स्तोत्र
१४९ याहची स्तुती करा!*
२ इस्राएल आपल्या महान निर्माणकर्त्यामुळे आनंद करो;+
सीयोनची मुलं आपल्या राजामुळे हर्षित होवोत.
४ कारण यहोवाला आपले लोक प्रिय आहेत.+
तो नम्र लोकांचं तारण करून त्यांचा गौरव करतो.+
५ देवाच्या एकनिष्ठ सेवकांनी आपल्या गौरवाबद्दल आनंद करावा;
त्यांनी आपल्या अंथरुणावर आनंदाने गावं.+
६ त्यांच्या ओठांवर देवाची स्तुतिगीतं असावीत
आणि त्यांच्या हातात दुधारी तलवार असावी,
७ म्हणजे ते राष्ट्रांचा सूड उगवू शकतील
आणि त्यांना शिक्षा देऊ शकतील;
८ त्यांच्या राजांना ते साखळ्यांनी बांधतील
आणि त्यांच्या शासकांना लोखंडी बेड्या घालतील.
९ त्या राष्ट्रांसाठी लिहून ठेवण्यात आलेला न्यायदंड, ते त्यांच्यावर बजावतील.+
देवाच्या सर्व एकनिष्ठ सेवकांना हा सन्मान मिळेल.
याहची स्तुती करा!*