ्‍या देवाचा तो माणूस त्याला म्हणाला: “तू मला अर्धा राजमहाल जरी दिलास, तरी मी तुझ्यासोबत येणार नाही. मी इथे अन्‍नाचा एक कणही खाणार नाही किंवा पाणीही पिणार नाही. ९ कारण यहोवाने मला अशी आज्ञा दिली आहे: ‘इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस. आणि ज्या रस्त्याने तू आला आहेस त्या रस्त्याने परत जाऊ नकोस.’” १० म्हणून मग तो ज्या रस्त्याने बेथेलला आला होता, त्या रस्त्याने न जाता दुसऱ्‍या रस्त्याने निघून गेला.

११ बेथेलमध्ये एक वृद्ध संदेष्टा राहत होता. त्या दिवशी बेथेलमध्ये खऱ्‍या देवाच्या माणसाने जे काही केलं होतं आणि तो राजाला जे काही बोलला होता, ते सगळं त्या वृद्ध संदेष्ट्याच्या मुलांनी घरी येऊन आपल्या वडिलांना सांगितलं. त्यांनी या गोष्टी आपल्या वडिलांना सांगितल्यावर, १२ त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं: “तो कोणत्या रस्त्याने गेला?” तेव्हा, यहूदाहून आलेला खऱ्‍या देवाचा माणूस कोणत्या रस्त्याने गेला हे त्याच्या मुलांनी त्याला दाखवलं. १३ मग तो आपल्या मुलांना म्हणाला: “माझ्यासाठी गाढव तयार करा, म्हणजे मी त्यावर बसून जाईन.” म्हणून त्यांनी त्याच्यासाठी गाढव तयार केलं आणि तो त्यावर बसून निघाला.

१४ तो त्या खऱ्‍या देवाच्या माणसामागे गेला, तेव्हा त्याला तो एका मोठ्या झाडाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारलं: “यहूदाहून आलेला खऱ्‍या देवाचा माणूस तूच का?”+ त्यावर तो म्हणाला: “हो, मीच आहे तो.” १५ मग तो वृद्ध संदेष्टा त्याला म्हणाला: “माझ्यासोबत घरी चल आणि काहीतरी खा.” १६ पण तो त्याला म्हणाला: “मी तुमच्यासोबत मागे जाऊ शकत नाही किंवा तुमच्या घरीही येऊ शकत नाही. आणि मी इथे काही खाऊ शकत नाही किंवा पाणीही पिऊ शकत नाही. १७ कारण यहोवाने मला असं सांगितलंय, की ‘इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस. आणि ज्या रस्त्याने तू आलास त्या रस्त्याने परत जाऊ नकोस.’” १८ तेव्हा वृद्ध संदेष्टा त्याला म्हणाला: “मीसुद्धा तुझ्यासारखाच एक संदेष्टा आहे. आणि यहोवाने एका स्वर्गदूताद्वारे मला असं सांगितलंय, की ‘त्याला आपल्या घरी घेऊन ये आणि काही खाऊ-पिऊ घाल.’” (खरंतर, त्याने त्याला फसवलं.) १९ म्हणून मग तो जेवण-खावण करायला त्या वृद्ध संदेष्ट्यासोबत त्याच्या घरी गेला.

२० ते जेवायला बसलेले असताना, जो वृद्ध संदेष्टा त्याला परत घेऊन आला होता त्याला यहोवाचा संदेश मिळाला. २१ आणि यहूदाहून आलेल्या खऱ्‍या देवाच्या माणसाला उद्देशून तो मोठ्याने म्हणाला: “यहोवा असं म्हणतो: ‘तू यहोवाविरुद्ध बंड केलंस. तुझा देव यहोवा याने दिलेली आज्ञा तू पाळली नाहीस. २२ “इथे काही खाऊ नकोस किंवा पाणीही पिऊ नकोस,” असं सांगितलेलं असतानाही तू खाणंपिणं करायला परत मागे गेलास. म्हणून आता तुझा मृतदेह तुझ्या वाडवडिलांच्या कबरेत पुरला जाणार नाही.’”+

२३ मग खऱ्‍या देवाच्या माणसाचं खाणंपिणं झाल्यावर, वृद्ध संदेष्ट्याने आपल्या घरी आणलेल्या या संदेष्ट्याला पाठवून देण्यासाठी गाढव तयार केलं. २४ आणि तो आपल्या रस्त्याने जायला निघाला. पण रस्त्याने जात असताना एक सिंह समोर आला आणि सिंहाने त्याला मारून टाकलं.+ त्याचा मृतदेह रस्त्यावरच पडला होता आणि जवळच गाढव उभं होतं. तसंच सिंहसुद्धा तिथेच उभा होता. २५ तिथून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍या माणसांनी जेव्हा रस्त्यावर पडलेला तो मृतदेह आणि त्याच्याजवळ उभा असलेला सिंह पाहिला, तेव्हा त्यांनी वृद्ध संदेष्टा राहत असलेल्या शहरात जाऊन लोकांना ही बातमी सांगितली.

२६ ज्या वृद्ध संदेष्ट्याने त्याला रस्त्यातून परत आणलं होतं त्याने ही बातमी ऐकली, तेव्हा तो लगेच म्हणाला: “हा तोच खऱ्‍या देवाचा माणूस आहे ज्याने यहोवाच्या आज्ञेविरुद्ध काम केलंय.+ आणि म्हणूनच, यहोवाने त्याला सिंहाच्या तावडीत दिलं आणि सिंहाने त्याला फाडून मारून टाकलं. यहोवाने त्याला सांगितलं होतं तसंच घडलं.”+ २७ मग तो आपल्या मुलांना म्हणाला: “माझ्यासाठी गाढव तयार करा.” म्हणून त्यांनी त्याच्यासाठी गाढव तयार केलं. २८ तो रस्त्याने जाऊ लागला, तेव्हा रस्त्यात पडलेला मृतदेह आणि जवळच गाढव व सिंह उभे असलेले त्याला दिसले. पण सिंहाने मृतदेह खाल्ला नव्हता किंवा गाढवावरही हल्ला केला नव्हता. २९ मग त्या संदेष्ट्याने खऱ्‍या देवाच्या माणसाचा मृतदेह उचलून गाढवावर ठेवला. त्याच्यासाठी शोक करायला आणि त्याला दफन करायला तो त्याचा मृतदेह आपल्या शहरात घेऊन आला. ३० त्याने तो मृतदेह, स्वतःसाठी बनवलेल्या कबरेत ठेवला. मग, “फार वाईट झालं माझ्या भावा!” असं म्हणून ते त्याच्यासाठी शोक करत राहिले. ३१ त्याला दफन केल्यावर तो वृद्ध संदेष्टा आपल्या मुलांना म्हणाला: “या खऱ्‍या देवाच्या माणसाला जिथे दफन करण्यात आलंय, तिथेच मलाही माझ्या मृत्यूनंतर दफन करा. आणि माझ्या अस्थी त्याच्या अस्थींजवळच ठेवा.+ ३२ त्या माणसाने यहोवाच्या सांगण्यावरून बेथेलमधल्या वेदीविरुद्ध आणि शोमरोनातल्या शहरांत उच्च स्थानांवर+ असलेल्या सर्व मंदिरांविरुद्ध जे काही म्हटलं होतं ते सगळं नक्कीच पूर्ण होईल.”+

३३ इतकं सगळं होऊनसुद्धा यराबामने आपला वाईट मार्ग सोडला नाही. उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी तो सामान्य लोकांमधून याजकांची नेमणूक करत राहिला.+ ज्या कोणाला इच्छा असेल त्याला तो याजकपदावर नेमायचा. तो म्हणायचा: “उच्च स्थानांवर सेवा करण्यासाठी यालासुद्धा याजक होऊ द्या.”+ ३४ यराबामच्या घराण्यातल्या लोकांनी केलेल्या या पापामुळे+ त्यांचा नाश झाला; पृथ्वीवर त्यांचं नामोनिशाण राहिलं नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा