वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९२ पृ. ३
  • पायनियरांना आधार देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पायनियरांना आधार देणे
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • आमच्या पायनियरांविषयी रसिकता दाखविणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पायनियर सेवेची प्रतिफळे
    आमची राज्य सेवा—२००३
  • तरुण “आनंद“ कसा करू शकतात हे त्यांना सांगणे
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ३/९२ पृ. ३

पायनियरांना आधार देणे

१ देवाचे लोक त्याच्या सेवेतील आवेशाबद्दल प्रसिद्ध आहेत. आम्हा सर्वांना जरी पायनियर बनण्याची परिस्थिती नसली तरी आम्हाठायी पायनिर आत्मा जडविण्याची, आम्ही जे करतो त्यामध्ये पूर्ण जिवानिशी असण्यासाठी कसोशीने परिश्रम करण्यास हवेत. जे पायनियर सेवेत सहभागी होऊ शकतात अशा सर्वांना आम्ही प्रोत्साहन देऊ इच्छितो, अशांबद्दल आम्हाला आनंद वाटतो.

२ पायनियर बनणे व त्यात टिकून राहणे हे मोठे काम आहे. पायनियरांच्या खांद्यावर मोठ्या प्रमाणाचे प्रचार व शिक्षणाचे कार्य विसावलेले आहे. हे प्रयत्न व त्याग यांच्याविना उरकले जाऊ शकत नाही. तर मग, या आवेशी पूर्ण वेळेच्या सेवकांना इतर कसा आधार व उत्तेजन देऊ शकतात?

३ काय केले जाऊ शकते: पायनियरांना वडीलांच्या आधाराची गरज असते. वडील पायनियरांसोबत कार्य करतात तेव्हा त्यांना पुष्कळ उत्तेजन मिळत असते. आपल्या मंडळीतील प्रत्येक पायनियरासोबत वर्षातून निदान एकदा तरी कार्य करण्याचा पुष्कळ वडीलांचा प्रयत्न राहतो. यामुळे पायनियर जे कार्य करीत आहेत त्याबद्दल त्यांची प्रशंसा त्यांना करता येते आणि पुढील प्रगतीसाठी मदत देता येते. वडील उपलब्ध असतात तेव्हा त्यांच्यासोबत सेवकार्यात असण्यासाठी पायनियरांना आपल्या आराखड्यात सुधारणा करावी लागेल. तसेच गटातील सर्वांना पुरेसे क्षेत्र उपलब्ध आहे याबद्दल वडीलांना खात्री करून घ्यावीशी वाटेल. पायनियरांच्या आराखड्यास सामावून घेण्यासाठी दुपारनंतर किंवा सायंकाळच्या क्षेत्रकार्याच्या सभांची पुरवणी करावी लागेल. हे, ज्या महिन्यात अधिक साहाय्यक पायनियर असतात तेथे खासपणे खरे असते.—यशया ४०:११.

४ उपाध्य सेवक देखील पायनियरांना क्षेत्रकार्यात आधार देऊन आणि मंडळीच्या व्यवस्थेची काळजी वाहून मदत करू शकतात. क्षेत्र सेवेच्या गटात बंधूंनी पुढाकार घ्यावा अशी पायनियर भगिनींची खूप इच्छा असते. प्रकाशने व मासिके हाताळणाऱ्‍यांनी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री केली पाहिजे. अशा गोष्टींची काळजी घेतल्यामुळे पायनियरांना त्यांच्या सेवकपणावर आपले लक्ष केंद्रित करता येईल.

५ प्रत्येकजण मदत करू शकतो: प्रचारक देखील आपणाला अनेक वेळा उपलब्ध बनवून पायनियरांसोबत मिळून कार्य करू शकतात. पायनियरांना इतर प्रचारकांची सोबत तसेच आधार आनंदाचा वाटतो. कदाचित, तुम्हाला पायनियरांसोबत आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून निदान दोनदा कार्य करता येईल. आपणापाशी असणाऱ्‍या भौतिक गोष्टींची सहभागिता पायनियरांसोबत होऊ शकते; आणि अशा औदार्याची खास कदर पायनियरांना वाटते.—फिलिप्पै. ४:१४-१९.

६ ज्या कुटुंबातील सदस्य पायनियर आहेत अशांना त्यांच्या कुटुंबाकडून पुष्कळशी मदत देता येईल. घरातील कामाची सुव्यवस्था कुटुंबातील एका किंवा अधिक सदस्यांना पायनियरींग करण्याची मुभा देते. तीन मुले असणारी भगिनी आठवड्यातून दोनदा काम करते. तिची मुले घरातील तसेच बाजारहाटाची कामे करून तिला मदत करतात. मुलगी स्वच्छता व जेवण करण्याचे काम करते. तिचे शालेय शिक्षण संपल्यापासून ती देखील पायनियरींग करीत आहे. तिचे सेवेचे दिवस तिच्या आईच्या कार्याच्या दिवसाआड असतात. अशाप्रकारचे कुटुंबातील आपसातील सहकार्य अधिकांना पायनियरींग करण्याची मुभा देऊन कुटुंबाला आशीर्वाद मिळवून देते.

७ परिश्रमी पायनियर्स मंडळीला कित्येक मार्गाने आशीर्वादित ठरतात. त्यांचा आवेश व उदाहरण पुष्कळांना सेवाकार्यात अधिक करण्याचे उत्तेजन देतो. या कारणास्तव, आपणाला जितके होते तितका त्यांना अधिक आधार दिला पाहिजे. असे हे एकजुटीचे प्रयत्न सर्वांना आनंद देतात व त्याद्वारे यहोवाची स्तुती होते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा