ईयोब
२९ ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला:
२ “ते पूर्वीचे दिवस परत आले तर किती बरं होईल!
तेव्हा देव माझा सांभाळ करत होता,
३ त्याचा दिवा माझ्या डोक्यावर चमकायचा,
आणि त्याचा प्रकाश मला अंधारातही वाट दाखवायचा,+
४ तेव्हा मी तारुण्यात* होतो,
आणि माझ्या तंबूवर देवाच्या मैत्रीची छाया होती,+
५ तेव्हा मला सर्वशक्तिमान देवाची साथ होती,
आणि माझी सगळी मुलं* माझ्या अवतीभवती होती,
६ तेव्हा माझी पावलं लोण्याने भिजलेली असायची,
आणि माझ्यासाठी खडकांतून तेलाच्या धारा वाहायच्या.+
९ अधिकारी माझ्यापुढे गप्प बसायचे
आणि ते आपला हात तोंडावर ठेवायचे.
१० प्रतिष्ठित माणसांच्या तोंडून शब्दही निघायचा नाही;
त्यांची जीभ टाळूला चिकटलेली असायची.
११ जो कोणी माझं बोलणं ऐकायचा, तो माझी प्रशंसा करायचा
आणि मला पाहणारे माझ्या बाजूने साक्ष द्यायचे.
१३ जो मरायच्या बेतात होता, तो मला आशीर्वाद द्यायचा,+
मी केलेल्या साहाय्यामुळे विधवांना आनंद व्हायचा.+
१४ नीतीने वागणं माझ्यासाठी वस्त्रासारखं होतं;
न्याय माझ्यासाठी अंगरख्यासारखा* आणि पगडीसारखा होता.
१५ मी आंधळ्यांसाठी डोळे;
आणि लंगड्यांसाठी पाय झालो.
१७ मी दुष्टाचा जबडा तोडायचो+
आणि त्याच्या तावडीत सापडलेल्या लोकांना सोडवायचो.
१९ माझी मुळं पाण्यापर्यंत पसरतील,
आणि माझ्या फांद्या रात्रभर दवाने भिजलेल्या असतील.
२० माझी प्रतिष्ठा कधीच ढळणार नाही,
आणि मी आपलं धनुष्य चालवत राहीन.’
२१ लोक उत्सुकतेने माझं बोलणं ऐकायचे;
माझ्या सल्ल्याची शांतपणे वाट पाहायचे.+
२२ मी बोलल्यावर, ते आणखी काही बोलायचे नाहीत;
माझे शब्द त्यांना पावसाच्या मंद सरींसारखे वाटायचे.*
२३ पावसासारखी ते माझी वाट पाहायचे;
शेवटच्या पावसासारखी, ते आतुरतेने माझ्या शब्दांची वाट पाहायचे.+