इतरांना शिकविण्यासाठी पात्र आणि सुसज्जीत
१ यहोवाचा प्रतिनिधी म्हणून मोशेला नियुक्त करण्यात आले तेव्हा फारोला देववचनाची घोषणा करण्यासाठी आपण पात्र आहोत असे त्याला वाटले नाही. (निर्ग. ४:१०; ६:१२) आपल्याला बोलायला येत नाही, असे म्हणण्याद्वारे यिर्मयाने हे दाखवून दिले, की यहोवाचा संदेष्टा या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्याकडे आत्मविश्वासाची कमी होती. (यिर्म. १:६) सुरवातीला त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी होती तरी देखील या दोन्ही संदेष्ट्यांनी यहोवाचे निर्भिड साक्षीदार असल्याचे शाबीत केले. देवाने त्यांना यथायोग्यपणे पात्र ठरवले होते.
२ आपले सेवाकार्य आत्मविश्वासाने पूर्ण करण्याकरता आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याकडे असल्यामुळे आपण आज यहोवाचे कृतज्ञ आहोत. (२ करिंथ. ३:४, ५; २ तीम. ३:१७) एखाद्या पात्र कारागिराकडे ज्याप्रमाणे अवजारांचा संपूर्ण संच असतो त्याप्रमाणे आपले नियुक्त सेवाकार्य कौशल्याने पार पाडण्यासाठी आपण देखील योग्यपणे सुसज्जीत आहोत. जानेवारीमध्ये आपण १९२ पृष्ठांची आपली जुनी पुस्तके सादर करत असून ही पुस्तके खास दराने सादर करण्यासाठी त्यांची यादी देण्यात आली आहे. ही आध्यात्मिक अवजारे नवीन नसली तरी त्यांचे शास्त्रवचनीय विषय अद्यापही प्रचारात आहेत आणि सत्य शिकण्यासाठी ही पुस्तके लोकांना मदत करतील. जे पुस्तक सादर करण्यात येते त्यानुसार सुचवलेल्या खालील प्रस्तुतींमध्ये फेरफार करावा.
३ देवाच्या वचनातील आस्था वाढविण्यासाठी शिक्षणाचा विषय उपयोगात आणता येईल. उचित आहे तेथे तुम्ही असे म्हणून संभाषण सुरू करू शकता:
◼ “दर्जेदार शिक्षणाच्या गरजेवर आज अधिक जोर दिला जातो. जीवनातील परमानंद आणि यश मिळविण्यासाठी एखाद्यानं कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं, असं तुम्हाला वाटतं? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवाचं ज्ञान घेणाऱ्यांना सनातन फायदे मिळू शकतात. [वाचा नीतिसूत्रे ९:१०, ११.] हे हस्तपुस्तक [तुम्ही सादर करत असलेल्या पुस्तकाचे नाव सांगा] बायबलवर आधारित आहे. हे पुस्तक दाखवून देतं, की बायबल ज्ञानाचा वैभवी स्रोत असून या ज्ञानामुळे सार्वकालिक जीवन मिळू शकतं.” पुस्तकातील विशिष्ट उदाहरण दाखवा. खरी आस्था प्रकट केल्यास पुस्तक सादर करा आणि पुनर्भेटीची व्यवस्था करा.
४ बायबल शिक्षणाच्या महत्त्वाविषयी तुम्ही ज्या घरमालकाशी चर्चा केली होती त्याच्याकडे परत जाताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “मागील भेटीत आपण चर्चा केली होती, की बायबल शिक्षणाचा स्रोत आहे आणि त्यामुळं आपल्याला अनंतकाळच्या भवितव्याची खात्री मिळू शकते. अर्थातच, शास्त्रवचनांतून आपल्याला काय जाणून घ्यावं, हे शिकण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे. [वाचा नीतिसूत्रे २:१-५.] अनेक लोकांना बायबलचा काही भाग समजायला दुरापास्त होतोय. बायबलच्या मूलभूत शिकवणुकींबद्दल अधिक शिकविण्याकरता लोकांना मदत म्हणून आम्ही विस्तृतपणे जी पद्धत वापरलीय तिचे प्रदर्शन त्रोटकपणे करण्याची माझी इच्छा आहे.” मागील भेटीच्या वेळी दिलेल्या पुस्तकाचे योग्य ते पृष्ठ काढा आणि बायबल अभ्यासाचे त्रोटकपणे प्रदर्शन करून दाखवा. नियमित बायबल अभ्यास असावा, अशी घरमालकाची इच्छा असल्यास सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे अभ्यासाचे साधन घेऊन तुम्ही परत याल असे त्याला सांगा.
