तुम्ही परत भेट घ्याल तेव्हा काय बोलणार?
१ आमच्या सेवकपणात प्रभावी ठरण्यासाठी तयारीची गरज आहे की, ज्यामुळे आपण आधी आस्था दाखविलेल्या लोकांची परत भेट घेऊ तेव्हा त्यांची आस्था परत जागृत करण्यामध्ये व आपले संभाषण जारी ठेवण्यात आम्हाला यश मिळू शकेल. हे कसे साध्य करता येईल?
२ खरे ख्रिस्ती हे वास्तविकपणे इतरांचे कल्याण करण्याची आस्था राखून असल्यामुळे तुम्हाला प्रथम, आधीच्या भेटीत घरमालकाबद्दल जे शिकायला मिळाले त्याचा संदर्भ देऊ शकता.
ज्या माणसाने गुन्ह्याबद्दलची आपली काळजी दाखवली होती अशांना तुम्ही हे म्हणू शकता:
▪ “आपण मागे जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही अधर्माच्या लक्षणीय वाढीसंबंधाने चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला वाटतं का की, अधिक पोलिसबळ वाढवलं म्हणजे ही समस्या सुटू शकेल?”
ज्या माणसाने जागतिक परिस्थितीमधील सध्याच्या घडामोडीविषयी काळजी दाखवली होती त्याला तुम्ही हे म्हणू शकता:
▪ “मागील वेळी जेव्हा आपण बोललो होतो तेव्हा तुम्ही जगात शांतीची उणीव आहे याबद्दल मनोरंजक मुद्दा सांगितला होता. तर जगाची नवीन व्यवस्था जागतिक नेते आणू शकतील असं तुम्हाला वाटतं का?”
जे लोक दुसऱ्यांच्या स्वार्थ वृत्तीमुळे बेजार झाले आहेत अशांना तुम्ही म्हणू शकता:
▪ “आपण मागे बोललो होतो तेव्हा तुम्ही लोकांमध्ये सर्वसाधारणपणे जी स्वार्थी वृत्ती असल्याचे दिसत आहे त्याबद्दल उत्तम मुद्दा सांगितला होता. तर अशा स्वार्थी लोकांबद्दल देवाचा कसा दृष्टीकोण असावा असे तुम्हास वाटते? [उत्तरास वाव द्या.] याबद्दल पवित्र शास्त्र इफिसकर ५:५ मध्ये असे म्हणते.”
३ आणखी ज्या पद्धतीचे बोलणे उपयुक्त ठरू शकते त्यामध्ये हेही समाविष्ट करता येईल:
▪ “मला आपले मागचे संभाषण बरेच आवडले. याकरता मी थोडेसे संशोधन केले आणि जे बेघर आहेत अशांना जी दैन्यावस्था अनुभवण्यास मिळते त्याबद्दल यहोवाला काय वाटते त्याविषयीची ही माहिती आणिली आहे. हे पहा येथे यशया ६५:२१-२३ मध्ये काय सांगण्यात आले आहे.”
▪ “मानवजातीला चांगल्या सरकारची जरुरी आहे हे मागे तुम्ही केलेले विधान मला आवडले.”
▪ “सर्व धर्म देवाच्या पसंतीस पात्र आहेत का, याबद्दल तुम्ही विचारलेला प्रश्न मोठा मनोरंजक आहे.”
▪ “तुम्ही भाग्य किंवा विधीलिखिताबद्दल जे काही मागे बोलला त्यामुळे मला खरेच विचार करायला लावले.”
▪ “मी आपल्या मागील संभाषणाबद्दल विचार करीत होतो, आणि याबद्दल तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकात एक मुद्दा सांगितला आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल असे मला वाटते. [घरमालकास निवडलेला मुद्दा(द्दे) पुस्तकातून दाखवा.]”
अशा प्रकारच्या प्रस्तावना, आपल्याला मागील संभाषणाबद्दल केवढी कदर वाटते आणि घरमालकासोबत परत बोलणी करण्यात केवढा आनंद वाटतो हे प्रकट करील.
४ पुनर्भेटी घेण्याआधी आपण तेथे जाऊन काय बोलणार याबद्दल आधी विचार करा. आपले वक्तव्य प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने सादर करा.
५ ज्या व्यक्तीला आपण भेट देत आहोत ती कामात असेल तरीही असे म्हणून आपण प्रभावी ठरू शकू:
▪ “मला दिसते की, तुम्हापाशी खूपच कमी वेळ आहे; पण तुम्ही आपले काम संपवीत असता जरा याबद्दल विचार करू शकता. [वाचा मत्तय ५:३.]”
किंवा तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “मी ही तीन शास्त्रवचने या कागदावर तुमच्यासाठी लिहून आणली आहेत. सध्या आपल्याला बोलायला वेळ नाही म्हणून मी हे सुचवितो की, मी पुन्हा आल्यावर याबद्दल बोलण्यासाठी तुमचा पाच मिनिटे वेळ घेईन.”
६ नकारात्मक पवित्रा टाळावा: ज्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळेल किंवा घरमालकाला विचित्र अवस्थेत सोडले जाईल असे प्रश्न बहुधा काही चांगले परिणाम आणीत नाहीत. यामध्ये, “मी जे प्रकाशन तुम्हाला देऊन गेलो होतो ते तुम्ही वाचले का?” “तुम्हाला काही प्रश्न आहेत का?” “तुम्ही मला ओळखता ना?” “मी तुमची ही परतभेट अशासाठी घेत आहे की, तुम्हाला देवाने पृथ्वीसंबंधी राखलेल्या उद्देशाबद्दल अजूनही काही आस्था आहे का ते बघावे.”
७ आधी आस्था दाखविलेल्या घरमालकाला खरे अर्थभरीत साहाय्य देण्यासाठी आपण आधीच तयारी केली तर त्याची भेट घेण्यास आपल्याला निश्चित उत्सुकता राहील.