ईयोब
३८ मग यहोवाने वादळातून ईयोबला उत्तर दिलं:+
३ चल, आता मर्दासारखी कंबर कस;
मी प्रश्न विचारतो आणि तू मला उत्तर दे.
४ मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास?+
तुला समजत असेल, तर सांग.
५ तिची लांबी-रुंदी कोणी ठरवली, हे तुला माहीत आहे का?
दोरी ताणून तिचं मोजमाप कोणी केलं?
६ तिचे खांब कशात बसवले आहेत?
तिच्या मुख्य दगडाची* स्थापना कोणी केली?+
७ पहाटेच्या ताऱ्यांनी+ एकत्र मिळून आनंदाने जयजयकार केला,
आणि देवाची सर्व मुलं*+ जल्लोष करू लागली, तेव्हा तू कुठे होतास?
९ जेव्हा मी त्याला दाट मेघांमध्ये गुंडाळून*
ढगांचं पांघरूण घातलं;
१० जेव्हा मी त्याची सीमा आखून दिली
आणि त्याला दरवाजे आणि अडसर लावले;+
११ जेव्हा मी त्याला म्हणालो, ‘फक्त इथपर्यंत ये, याच्यापुढे येऊ नकोस;
तुझ्या मगरूर* लाटा इथेच थांबल्या पाहिजेत,’+ तेव्हा तू कुठे होतास?
१२ तू कधी* पहाटेला आज्ञा दिली आहेस का?
किंवा तिला तिचं ठिकाण दाखवलं आहेस का?+
१३ पृथ्वीची टोकं हातात धरून,
तिच्यावरून दुष्टांना झटकून टाकायला, तू कधी तिला सांगितलंस का?+
१४ मातीवर मुद्रेचा ठसा उमटावा, तसं पृथ्वीचं रूप बदलतं;
वस्त्रावरच्या नक्षीकामासारख्या, तिच्यावरच्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसू लागतात.
१५ पण दुष्टांचा प्रकाश हिरावून घेतला जातो
आणि त्यांचा उगारलेला हात तोडून टाकला जातो.
१६ तू कधी सागराच्या उगमापर्यंत गेला आहेस का?
किंवा खोल समुद्रात शोध घेत फिरला आहेस का?+
१७ मृत्यूची फाटकं+ तू बघितली आहेस का?
तू घोर अंधकाराची फाटकं*+ पाहिली आहेस का?
१८ पृथ्वी किती विशाल आहे,+ याची तुला कल्पना आहे का?
तुला हे सगळं कळत असेल, तर सांग मला.
१९ प्रकाशाचं घर कोणत्या दिशेला असतं?+
आणि अंधाराचं ठिकाण कुठे आहे?
२० तू त्यांना त्यांच्या ठिकाणी नेऊ शकतोस का?
त्यांच्या घरांचे रस्ते तुझ्या ओळखीचे आहेत का?
२१ तुझा जन्म आधीच झाला होता, म्हणून तुला हे सगळं कळतं का?
तुझं वय* खूप जास्त असल्यामुळे तुला हे समजतं का?
२२ बर्फाच्या+ कोठारांत तू कधी पाऊल ठेवलं आहेस का?
गारांचं+ गोदाम तू पाहिलं आहेस का?
२४ उजेड* कोणत्या मार्गाने पसरतो?
आणि पूर्वेकडचा वारा पृथ्वीवर कुठून येतो?+
२५ मुसळधार पावसासाठी मार्ग कोणी तयार केला?
वादळात गरजणाऱ्या ढगाची वाट कोणी ठरवली?+
२६ जिथे कोणीही राहत नाही अशा ठिकाणी;
मानवांची वस्ती नसलेल्या ओसाड रानात पाऊस कोण पाडतं?+
२७ उद्ध्वस्त झालेल्या वैराण भूमीची तहान कोण भागवतं?
तिथे कोवळ्या गवताच्या पाती कोण उगवायला लावतं?+
दवबिंदूंना कोणी जन्माला घातलं?+
२९ हिम कोणाच्या उदरातून* जन्माला आलं?
आकाशातल्या हिमकणांना कोणी जन्म दिला?+
३० त्यांमुळे पाणी जणू खडकाने झाकलं जातं;
खोल पाण्यावर कठीण बर्फाचा थर पसरतो.+
३१ तू कृत्तिका नक्षत्रातल्या* ताऱ्यांचा गुच्छ बांधून ठेवू शकतोस का?
किंवा मृगशीर्ष नक्षत्राचे+ बंध सोडू शकतोस का?
३२ तू एखाद्या नक्षत्राला* योग्य वेळी उगवायला लावू शकशील का?
किंवा सप्तऋषी नक्षत्राला* मार्ग दाखवू शकशील का?
३३ आकाशावर नियंत्रण करणारे कायदे तुला माहीत आहेत का?+
ते कायदे* तू पृथ्वीवर लागू करू शकतोस का?
३४ तू ढगांशी आवाज चढवून बोलू शकतोस का?
त्यांना तुझ्यावर धो-धो बरसायला लावू शकतोस का?+
३५ तुझ्या सांगण्यावरून विजा कडाडतील का?
तू बोलावल्यावर, ‘आम्ही आलो,’ असं त्या म्हणतील का?
आणि आकाशाला* समजशक्ती कोणी दिली?+
३७ मेघांना मोजण्याइतका बुद्धिमान कोण आहे?
आकाशातल्या घागरी कोण ओतू शकतं?+
३८ त्यांच्यामुळे धुळीचा चिखल होतो
आणि मातीचे गोळे एकमेकांना चिकटतात.
३९ तू एखाद्या सिंहासाठी शिकार करू शकतोस का?
किंवा त्याच्या छाव्यांची भूक भागवू शकतोस का?+
४० ते आपल्या गुहांमध्ये टपून बसतात
तिथे ते शिकारीची वाट पाहत राहतात.
४१ कावळ्याची पिल्लं जेव्हा देवाला हाक मारतात,
आणि भुकेने तळमळत इकडेतिकडे फिरतात,
तेव्हा कावळ्याला अन्न कोण देतं?+