प्रीतीचा सर्वोत्कृष्ट मार्ग
देव प्रीती आहे, अशी प्रीती अद्भुत असल्यामुळे शब्दांपलीकडील आहे. ती कशी कार्य करते ते सांगणे सोपे आहे. प्रेषित पौलाने या विषयावर लिखाण करताना ख्रिस्ती विश्वास बाळगणाऱ्यांसाठी ती किती महत्त्वपूर्ण आहे यावर त्याने पहिल्यांदा जोर दिला आणि मग, ती निःस्वार्थीपणे कशी कार्य करते त्याचे सविस्तर वर्णनही दिले: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते.”—१ करिंथकर १३:४-७.
ईश्वरी प्रीती कशी कार्य करते
“प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे.” ती प्रतिकूल परिस्थिती आणि इतरांच्या चुका सहन करते आणि असे सहन करण्यामागे तिचा एक उद्देश आहे व तो म्हणजे, चुका करणाऱ्यांना किंवा प्रतिकूल परिस्थितींमध्ये गोवलेल्यांना अंतिम तारण मिळू शकेल तसेच देवाच्या नावाला सरतेशेवटी आदर व समर्थन मिळेल. (२ पेत्र ३:१५) रागाचे कोणतेही कारण असले तरी प्रीती दयावंत असते. एखादा ख्रिस्ती इतरांसोबत उर्मट किंवा निष्ठुरपणे वागल्यामुळे काहीही चांगले साध्य होणार नाही. परंतु, प्रीती दृढ राहून धार्मिकतेच्या वतीने न्यायाने कार्य करू शकते. अधिकार असलेले अपराध्यांना शिक्षा देऊ शकतात पण तरीसुद्धा, त्यांनी दयेचा उपयोग केला पाहिजे. क्रूरतेमुळे क्रूर असलेल्या सल्लागाराला आणि अधार्मिकाला काहीच फायदा होत नाही उलट ते अपराध्याला पश्चात्ताप करून चांगले कार्य करण्यापासून आणखीनच दूर नेते.—रोमकर २:४.
“प्रीती हेवा करीत नाही.” इतरांना मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी पाहून ती हेवा करीत नाही. एखाद्या सहकाऱ्याला मोठ्या जबाबदारीचा हुद्दा मिळत असताना पाहून ती आनंद करते. एखाद्याच्या शत्रूला चांगल्या गोष्टी मिळत असल्या तरीसुद्धा ती हेवा करीत नाही.
“प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.” ती इतरांकडून प्रशंसेची व कौतुकाची अपेक्षा करीत नाही. (यहुदा १६) प्रीती असणारी व्यक्ती स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून दुसऱ्या व्यक्तीला कधीही मागे खेचणार नाही. उलट, ती देवाचा महिमा करील व इतरांना प्रामाणिकपणे उत्तेजन देईल व त्यांची उभारणी करेल. (कलस्सैकर १:३-५) दुसऱ्या ख्रिश्चनाला प्रगती करताना पाहून त्याला आनंद वाटेल. व तो काय करणार आहे त्याची फुशारकी मारणार नाही. (नीतिसूत्रे २७:१) तो जे काही करतो ते यहोवाकडून येणाऱ्या शक्तीमुळेच आहे याची त्याला जाणीव असेल.—स्तोत्र ३४:२.
प्रीती “गैरशिस्त वागत नाही.” ती बेशिस्त नाही. लैंगिक गैरवागणूक अथवा धक्कादायक वर्तन यांसारखे तिचे असभ्य वर्तन नसते. ती कोणाहीसोबत रानटीपणे, अश्लीलतेने, उर्मटपणे, उद्धटपणे, अभद्र किंवा अनादराने वागत नाही. प्रीती असलेली व्यक्ती, दिसण्यात व कृतींत आपल्या ख्रिस्ती बांधवांना अस्वस्थ करणारी कोणतीही गोष्ट करण्याचे टाळेल. ख्रिस्ती विश्वासात नसलेल्यांच्या दृष्टीत आदराने वागण्यासही ती एखाद्याला प्रवृत्त करील.—रोमकर १३:१३.
प्रीती “स्वार्थ पाहत नाही.” ती, “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे,” या तत्त्वाचे अनुसरण करते. (१ करिंथकर १०:२४) इथेच तर इतरांच्या सार्वकालिक कल्याणाची काळजी दिसून येते. इतरांबद्दलची ही प्रांजळ चिंता, प्रीतीतील सर्वात प्रबळ प्रेरक शक्तींपैकी एक आहे व तिचा सर्वात प्रभावकारक व फायदेकारक परिणाम होतो. प्रीती असणारा आपल्याच मार्गाने सर्व काही होण्याची मागणी करत नाही. शिवाय, प्रीती “हक्कांची” मागणी करीत नाही; ती इतर व्यक्तीच्या आध्यात्मिक कल्याणाविषयी अधिक चिंतीत असते.—रोमकर १४:१३, १५.
प्रीती “चिडत नाही.” ती चिडण्यासाठी एखाद्या प्रसंगाची वाट पाहत नाही किंवा सबब सांगत नाही. शरीराची कामे असलेल्या रागाचा उद्रेक होण्यास ती प्रवृत्त होत नाही. (गलतीकर ५:१९, २०) प्रीती असलेली व्यक्ती इतरांच्या बोलण्यामुळे किंवा कार्यामुळे सहजपणे दुखावली जात नाही.
