ईश्वरशासित वृत्त
अंगोला: उत्तम वाढीचा अहवाल दिला जात आहे. जुलै मध्ये १८,९११ प्रचारकांचा नवा उच्चांक होता व ६,०७५ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले गेले.
ऑस्ट्रेलिया: ऑगस्ट मध्ये ५७,२७२ प्रचारकांचे नवे शिखर गाठले, मागील उच्चांकापेक्षा १,५४१ अधिक प्रचारकात वाढ करून त्यांनी सेवा वर्षाची समाप्ती केली. ३१,७१२ पवित्र शास्त्र अभ्यासाचा सर्व वेळेच्या उच्चांकाचा अहवाल दिला.
सायप्रस: सेवा वर्षात १,४३३ जनांनी अहवाल देऊन ऑगस्ट मध्ये प्रचारकांचे आठवे शिखर गाठले. गत वर्षाच्या सरासरी पेक्षा ही ९ टक्क्यांची वाढ होती.
डॉमिनिकन रिपब्लिक: ऑगस्ट मध्ये १५,४१८ प्रचारकांनी अहवाल देऊन, मागील सेवा वर्षापेक्षा २० टक्क्यांची वाढ गाठली. २० टक्क्यापेक्षा अधिक प्रचारक पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत.
घाना: गत वर्षाच्या सरासरीपेक्षा १८ टक्क्यांनी वाढ ऑगस्ट मध्ये दिसून आली, ज्यात ३७,६७६ प्रचारकांनी क्षेत्र सेवेचा अहवाल दिला.
म्यानमार: जुलै मध्ये १,९५८ प्रचारकांचे नवे शिखर गाठले.
प्युट रिको: ऑगस्ट मध्ये २५,३१५ प्रचारकांनी नव्या उच्चांकाचा अहवाल दिला.