५ जगातील मुलांचे दुःख पाहून अनेक लोकांच्या अंतःकरणाला पीळ पडतो. या दैनावस्थेकडे देव कसे पाहतो हे घरमालकाला दाखविण्यास तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “संपूर्ण जगातील मुले भुकेलेली, आजारी आणि उपेक्षित असल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील. संबंधित संघटना सुधारणा करण्यात अपेशी का होतायत? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मानवांसाठी जे उत्तम आहे ते त्यांना देण्याची देवाची इच्छा आहे. लहानग्यांना आणि मोठ्यांना तो देत असलेल्या बायबलमधील अभिवचनाकडं जरा लक्ष द्या. [वाचा प्रकटीकरण २१:४.] हे पुस्तक [शीर्षकाचा उल्लेख करा] देव तयार करीत असलेल्या अशा जगाविषयी विस्तृतपणे सांगतं जिथं दुःखाला पूर्ण विराम मिळालेला असेल.” शक्य असल्यास, पुस्तकातील परादीसचे चित्र दाखवा आणि त्यावर चर्चा करा. पुस्तक सादर करा आणि पुढील भेटीची व्यवस्था करा.
६ तुम्ही पहिल्या भेटीत मुलांच्या दुःखाबद्दल बोलला असल्यास पुढील भेटीत तुम्ही असे म्हणून चर्चा पुढे चालू ठेवू शकता:
◼ “मी अलीकडेच तुमच्याकडं येऊन गेलो तेव्हा विभाजित घरं, दुष्काळ, आजार आणि हिंसाचार यांमुळं झालेल्या मुलांच्या दैनावस्थेबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली होती. लहानग्यांना तसेच मोठ्यांना देखील आजारपणाला, दुःखाला आणि मरणाला सामोरे जावे लागणार नाही, अशा बायबलमध्ये सांगितलेल्या जगाविषयी वाचणं सांत्वन देणारं आहे. या पृथ्वीवरील सरस जीवनाविषयी यशयाची भविष्यवाणी वर्णन करते.” यशया ६५:२०-२५ वाचा आणि चर्चा करा. अखेरीस ज्ञान पुस्तकाच्या साह्याने बायबल अभ्यास सुरू करा.
७ प्रार्थना करणे हे धार्मिक लोकांसाठी सामान्य गोष्ट असल्यामुळे असे म्हणून या विषयावर तुम्ही संभाषण सुरू करू शकता:
◼ “आपल्यातील बहुतेकांनी जीवनात केव्हा ना केव्हातरी अशा काही समस्या अनुभवल्यात की ज्यामुळे आपण मदतीकरता देवाला प्रार्थना केलीय. असे असूनही अनेकांना वाटते, की त्यांना त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर मिळत नाही. शांतीसाठी जाहीरपणे प्रार्थना करणाऱ्या धर्मपुढाऱ्यांच्या प्रार्थना ऐकण्यात येत नाहीत, असही दिसून येतं. युद्ध आणि हिंसाचार मानवांना सळो की पळो करत असल्यामुळं आपण असे म्हणतो. देव खरोखरच प्रार्थना ऐकतो का? तो प्रार्थना ऐकतो, तर मग कित्येक प्रार्थनांचं उत्तर का मिळत नाही? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपल्या प्रार्थनांचं उत्तर हवं असल्यास कोणत्या गोष्टीची गरज आहे याबद्दल स्तोत्र १४५:१८ सांगतं. [शास्त्रवचन वाचा.] एक गोष्ट म्हणजे, देवाला केलेल्या प्रार्थना प्रांजळ आणि त्याच्या वचनात आढळणाऱ्या सत्याच्या एकवाक्यतेत असल्या पाहिजेत.” तुम्ही सादर करत असलेले पुस्तक दाखवा आणि प्रार्थनेच्या महत्त्वाबद्दल ते काय म्हणते त्याकडे निर्देश करा.
८ प्रार्थनेवरील मागील चर्चेचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही असे म्हणून शकता:
◼ “प्रार्थनेच्या विषयावरचं संभाषण मला आवडलं. कशाबद्दल प्रार्थना करावी, यावरील येशूचे विचार तुम्हाला सहायक मार्गदर्शक ठरतील यात काही शंका नाही.” मत्तय ६:९, १० वाचा आणि येशूने आपल्या आदर्श प्रार्थनेत कोणत्या प्रमुख गोष्टी सांगितल्या त्याकडे निर्देश करा. “तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल,” हा ज्ञान पुस्तकातील १६ वा अध्याय दाखवा आणि साहित्याचा अभ्यास घेण्याचे प्रदर्शन दाखविण्याची परवानगी मागा.
९ इतरांना देवाचे ज्ञान देण्याची बाब येते तेव्हा तुम्ही कदाचित विचाराल, “हे कार्य करावयास कोण लायक आहे?” शास्त्रवचन उत्तर देते: ‘आम्ही आहोत.’—२ करिंथ. २:१६, १७.