वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ राजे २२:१८, १९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ पण ज्या यहूदाच्या राजाने तुम्हाला यहोवाकडे चौकशी करायला पाठवलंय, त्याला असं सांगा, की “तू जी वचनं ऐकलीस, त्यांबद्दल इस्राएलचा देव यहोवा म्हणतो: १९ ‘या जागेविषयी आणि इथल्या लोकांविषयी मी जे बोललो, म्हणजे हे लोक शापित होतील आणि यांना पाहून लोक घाबरतील असं मी जे बोललो, ते ऐकून तू यहोवासमोर नम्र झालास+ आणि आपलं हृदय कोमल केलंस; तू आपले कपडे फाडून माझ्यासमोर रडलास.+ म्हणून यहोवा म्हणतो, की मी तुझा धावा ऐकलाय;

  • २ इतिहास ३३:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ तो देवाला प्रार्थना करत राहिला. आणि देवाला त्याची दया आली. देवाने त्याची कृपेची विनंती ऐकून यरुशलेममध्ये त्याचं राज्यपद त्याला परत दिलं.+ तेव्हा मनश्‍शेला समजलं, की यहोवा हाच खरा देव आहे.+

  • स्तोत्र २२:२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २४ कारण जुलूम सहन करणाऱ्‍याच्या दुःखाकडे त्याने दुर्लक्ष केलं नाही;

      किंवा ते तुच्छ लेखलं नाही.+

      त्याने त्या मनुष्यापासून आपलं तोंड फिरवलं नाही.*+

      त्याची मदतीची याचना त्याने ऐकली.+

  • स्तोत्र ३४:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो;+

      मनाने खचलेल्यांना* तो वाचवतो.+

  • नीतिवचनं २८:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+

      पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+

  • यशया ५७:१५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १५ कारण जो सर्वोच्च आणि महान देव आहे,

      जो सदासर्वकाळ जिवंत राहतो+ आणि ज्याचं नाव पवित्र आहे,+ तो असं म्हणतो:

      “मी एका उंच आणि पवित्र ठिकाणी राहत असलो,+

      तरी मी दुःखी आणि खचून गेलेल्यांसोबतही असतो;

      खचून गेलेल्यांना नवी उमेद देण्यासाठी,

      आणि दुःखी असलेल्यांना नवजीवन देण्यासाठी,

      मी त्यांच्यासोबत असतो.+

  • लूक १५:२२-२४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ पण वडील नोकरांना म्हणाले, ‘लवकर जा! आणि सगळ्यात चांगला झगा आणून याला घाला. आणि याच्या हातात अंगठी आणि पायांत जोडे घाला. २३ एक धष्टपुष्ट वासरू आणून ते कापा, म्हणजे आपण सगळे मिळून खाऊ-पिऊ आणि आनंद साजरा करू. २४ कारण माझा हा मुलगा मेला होता पण तो पुन्हा जिवंत झालाय.+ तो हरवला होता आणि आता सापडलाय.’ तेव्हा ते सगळे आनंद साजरा करू लागले.

  • लूक १८:१३, १४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ पण काही अंतरावर उभा असलेला जकातदार मान वर करून आकाशाकडे पाहायलाही घाबरत होता. तो पुन्हा पुन्हा छाती बडवून म्हणत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’*+ १४ मी तुम्हाला सांगतो, हा माणूस त्या परूश्‍यापेक्षाही जास्त नीतिमान ठरला.+ कारण जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा