सुवार्ता सादरता
पवित्र शास्त्र अभ्यासाद्वारे
१ भारतात गेल्या कार्यवर्षभरात दर महिन्याला ६,२०० पेक्षा अधिक पवित्र शास्त्राभ्यास सरासरी चालविले गेले. या देशाच्या ८,७८४ प्रचारकांपैकी अर्ध्यांनी या आनंदी कार्यात सहभाग घेतला असावा. याचाच अर्थ असा आहे की, अर्ध्यांनी सहभाग घेतला आहे तर मग बाकीच्या अर्ध्यांनी तो सहभाग घेतला नाही हे उघड आहे. तेव्हा, कोणाला तरी सत्य शिकविण्यामुळे जे खास समाधान लाभत असते त्यामध्ये आम्हापैकी अधिक जणांना कसा लाभ घेता येईल?
२ आमची देव व शेजाऱ्यांवर प्रीती असल्यामुळे आम्ही इतरांसोबत सत्याची भागी करण्याची इच्छा धरतो. पण आम्हाला आपल्या उपाध्यपणात यहोवाकडून मदतीची गरज आहे. (१ करिंथ. ३:६, ७) यासाठीच, यहोवाकडे प्रार्थना करुन एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यासाठी त्याने मदत पुरवावी अशी त्याला विनंति करू नये का? (१ योहान ५:१४, १५) या प्रार्थनेनंतर आम्ही तिजनुसार कामाला लागले पाहिजे आणि आमची परिस्थिती वाव देते तितक्या अधिकपणे आम्ही क्षेत्र कार्यात सहभाग घेतला पाहिजे व जेव्हा जेव्हा संधि सामोरी येते तेव्हा पवित्र शास्त्राभ्यासाची योजना सादर केली पाहिजे.
पुष्कळ सुसंध्या
३ गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या क्षेत्रावरील लोकांना हजारो पुस्तके, पुस्तिका आणि माहितीपत्रके वितरीत केली आहेत. यहोवाचे साक्षीदार नाहीत अशा हजारो लोकांच्या घरी आपल्याला लिव्ह फॉरएव्हर, ट्रु पीस व सत्य ही प्रकाशने आढळतील. याकरवी नवीन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याच्या केवढ्या सुसंध्या आपल्याला उपलब्ध आहेत ते समजू शकेल.
४ कोणी घरमालक आम्हाला सांगतो की, त्याला आपले काम माहीत आहे किंवा तुमची प्रकाशने आम्हापाशी आहेत असे तो म्हणेल तेव्हा ते ऐकून आम्हाला केवढा आनंद झाला हे आम्ही त्यांना सांगितले पाहिजे. (पहा रिझनिंग, पृष्ठ २०.) त्याच्यापाशी एखादे प्रकाशन आहे तर आम्ही त्यांना ते आणण्याचे सुचवू व मग बसून त्याच्यासाठी व त्याच्या कुटुंबासाठी त्या प्रकाशनात कोणते मनोरंजक विषय त्यात आहेत हे त्यांना दाखवू. त्यांनी सरळ रुपाचा प्रतिसाद दर्शविला तर मग आम्हाला पवित्र शास्त्र अभ्यासाची योजना तेथे प्रस्तुत करता येईल.
५ वर नमूद असणाऱ्या गोष्टीशिवाय आणखी एक प्रस्ताव असा की, आपणच पुढे होऊन घरमालकाला विचारावे की, त्यांच्यापाशी आमची प्रकाशने आहेत का. ज्या क्षेत्रात आम्ही बरीच प्रकाशने वितरीत केली आहेत तेथे हे खासपणे प्रभावी ठरु शकते. मित्रत्वाचे प्रास्ताविक अभिवादन केल्यावर आम्ही म्हणू शकतो की, आम्ही लोकांना वारंवार भेटी देत असतो त्यामुळे त्यांच्यापाशी आमची काही प्रकाशने असतात. तेव्हा लोकांना छापील माहितीकडून लाभ मिळत आहे हे पाहाणे आमचे उद्दिष्ट आहे. यावेळी आम्ही त्यांना, त्यांच्याकडे आमची प्रकाशने आहेत का हे विचारु शकतो. आहे तर ती त्यांना आणण्यास विनंति करुन आम्ही त्याचा कसा अभ्यास करतो हे दाखवावे. एक छोटे प्रात्यक्षिक दाखविण्याचा परिणाम पवित्र शास्त्र अभ्यासात होऊ शकतो. त्यांच्यापाशी प्रकाशन नसल्यास आपण सध्या सादर करीत असणारे प्रकाशन त्यांना द्यावे किंवा थेट विचारावे की, त्यांच्या कुटुंबाला मोफत असा पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याचे आवडेल का?
चाणाक्षपणा वापरा
६ लोक कामात असतात त्यामुळे आम्ही चाणाक्ष राहिले पाहिजे आणि घरमालकाने आपल्याला आत घेतल्यावर त्यांचा अधिक वेळ घेता कामा नये. सुरवातीला काही अभ्यासांची वेळ केवळ १५ मिनिटांकरता ठेवता येईल. घरमालकाला हे दिसले की, त्याचा अधिक वेळ घेतला जात नाही तर तो आम्हाकडून नियमित भेट घडण्याची इच्छा दर्शवू शकेल. एकदा अभ्यास प्रस्थापित झाला व घरमालकाची आस्था वाढू लागली म्हणजे अभ्यासाचा कालावधी वाढवता येईल. हे खरे की, काही घरमालकांची सुरवातीपासूनच अधिक काळाचा अभ्यास स्विकारण्याची तयारी असेल.
७ आमच्या क्षेत्रात मेंढरासमान असे पुष्कळ लोक आहेत. त्यांच्यापाशी आमची प्रकाशने आहेत व अशांना आमच्या मदतीची गरज आहे. आज जगात ज्या घृणित गोष्टी घडत असल्याच्या दिसताहेत त्यामुळे पुष्कळजण शोक व विलाप निश्चये करीत आहेत. (यहे. ९:४) मानवजातीवरील अनर्थ दूर करणाऱ्या देवाच्या राज्याविषयीच्या प्रकाशनांचे वाटप करणे हेच केवळ आमचे काम नसून प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांकडे पवित्र शास्त्र अभ्यासाच्या माध्यमाने सत्य न्यावे हाही आमचा एक विशेष हक्क आहे.—मत्तय २८:१९, २०.