सुवार्ता सादरता—विवेक दृष्टीसह
१ प्रेषित पौलाने वेगवेगळ्या विश्वासाच्या व पार्श्वभूमीच्या लोकांना सुवार्ता सादर करतेवेळी, विवेकदृष्टी उपयोगात आणण्यावर जोर दिलेला आहे. आमच्या काळातील काही लोक धार्मिक असल्याचा दावा करतात तर असेही काही आहेत ज्यांना आध्यात्मिकतेत रस वाटत नाही व आध्यात्मिक मूल्ये कःपदार्थ वाटतात. सुवार्तेचे प्रचारक यानाते आम्ही राज्य संदेशास “सर्वांसाठी” विवेकदृष्टी राखून अपील करणारी बनविली पाहिजे.—१ करिंथ. ९:१९-२३.
घरमालकास समजावून घेणे
२ क्षेत्रसेवेत विवेकीय दृष्टीकोणास व्यावहारिकरित्या उपयोगात आणण्यात आमच्या सादरतेस घरमालकाच्या आस्थेनुसार सादर करणे हेही समाविष्ठ आहे. याकरिता पूर्वतयारी चांगली केलेली असावी. उपलब्ध पुस्तकातून तसेच मासिकातून हाताळलेल्या विविध विषयांशी चांगले परिचित राहून प्रचारक अनेक मुद्यांसह सुवार्ता प्रचार करण्यास तयार असेल. कार्य करीत असता वृद्ध, तरुण, कुटुंब प्रमुख आणि इतरांशी बोलताना आम्ही त्यांच्या वैयक्तीक परिस्थितीस लक्षात घेऊन व विवेकदृष्टीने कोणता समयसूचक विषय मांडावा हे ठरविले पाहिजे.
३ घरमालकाजवळ जात असता, सभोवतालच्या गोष्टी लक्षात घ्या. कदाचित तो घरमालक पालक असल्याचे, व घरची काळजी बाळगणारा वगैरे आहे, हे ओळखाल. मग, या माहितीस अनुसरुन तुम्ही तुमची प्रस्तावना अशी जुळवाल की, जीत घरमालकाची परिस्थिती व आस्था ही जुळलेली असेल. मग, व्यवहार चातुर्याने बोलून व धोरणी प्रश्न विचारुन व प्रत्युत्तरात ती व्यक्ती काय बोलते हे लक्षपूर्वक ऐकून त्याचे विश्वास व भावना काय असाव्यात याचा तुम्ही अनुमान करू शकाल आणि मग त्याच अनुरोधात तुमची सादरता पेश करण्याचा उत्तम मार्ग ठरवू शकाल.
तुमच्या सादरतेस अधिक प्रासंगिक बनविणे
४ कोणा घराजवळ पोहंचता, तुम्ही पाहता घरात खेळणी किंवा लेकरे आहेत, तर तुम्ही तुमच्या बोलण्याची सुरवात अशा शब्दांनी कराल की, “या भागातील पालकासोबत, ते आपल्या लेकरांना कोणते मार्गदर्शन पुरवीत आहेत, याची बोलणी करीत आहोत. अनेक पालकांना, त्यांच्या लेकरांच्या शिक्षण संस्थातून नैतिक मार्गदर्शनास का काट आहे याची काळजी वाटते. याप्रकारच्या समस्या तुमच्याही समोर आल्या का?” घरमालकाचे उत्तर ऐका, जर त्या उत्तरात दिसून आले की, घरमालकाचा धार्मिकतेकडे कल आहे हे सूचित होते तर तुम्ही पुढे म्हणू शकालः “हे चित्तवेधक आहे की आम्हाकरता आणि आमच्या मुलांकरिता सूज्ञ मार्गदर्शनाकडे वळण्याचा सल्ला पवित्र शास्त्र देते. पाहा, येथे नीतीसूत्रे १४:१२ मध्ये म्हटले आहे.” मग वचन वाचल्यावर तुम्ही म्हणू शकालः “अलिकडेच मी एक प्रकाशन वाचीत होतो त्यात, पवित्र शास्त्र सल्ल्याकडे वळणे केवढे आम्हाकरिता सूज्ञतेचे ठरेल. मग सर्व्हायवल पुस्तकाकडे वळून पान ३० व परिच्छेद १ वाचा. मग पान ३३ कडे जा व त्यावरील चित्र दाखवा. नंतर पान ३७ वरील शेवटली दोन वाक्ये वाचून शेवट करा. ते प्रकाशन १० रुपयांना देण्यास पुढे करा.
५ जर घरमालकाची उत्तरे, तो इतर पवित्र पुस्तकाचे पठण व अनुकरण करीत आहे असे सूचित करतात तर आपल्या विचार मांडणीत बदल करून असे म्हणू शकालः “एखाद्याच्या कोणत्याही धर्मभावना असोत, तरी सर्व विचारवंतास हवे आहे की, या सद्य असमाधानी जगाचे जागी काहीतरी अधिक चांगले पुरवील अशा जगाची स्थापना व्हावी. अशा आशेबद्दल पाहा हे प्रकाशन काय म्हणते.” अध्याय ७ वा परिच्छेद १-३ मधील काही मुद्दे उपयोगात आणा. तसेच अध्याय २४ परिच्छेद ५ किंवा १४ उपयोगात आणा. पुस्तक १० रुपयांना द्या.
६ यहोवाच्या सेवेत आम्ही जेवढी तयारी करतो व विवेकदृष्टी प्रदर्शित करतो, तेवढेच आम्हास प्रेषित पौलाप्रमाणे म्हणता येईलः “मी सर्वांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी मी कसे तरी कित्यकांचे तारण साधावे.”—१ करिंथ. ९:२२; नीती. १९:८.