प्रीती “अपकार स्मरत नाही.” आपला अपकार झाला असून त्या अपकाराचा जणू ‘पुस्तकामध्ये हिशेब ठेवावा,’ उचित समयी तो मिटवावा किंवा चुकता करावा आणि त्यावेळेपावेतो दुखावलेल्या व्यक्तीमध्ये आणि दुखावणाऱ्यामध्ये कोणत्याच संबंधाला अनुमती देऊ नये असा ती विचार करीत नाही. असे केल्यास तो सूडाचा आत्मा ठरेल ज्याचा बायबल धिक्कार करते. (रोमकर १२:१९) प्रीती दुसऱ्यावर दुष्ट हेतूंचा आरोप करणार नाही तर, ती सूट देण्यास प्रवृत्त होईल व इतरांना संशयाचा फायदा घेऊ देईल.—रोमकर १४:१, ५.
प्रीती “अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते.” सत्याने गत विश्वास किंवा केलेल्या विधानांना खोटे शाबीत केले तरी, प्रीती त्यासंबंधी आनंद मानते. ती देवाच्या वचनातील सत्याशी चिकटून राहते. ती नेहमी सत्याची बाजू घेते, चुकीच्या गोष्टींमध्ये, लबाडीमध्ये, किंवा अन्यायाला बळी पडलेला शत्रू असला तरी, कोणत्याही प्रकारच्या अन्यायात आनंद मानत नाही. परंतु, एखादी गोष्ट चुकीची वा दिशाभूल करणारी असल्यास, सत्याच्या व इतरांच्या फायद्यासाठी प्रीती, बोलून दाखवावयास घाबरत नाही. (गलतीकर २:११-१४) तसेच, एखादी बाब सुधारण्याचा प्रयत्न करताना दुसरी चूक करण्याऐवजी प्रीती सहन करावयास तयार असते.—रोमकर १२:१७, २०.
प्रीती “सर्व काही सहन करिते.” ती धार्मिकतेसाठी धीर धरावयास, सहन करावयास तयार असते. प्रीती असणारी व्यक्ती तिच्याविरुद्ध चूक करणाऱ्याला इतरांसमोर लगेच उघड करत नाही. चूक अतिशय गंभीर नसल्यास ती व्यक्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करील. नाहीतर, मत्तय १८:१५-१७ मधील येशूने शिफारस केलेला मार्ग लागू होतो तेव्हा ती व्यक्ती तो अनुसरेल.
प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” देवाने आपल्या सत्याच्या वचनात म्हटलेल्या सर्व गोष्टींवर, बाह्य स्वरुप त्याच्याविरूद्ध असले तरी व विश्वास न ठेवणारे जग निंदा करीत असले तरी, प्रीतीठायी विश्वास असतो. आपल्याला ज्याप्रमाणे एका खऱ्या, विश्वासू मित्राची माहिती व प्रेम असते आणि पुरावा नसलेली एखादी गोष्ट तो आपल्याला सांगतो तेव्हा देखील आपण त्याच्यावर जसा विश्वास ठेवतो त्याचप्रकारे ही प्रीती, विशेषकरून देवाकडची प्रीती, विश्वासूपणा व विश्वसनीयतेच्या अहवालावर आधारित त्याच्या सत्यतेची मान्यता आहे. (यहोशवा २३:१४) प्रीती आपल्या विश्वासू ख्रिस्ती बांधवांवरील भरवसा उत्पन्न करते; ते खरोखरीच चुकीचे आहेत याचा जोपर्यंत ठाम पुरावा मिळत नाही तोपर्यंत एक ख्रिस्ती त्यांच्यावर संशय घेणार नाही किंवा त्यांच्यावर अविश्वास दाखवणार नाही.—गलतीकर ५:१०; फिलेमोन २१.
प्रीती “सर्वांची आशा धरते.” यहोवाने अभिवचन दिलेल्या सर्व गोष्टींवर ती आशा करते. (रोमकर १२:१२) ती सतत कार्य करीत राहते, फळ मिळण्यासाठी, वाढवण्यासाठी ती यहोवावर विसंबून राहते. (१ करिंथकर ३:७) प्रीती असलेली व्यक्ती, आपले ख्रिस्ती बांधव कोणत्याही परिस्थितीत असोत, काही जण विश्वासात कमजोर असले तरी, त्यांच्या भल्याची आशा करील. त्याला याची जाणीव होईल की यहोवा जर अशा कमजोर लोकांना सहन करतो तर त्यानेही तीच मनोवृत्ती आत्मसात केली पाहिजे. (२ पेत्र ३:१५)
प्रीती “सर्वांसंबंधाने धीर धरते.” एखाद्या ख्रिश्चनाला यहोवा देवाप्रती आपली निष्ठा टिकवण्यासाठी प्रीतीची आवश्यकता आहे. एखाद्या ख्रिश्चनाच्या देवाप्रती असलेल्या भक्तीच्या आणि विश्वासूपणाच्या सुदृढतेची परीक्षा घेण्यासाठी दियाबलाने काही केले तरी, प्रीती त्याला देवासोबत खरेपणाने टिकून राहण्यास धरून राहील.—रोमकर ५:३-५.
‘प्रीती सनातन आहे.’ प्रीतीचा केव्हाही अंत होणार नाही किंवा ती अस्तित्वविरहित होणार नाही. आपण एके काळी विश्वास करत असलेल्या गोष्टींमध्ये नवीन ज्ञान व समजेमुळे सुधारणा कराव्या लागतील; आशा केलेल्या गोष्टींची पूर्तता झाल्यावर आशा बदलते आणि नवीन गोष्टींची आशा बाळगली जाते, पण प्रीती पूर्णच टिकून राहते व अधिकाधिक दृढ होत राहते. खरेच, या सर्व गोष्टी त्या ईश्वरी प्रीतीची, सर्वोत्कृष्ट गुण, अशी शिफारस करतात जो आपण सर्वांनी आपल्या जीवनात विकसित करण्यास झटले पाहिजे.—१ करिंथकर १३:८-१३.