ईयोब
३७ या विचारांनी माझ्या हृदयाचा थरकाप उडतो;
ते धडधडू लागतं.
२ त्याच्या तोंडून निघणारी गर्जना;
त्याच्या आवाजाचा गडगडाट, लक्ष देऊन ऐका.
३ तो त्याला सबंध आकाशाखाली पाठवतो;
तो पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांपर्यंत वीज चमकवतो.+
४ मग मोठी गर्जना ऐकू येते;
तो आपल्या भरदार आवाजात गरजतो,+
त्याचा आवाज ऐकू येतो, तेव्हाही विजा चमकत असतात.
६ तो हिमकणांना म्हणतो, ‘पृथ्वीवर पडा,’+
आणि पावसाच्या सरींना म्हणतो, ‘जोरात कोसळा.’+
८ जंगली प्राणी आपल्या गुहांमध्ये जातात;
ते आपापल्या घरात दडी मारून बसतात.
११ तो पावसाच्या पाण्याने ढगांचा भार वाढवतो;
तो मेघांमध्ये विजांना विखुरतो;+
१२ तो सांगेल तसे ते वळतात;
पृथ्वीच्या पाठीवर,* त्याने सांगितलेल्या सर्व आज्ञा ते पूर्ण करतात.+
१३ कोणाला शिक्षा* द्यायची असो,+ जमिनीवर पाऊस पाडायचा असो,
किंवा एकनिष्ठ प्रेम दाखवायचं असो, तो त्यांच्याद्वारे हे घडवून आणतो.+
१५ देव ढगांना कशी आज्ञा देतो*
आणि मेघांतून विजा कशा चमकायला लावतो, हे तुला माहीत आहे का?
१६ ढग कसे तरंगतात हे तू सांगू शकतोस का?+
ही परिपूर्ण ज्ञान असलेल्या देवाची आश्चर्यकारक कार्यं आहेत.+
१७ दक्षिणेकडच्या वाऱ्याने पृथ्वी स्तब्ध होते,
तेव्हा तुझी वस्त्रं का तापतात?+
१९ बोल, आम्ही त्याला काय सांगू?
आम्ही तर अंधारात आहोत; आमच्याजवळ उत्तर नाही.
२० मला काही बोलायचंय, असं त्याला सांगावं का?
त्याला सांगण्यासारखी एखादी गोष्ट कोणी बोललंय का?+
२२ उत्तरेकडून सोनेरी किरणं पसरतात;
देवाचं वैभव+ खरंच विस्मयकारक आहे!